Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा
Author: रुतुजा दिवेकर
Publisher: अमेय प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $9.9 $7.92 20% OFF ( ~400 Pages, R325)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
नवर्‍याला मुठीत ठेवायचं असेल तर सुंदर दिसायला हवं आणि सुंदर म्हणजेच बारीक, स्लीमट्रीम. अगदी करीना कपूरची झिरो फिगर. हां, पण इथंच गल्लत होते. 'बारीक होण्यासाठी उपासमार करणार्‍या मुलींनो, करीना कपूरने झिरो फिगर उपासमार करून नाही, तर शरीराला आवश्यक ती पोषणमूल्य देऊन कमावली आहे', ऋजुता दिवेकर सांगतेय आपल्या 'विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा'मध्ये. अशाप्रकारे एक न्यूट्रिशिअनिस्ट म्हणून ऋजुताने संपूर्ण पुस्तकभर भारतीय महिलांची हजेरी घेतलेली आहे. संपूर्ण कुटुंबाला खाऊ-पिऊ घालणारी 'अन्नपूर्णा' स्वत:च्या आरोग्याशी मात्र क्रूरतेने खेळत असते. हे असंच वागण्याचं बाळकडू आजही आपल्या पिढीला मिळतंय का? आपल्या पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जातंय का? भारतीय बायकांच्या मन:स्थितीचा अचूक आढावा घेत या पुस्तकामध्ये वेटलॉस बाबतीतले गैरसमज मांडण्यात आलेले आहेत.
-- श्रद्धा दामले

