Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


चित्रपट : मी व मला दिसलेले जग
Author: श्री. म. माटे
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $13.71 $10.96 20% OFF ( ~330 Pages, R450)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
राजकीय चळवळ, अस्पृश्यता निवारण, रात्रशाळा, महाराष्ट्रातील मतमतांतरे, लोकांची विविध रूपे अशा विविध चित्रांतून पन्नास वर्षांचा इतिहासच जणू पुस्तकातून उलगडला जातो. विसाव्या शतकाच्या सुरवातीचे दिवस कसे होते, याचे प्रत्यंतर यावे, अशा सहज शैलीत 'चित्रां'तील विविध प्रसंग लिहिले आहेत.
-- श्रीकांत कात्रे, साप्ताहिक सकाळ, २३ एप्रिल २०११

Saptahik Sakal Review
Review courtesy of eSakal:
साप्ताहिक सकाळ, २३ एप्रिल २०११
अर्धशतकातील समाजदर्शन
-- श्रीकांत कात्रे
राजकीय चळवळ, अस्पृश्यता निवारण, रात्रशाळा, महाराष्ट्रातील मतमतांतरे, लोकांची विविध रूपे अशा विविध चित्रांतून पन्नास वर्षांचा इतिहासच जणू पुस्तकातून उलगडला जातो. विसाव्या शतकाच्या सुरवातीचे दिवस कसे होते, याचे प्रत्यंतर यावे, अशा सहज शैलीत 'चित्रां'तील विविध प्रसंग लिहिले आहेत.
पुण्याची राहणी इतकी स्वस्ताईची होती की, खानावळीचा दर सहा किंवा सात रुपये होता! वरण- भात, तूप, भाजी, आमटी, चटणी हे सगळे प्रकार आणि तेही चांगले रुचकर व मुबलक असत. सध्याच्या महागाईच्या काळात ही वाक्ये वाचून आश्चर्यच वाटले ना; पण असाही काळ होता. श्रीपाद महादेव माटे यांच्या 'चित्रपट : मी व मला दिसलेले जग' या पुस्तकातील समाजाचे दर्शन तुम्हाला अशा वेगळ्याच जगात घेऊन जाईल. माटे यांच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर आता दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या चित्रपटातील एक-एक 'चित्रे वाचल्या'वर आपले मन आपोआपच समृद्ध होत जाते. नव्या पिढीला विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकाची ओळख या पुस्तकातून चांगल्याच प्रकारे होईल.
आपल्या पूर्वीच्या पिढ्यांचा जीवनक्रम कसा असेल, याची उत्सुकता तरुण पिढीच्या मनात निश्चितच असते. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात देश पारतंत्र्यात होता. जगात, देशात आणि महाराष्ट्रातही मोठ्या उलथापालथी घडत होत्या. स्वातंत्र्याच्या लढाईबरोबर समाजसुधारणेचे प्रयत्न सुरू होते. या सर्वांचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणावर उमटत होते. महाराष्ट्रात अनेक नररत्ने या काळात कार्यरत होती. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सावरकर, हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलराव शिंदे, अण्णासाहेब कर्वे, शिवराम महादेव परांजपे, अच्युतराव कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, किर्लोस्कर, गडकरी, केशवराव भोसले, बालगंधर्व, गणपतराव जोशी, रॅंग्लर परांजपे, राजवाडे, भाटे, केतकर अशा विविध क्षेत्रांतील अनेकांचे, त्यांच्यासमोरच्या समाजाचे, आकांक्षांचे चित्रण माटे या पुस्तकात घडवतात. सर्वांचे दर्शन घडवणारा हा लेखक समाजात राहूनच भोवतालची रोजची सुख- दु:खे पाहून त्यात सहभागी होणारा, त्यांच्या भल्यासाठी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने झगडणारा होता. म्हणूनच माटे यांनी घडवलेले हे समाजाचे दर्शन अधिक जिवंत झाले आहे. नित्य अभ्यासाची जाणीव मनात ठेवूनच