|
केशराचा पाऊस
Author: मारुती चितमपल्ली
Publisher: साहित्य प्रसार केंद्र
|
|
Price: $5.37 $4.29 20% OFF ( ~224 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हा कथासंग्रह आत्मपर असला तरीही ती एक शैली म्हणून अवलंब केला आहे.बहुतेक कथांची पाश्र्वभूमी मेळघाटातील जंगले आहेत.काही कथा रोजनिशीमधून आठवणींच्या पध्दतीने लिहिल्या आहेत.मेळघाटातील आदिवासींनी सांगितलेल्या लोककथा,दंतकथा आणि त्यांच्या श्रध्दा यांचा ह्या कथांमध्ये उपयोग केला आहे.
Review courtesy of Maharashtra Times: महाराष्ट्र टाईम्स रविवार २३ एप्रिल २००६ 'टोक' कुठंय?
... त्यानं वर पाहिलं. तिनंही पाहिलं. आभाळ अगदी स्वच्छ होतं. चंदाचा मंद सुखकारक प्रकाश जिकडे तिकडे पसरला होता. त्यानं बाजूला पाहिलं; तिनंही पाहिलं. सगळीकडे अगदी शांत होतं. तो चौथर्यावर बसला, आणि तिनं बसावं म्हणून त्यानं तिला हलकेच उचललं...
...................
... आता चंद झाडीतून बराच वर आला होता. नदीच्या पात्रातून संथपणे झुळझुळणारे पाणी चंदप्रकाशाने उजळले होते. त्यावरील उठणारे तरंग चमकत होते. चंदाचं प्रतिबिंब नदीत पडलं. त्या बिंबापासून दुसर्या काठापर्यंत प्रकाशाची सोनेरी वाट रेखली होती. हळूहळू तिचं रुपांतर रुपेरी वाटेत झालं. ''सुमित्रा, पाहिलंस समोर- ही चांदण्याची वाट.'' सुमित्रा त्या रुपेरी वाटांकडे पाहात होती...
..................
यातला पहिला उतारा आहे ना. सी. फडके यांच्या 'भरतीची लाट' या कादंबरीतला. दुसरा उतारा आहे मारुती चितमपल्ली यांच्या 'केशराचा पाऊस' या कथासंग्रहातला. फडके १९४० मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते; चितमपल्ली २००६मध्ये झालेल्या संमेलनाचे. या दोन संमेलनांतलं अंतर ६६ वर्षांचं. म्हणजे या दोघांच्या पिढीतलं अंतरही मोठंच की. पण मग वेगळ्या पिढींतल्या या दोघांचं लिखाण तसं सारखंच (वरकरणी) का वाटतं, असा प्रश्न हे दोन उतारे वाचून पडतो. त्यासोबत मनात प्रश्न उभा राहतो तो लेखकाच्या कालसुसंगतेचा. फडके काळाच्या पुढे होते म्हणायचं की चितमपल्ली मागे आहेत म्हणायचं? हे प्रश्न उभे राहण्याचे किंवा करण्याचे म्हणा, निमित्त आहे ते चितमपल्लींचं नवं पुस्तक...नवा कथासंग्रह 'केशराचा पाऊस'.
फडके आणि चितमपल्ली यांचे उतारे इथे दिले आहेत केवळ वानगीदाखल. एरवी या दोहोंच्या लिखाणांनी परस्परांशी सार्धम्य सांगावं, असं जवळपास काहीच नाही.