Review courtesy of Maharashtra Times:
म. टा. १० Eप्रिल २०११
महिलांसाठी 'वेट लॉस तमाशा'
-- श्रद्धा दामले
'वधू पाहिजे उंच, सडपातळ, गोरी ...वगैरे वगैरे' हो, कुठल्याही क्लासिफाइड्समधल्या जोडीदाराच्या शोधासाठी असलेली ही अॅड. शिकलेली, डोकेबाज वगैरे वगैरेमध्ये. आधी येतात त्या सडपातळ आणि गोरी या अपेक्षा. म्हणूनच मग लग्नोत्सुक मुलींची जीममध्ये भलीमोठी गदीर असते. नवर्‍याला मुठीत ठेवायचं असेल तर सुंदर दिसायला हवं आणि सुंदर म्हणजेच बारीक, स्लीमट्रीम. अगदी करीना कपूरची झिरो फिगर. हां, पण इथंच गल्लत होते. 'बारीक होण्यासाठी उपासमार करणार्‍या मुलींनो, करीना कपूरने झिरो फिगर उपासमार करून नाही, तर शरीराला आवश्यक ती पोषणमूल्य देऊन कमावली आहे', ऋजुता दिवेकर सांगतेय आपल्या 'विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा'मध्ये. अशाप्रकारे एक न्यूट्रिशिअनिस्ट म्हणून ऋजुताने संपूर्ण पुस्तकभर भारतीय महिलांची हजेरी घेतलेली आहे. संपूर्ण कुटुंबाला खाऊ-पिऊ घालणारी 'अन्नपूर्णा' स्वत:च्या आरोग्याशी मात्र क्रूरतेने खेळत असते. हे असंच वागण्याचं बाळकडू आजही आपल्या पिढीला मिळतंय का? आपल्या पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जातंय का? याचं उत्तर 'हो', असेल, तर... तर प्लीज 'वेटलॉस तमाशा' एकदा वाचाच. भारतीय बायकांच्या मन:स्थितीचा अचूक आढावा घेत या पुस्तकामध्ये वेटलॉस बाबतीतले गैरसमज मांडण्यात आलेले आहेत.
तरूण मुलींपेक्षाही टीनएजमधल्या मुली आजकाल वजन वाढू न देण्यासाठी भयंकर प्रकार करत असतात. अशा प्रकारच्या क्रॅश डाएटने पुढील आयुष्य अधिक गुंतागुंतीचं होण्याची शक्यता कशी वाढते हे ऋजुताने विशद केलं आहे. टीनग्रुपनंतर नोकरी करणार्‍या तरूण मुली, लग्नानंतर संपूर्ण बदललेल्या लाइफस्टाइलशी जुळवून घेणार्‍या मुली, मुला-नवर्‍यापायी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणारी करिअरिस्ट विमेन आणि संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली गृहिणी अशा सगळ्याच स्तरावरच्या बायकांच्या सरसकट चुकीच्या आहारपद्धतीचं विश्लेषण विविध उदाहरणांमधून ऋजुताने केलं आहे. बाईच्या जीवनातले आई होणं, रजोनिवृत्ती असे टप्पेही शरीरावर परिणाम करत असतात. तर, लग्न ठरण्यासाठी जिमच्या वार्‍या करणार्‍या मुलींची संख्याही कमी नाही. बहुतांश आयांनाच मुलींच्या जाडेपणाचं भयंकर टेन्शन येतं आणि त्या सतत टोचून बोलून अघोरी डाएट फॉलो करण्यासाठी मुलींना भरीस पाडत असतात.
आयुष्यातल्या कुठल्याही बदलत्या टप्प्याबरोबर जुळवून घेण्यासाठी शरीराला पुरेशी पोषणमूल्यं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. कामवाल्या बाईपासून ते बिझनेस विमेनपर्यंत प्रत्येक बाई एक आदर्श भारतीय नारी म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असते आणि पर्यायाने स्वत:कडे दुर्लक्ष करत राहते, असं ऋजुता आपल्या पुस्तकात वारंवार मांडते. आपलं आयुष्य अत्यंत सळसळत्या उत्साहात घालवण्यासाठी भरपूर आणि पौष्टिक खाणं आणि योग्य समतोल व्यायाम हाच आग्रह ती धरते.
उत्तम ताजा आहार घ्या, फळं खा, वेळेवर आणि संपूर्ण भारतीय आहाराबरोबर केक, पनीर, चीजसुद्धा भरपूर खा असं सांगणारी ऋजुता नक्की न्यूट्रिशिअनिस्ट आहे ना असा प्रश्न काहीजणींना पडू शकतो. पण तिच्याकडे येणार्‍या क्लायंट्सच्या उदाहरणांतून ती हा आहार का योग्य आहे हे पटवून देण्यात यशस्वी झाली आहे. मुळात, बायकाच कसं स्वत:कडे दुर्लक्ष करतात याची उदाहरणं दर दहा बायकांपैकी आठजणींशी रिलेट करत असतात. यामुळे 'वेटलॉस..' वाचणार्‍या प्रत्येक बाईला हे आपलंच उदाहरण आहे असं वाटणं सहाजिक आहे. ते तसं वाटतंही.
ऋजुताने सामान्य पातळीवरील बाईलाही आपला वाटेल असा विषय निवडलाय खरा. ऋजुताची आई रेखा दिवेकर यांनीही मूळ इंग्रजी पुस्तकाचा चांगला अनुवाद करून ते मराठी महिलांपर्यंत पोचवलं आहे. हे पुस्तक वाचणारी प्रत्येक स्त्री ऋजुताकडे येणार्‍या क्लायंट्सशी स्वत:ची तुलना करायला लागते हेही खरंच. ऋजुताची भरमसाठ फी भरून सल्ला घेणार्‍या बहुतांश बायका या श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गातील आहेत. सगळ्यांनाच तिची फी परवडू शकत नाही. पण म्हणून पुस्तकातूनच ऋजुताचा सल्ला घेऊ, असं म्हणत कुणी पुस्तक हातात घेतलं, तर मात्र थोडीशी निराशा होण्याचीच शक्यता आहे. कारण प्रत्येक केसनुसार ऋजुताचा सल्ला वेगवेगळा आहेच. तसंच ऑलिव्ह ऑइल, दिवसांतून दोन दोन तासांचं खाणं तयार करणं, ज्युसेस, सुका मेवा असे एक ना अनेक पदार्थ प्रत्येकाला शक्य होतीलच असं नाही. ते करून देण्यासाठी लागणारं मनुष्यबळ, आथिर्क परिस्थिती याही महत्त्वाच्या गोष्टी आहेतच.
मात्र, भारतीय महिलावर्ग आपल्या आरोग्याशी कसा क्रुरपणे खेळत असतो, यासंबंधी डोळ्यात अंजन घालणारं असं हे पुस्तक आहे. ऋजुताचा सल्ला मिळो वा न मिळो पण हे पुस्तक वाचून आपण उत्तम आरोग्याचा विचार तरी करायला लागतो. अगदी कुठल्याही टप्प्यावर असलो तरीही!

Write your review for this book

Other works of रुतुजा दिवेकर
   लूज युवर वेट

Similar books:
  आरोग्य
   आयुष्मान भव !
   गुणकारी आहार
   आरोग्य योग
   वंशवेल
   एच. आय. व्ही आणि एड्स
   More ...  
  शैक्षणिक
   मुस्लिम मनाचा शोध
   उद्यमशलाका
   यमुनापर्यटन
   धार आणि काठ
   भाषणरंग: व्यासपीठ आणि रंगपीठ
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.