|
मराठी कादंबरी आस्वादयात्रा
Author: विजया राजाध्यक्ष
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $14.47 $11.57 20% OFF ( ~500 Pages, R475)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: २००३ साली मे महिन्यात नाशिक येथे "कादंबरी" या वाङ्यप्रकारावर आधारित एक शिबिर भरविण्यात आले होते. ज्या रसिक वाचकांना मराठी साहित्यात रस आहे, मराठी वाचनाची आवड आहे, पण मराठी त्यांच्या अभ्यासाचा विषय नाही अशा मंडळींसाठी खास करून हे शिबिर भरविण्यात आले होते. "स्वातंत्र्योत्तर काळातील कादंबरी" असा विषय ह्या शिबिरासाठी निश्चित करण्यात आला होता. यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळापासून २००१ पर्यंतच्या एकूण बत्तीस कादंबर्या निवडण्यात आल्या होत्या. त्यांपैकी एकतीस कादंबर्यांवरील समीक्षालेखांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. वसंत कानेटकरांची 'घर' (टिपणी-चंदकांत वर्तक), व्यंकटेश माडगूळकरांची 'बनगरवाडी' (दिगंबर पाध्ये), भालचंद नेमाडे यांची 'कोसला' (रंगनाथ पठारे), हमीद दलवाईंची 'इंधन' (एकनाथ पगार), श्याम मनोहर यांची 'हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव' (अरुणा दुभाषी), अशोक व्हटकर यांची '७२ मैल' (नागनाथ कोत्तापल्ले), अनिल दामले यांची 'गौतमची गोष्ट' (चंदकांत बांदिवडेकर), राजन गवस यांची 'तणकट' (भारती निरगुडकर) ही काही उदाहरणे. संपूर्ण यादी - घर, बनगरवाडी, ययाति, कोसला, चक्र, दुर्दम्य, गोतावळा, कुणा एकाची भ्रणगाथा, सिंहासन, टिकली येवढं तळं, रारंग ढांग, हे ईश्वरराव ... हे पुरुषोत्तमराव, प्रेपित, अमुकचे स्वातंत्र्य, ७२ मैल, झाडाझडती, डाळं, थांग आणि मुक्काम, खरेअस्तर, राघववेळ, गौतमची गोष्ट, तणकट, थॅंक यू मिस्टर ग्लाड, ताम्रपट, धग, स्वामी, इंधन, प्रवासी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, घरगंगेच्या काठी ह्या कादंबर्यांचा समावेश या पुस्तकात आहे.
Maharashtra Times Review
Other Links:
|
 |
 |
|