Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


एक असतो बिल्डर
Author: सुधीर निरगुडकर
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $4.79 $3.83 20% OFF ( ~200 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
शब्दांकन - शोभा बोंद्रे
ई-सकाळ रविवार ५ मार्च २००६
पायाभरणीचा अनुभव
(अनिल बळेल)

सुधीर निरगुडकर हे एक उल्हासी, उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. 'हात लावेल तेथे यश' असे वरदान काही व्यक्तींना लाभलेले असते. सुधीर निरगुडकर त्यातलेच! मात्र दूरून पाहणी करताना वाटतात तितके हे डोंगर साजरे नसतात. हे यश प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक आणि आलेल्या विपरीत अनुभवांतून मध्येच माघार न घेता मिळवावे लागते. सुधीर निरगुडकरांना ते कसे साधले आणि उत्तुंग इमारतींची उभारणी कशी केली, तेच 'एक असते बिल्डर' या पुस्तकात आले आहे. 'अमुक इतकी रक्कम पोलिसात वगैरे न कळविता तमुक ठिकाणी घेऊन या, अशा प्रकारे वारेमाप पैशांची लूट होणारे प्रसंग दूरचित्रवाणी मालिकांतून- चित्रपटांतून आपण पाहतो. पण अशा हादरून जाणार्‍या प्रसंगाला निरगुडकरांना प्रत्यक्षात सामोरे जावे लागले आहे. निमूट रक्कम देऊन मोकळे व्हावे असे वाटावे, अशीच ती दहशत असते. निरगुडकरही रक्कम घेऊन गेले खरे; पण त्यांनी पोलिसांना त्याची कल्पना देऊन ठेवली होती आणि पोलिसांनी त्यांनाही पत्ता लागू न देता शिताफीने त्या लुटारूंना पकडले होते, असे अंगावर काटा आणणार्‍या घटनाही निरगुडकरांच्या बाबतीत घडलेल्या आहेत.

निरगुडकर नुसते इमारती उभारण्यात गुंतून राहिलेले नाहीत. पुण्याजवळील शेतीतही त्यांनी तितकेच लक्ष घातले आहे. पुण्याजवळ असूनही तेथे शिक्षणाचा अभावच होता, तेव्हा तेथील शाळा शिक्षणाच्या दृष्टीने कशी परिपूर्ण होईल, तीत वाढ कशी होईल, हेही त्यांनी स्वत:चा केवळ पैसाच नव्हे, तर वेळ देऊनही बघितले आहे. पैसा द्यायचे तर त्यांना व्यसनच आहे; तेही स्वत:चे नाव त्या त्या ठिकाणी दिले जावे अशी अट न घालता. बांधकामव्यवसायाव्यतिरिक्त शेती, फळभाज्यांचा एक्सपोर्ट, डायमंडस आणि केटरिंग या सर्वांतून जी मिळकत होते, त्यातील स्वत:च्या व कुटुंबीयांच्या किमान जरुरीपुरतेच आपल्या जवळ ठेवून उरलेले सारे ते आपल्या फाऊंडेशनतर्फे गरजू संस्थांना देत असतात, त्याच्या विनियोगाबद्दलही दक्ष असतात.

'अनाहत यात्रा' हे सुधीर निरगुडकरांचे वेगळे आणि चिरस्वरूपात असे काम. समस्त निरगुडकरांचा- अगदी माहेरवाशिणींचाही शोध घेत ते साडेनऊशे वर्ष मागे गेलेत. त्यासाठी सारा देश पिंजून काढला आणि आता हज यात्रा शब्दांकितही केली. त्यासाठी त्यांना एक पुरस्कारही मिळाला.

अशी ही निरगुडकर यात्रा 'अतिशय रोमांचित व वाचनीय आहे. या वाचनीयतेचे श्रेय शोभा बेंद्रे यांनाही आहे. सुधीरजींनी जे समरसून सांगितले आहे, ते शोभाजींनीही तन्मयतेने शब्दबद्ध केले आहे.

Maharashtra Times Review

Write your review for this book

Other works of सुधीर निरगुडकर
   समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती
   माझा गणेशु
   ऋतू हिरवे सण बरवे

Similar books:
  आत्मचरित्र
   नाच ग घुमा
   माझी जन्मठेप
   गांधीहत्या आणि मी
   पोरवय
   स्वत:विषयी
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.