चितमपल्लींचं लिखाण जंगल व त्यातल्या सृष्टीवरचं. ललित अंगानं जाणारं. 'केशराचा पाऊस' हे त्याच धाटणीचं. त्यातल्या कथा 'आत्मपर' असल्याचा उल्लेख चितमपल्ली पुस्तकाच्या मनोगतात करतात. जंगलात आदिवासींसोबतची भटकंती, त्यांनी सांगितलेल्या लोककथा, दंतकथा, त्यांच्या श्रद्धा अशा 'सामुग्री'बाबत चितमपल्ली बोलतात. ही 'सामुग्री' 'केशराचा पाऊस'मध्ये दिसते. क्वचित कुठे ती मनाला भिडतेही. पण ही ताकद त्या आदिम आणि कालातीत अशा 'सामुग्रीचीच. पण त्याचं पुढे काय होतं? ही सामुग्री नुसती हाती लागून भागत नाही; तिचा कल्पक वापर, नेटकी बांधणी, स्वत:ची प्रतिभा, आवश्यक तिथे कारागिरी अशी आयुधं वापरून चिरेबंदी साहित्य निर्माण करावं लागतं. ही आयुधं योग्यरित्या वापरली नाहीत किंवा मग इतर घटक कमी पडले तर? तर सारंच भुसभुशीत होऊन जातं. 'केशराचा पाऊस' हे त्याचं उदाहरण ठरतं!
आदिवासींची गाणी, त्यांच्या प्रचलित कथा, दंतकथा यांना चितमपल्लींनी अधेमधे जोड दिली आहे पु.शि. रेगे, मंगेश पाडगावकर आदींच्या कवितांची... कबिराच्या दोह्यांची...जे. कृष्णमूतीर व इतर काहींच्या तत्त्वज्ञानाची. पण ही जोड भलतीच फसते आणि मग सारा मामला ठिगळीकरणाच्या पातळीवर पोचतो.
या कथासंग्रहातल्या कथांना बांधीव कथानक नाही. ढोबळ मानाने 'प्रेम' या संकल्पनेभोवती त्या फिरतात. ठोस कथानक नसताना कथांची बांधणी करायची तर त्यासाठी चिंतनाचं आणि ते चिंतन शब्दरूपात उतरवण्याचं मोठं सार्मथ्य लेखणीत असावं लागतं. चिंतन, मनन यांचा उल्लेख चितमपल्ली 'मनोगता'त करतात. त्यांच्या कथांतला नायक चिंतनाविषयी टिप्पणी करतो. नायिका नायकाच्या 'गूढरम्य' चिंतनाने 'थक्क' होतात, भारावून जातात. बस्स! इतकंच! प्रत्यक्षात कथांमध्ये 'चिंतन' शोधता शोधता दमायला होतं! काही अपवाद वगळता कुठेही कुठलाही आशय ठोसपणे उभा राहात नाही, रसनिष्पत्ती वगैरे तर दूरच. कथांमध्ये अचानक कुठे पुनर्जन्माविषयीचे उल्लेख येतात. त्या अनुषंगाने अत्यंत लटके वाटणारे संवाद वाचायला लागतात. हे कशासाठी? लिखाणाला केवळ गूढ, रोमॅंटिक डूब देण्यासाठी?
लिखाणात काही चुकीचे उल्लेख आहेत. 'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे' हे सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं, अरुण दाते यांच्या नावे घातलं आहे. रवींदनाथ टागोर यांच्या 'गीतांजली'मधल्या एका रचनेच्या अनुवादात, मूळ बंगाली 'करुणा' शब्दासाठी 'दु:ख' शब्द वापरला आहे. बंगालीतली 'करुणा' म्हणजे मराठीतलं 'दु:ख'? आणखी एका ठिकाणी 'क्षुब्ध' हा शब्द 'शांत' या अथीर योजला आहे.
' केशराचा पाऊस' म्हणजे वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या कथांचं संकलन आहे. अशा संकलनात पुनलेर्खन तसंच संपादकीय संस्कार करणं शक्य असतं आणि आवश्यकही. पण ते झालेलं नाही. 'कथेला टोक नाही...कथा बरी वाटावी...' असं सांगणार्या मंडळींची यथेच्छ टिंगल पूवीर केली गेली आणि आजही केली जाते. पण 'टोक' नसेल तर कथेची अवस्था काय होते, ते 'केशराचा पाऊस' वाचून समजतं!
- राजीव काळे
Loksatta Review
|
 |
 |
|