त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. संस्कृतीतील चांगली मूल्ये स्वीकारणे आणि समाजसुधारणेसाठी जुन्यातील वाईट टाकून देऊन नव्या बदलांचा आग्रह धरणे, अशा कृतीमुळे ते सनातनी सुधारक म्हणून ओळखले जात. अस्पृश्यता हा विचार त्याज्य आहे. अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी माणसाला सुशिक्षित बनवणे त्याच्या सामर्थ्याला संधी मिळवून देणे, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात संधी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था समाजाने केली, तर त्या मार्गानेच अस्पृश्यता नाहीशी होऊ शकेल, असा त्यांचा विश्वास होता. त्या मार्गाने जाण्याच
अ प्रयत्न त्यांनी केला. हे काम करताना जातवार सभांची आवश्यकता वाटल्याने त्यांनी चर्मकार परिषद, मातंग परिषद अशा परिषदा घेतल्या. पुण्यामध्ये विविध वस्त्यांमध्ये शाळा सुरू केल्या. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, बालविवाहासारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत, विधवा विवाह योग्य आहेत, या विचारांमुळे महिलांनाही समान संधी देण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यांच्या या कार्याचे आणि समाजातील घटनांचे चित्र पुस्तकातून उलगडत जाते.
बालपण, शिक्षण, नोकरी अशा जीवनाच्या प्रत्येक काळात समोर आलेला परिसर, व्यक्ती आणि अवतीभवती घडणार्‍या घटना त्यांनी मांडल्या आहेत. आजोळ असणारे शिखर शिंगणापूर, विटा, सातारा अशा गावात व्यतीत केलेले बालपण, पुण्यातील शिक्षण या सर्व काळात आलेले अनुभव अगदी सहजपणे चित्रित करताना माटे यांनी विविध प्रसंगांची नाळ समाजजीवनाशी जोडली आहे. दुष्काळ, प्लेगसारखी साथ, दारिद्यर अशा समाजास संघर्ष करावयास लावणार्‍या गोष्टी त्यांनी तन्मयतेने मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या काळची शिक्षण पद्धती, माणसांचे जगणे, शिक्षकांची वर्णने, राजकीय क्षेत्रांतील धुरिणांचे विचार, मतभेद, देशातील स्थिती, सार्वजनिक जीवनातील विसंगती अशा अनेक गोष्टींचे दर्शन त्यांनी या चित्रांतून घडवले आहे.
या 'चित्रपटात' शिक्षणाच्या काळातील विविध प्रकारच्या घटनांपासून ते सामाजिक स्थिती व होणारे बदल, समाजसुधारणा, अस्पृश्यता निवारण, राजकारण यासारख्या समाजातील विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटना घडामोडींचे दर्शन प्रभावीपणे होते. राजकीय चळवळ, सार्वजनिक जीवन, अस्पृश्यता निवारण, रात्रीच्या शाळा, ग्रंथ संपादन, सार्थ वचने, महाराष्ट्रातील मतमतांतरे, नवा अर्थवाद, लोकांची विविध रूपे अशा विविध चित्रांतून पन्नास वर्षांचा इतिहासच जणू पुस्तकातून उलगडला जातो. विसाव्या शतकाच्या सुरवातीचे दिवस कसे होते, याचे प्रत्यंतर यावे, अशा सहज शैलीत त्यांनी या चित्रातील विविध प्रसंग लिहिले आहेत. मोबाईल, इंटरनेटच्या काळातील नव्या पिढीला या पन्नास वर्षांतील समाजजीवनाचा अनुभव मिळण्यासाठी तरी हे पुस्तक आवर्जून वाचायला काहीच हरकत नाही.

Write your review for this book

Other works of श्री. म. माटे
   निवडक श्री. म. माटे
   श्री रामदास स्वामींचे प्रपंचविद्यान
   माणुसकीचा गहिवर
   उपेक्षितांचे अंतरंग

Similar books:
  समाजचित्र
   नाच ग घुमा
   प्रेमा तुझा रंग कसा
   धग
   झाडाझडती
   एक झाड आणि दोन पक्षी
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.