|
स्वयंसेवक
Author: नाथमाधव
Publisher: अथर्व पब्लिकेशन्स
|
|
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~370 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रस्तावना... 'देशकार्यासाठी खर्या कळकळीची माणसे लागतात, आणि अशा माणसांना 'स्वयंसेवक' म्हणतात...' आपली हिंदुस्थानवासी जनांची अवस्था सांप्रत सर्व प्रकारे अत्यंत हलाखीची झाली आहे. अशी स्थिती होण्यास जी निरनिराळी अनेक कारणे आहेत, त्यांत 'राजा कालस्य कारणम' हे कारण प्रमुख आहे, असे देशातील पुढारी जनतेचे मत आहे. तथापि सर्वच दोष राजाकडे जातो असे नाही. कारण एका हाताने टाळी वाजणे, केव्हाही शक्य नाही. आघात होण्याला दुसरी बाजू ही लागतेच ! ही दुसरी बाजू आपण पाहू गेलो तर स्वजनाचेच अत्यंत हिडीस चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे राहील, यात शंकाच नाही. ही दुसरी बाजू म्हणजे आपल्या लोकांना लागलेली चाकरी करून गुलामगिरीने भाकरी मिळविण्याची आवड, ज्ञानाची अवहेलना, स्वतंत्र उद्योगाची नावड, परस्थ व्यापार्यांची दलाली, जातिमत्सर, आळस, स्वार्थ, व्यसने वगैरे अनेक होत. ह्या प्रत्येक बाबीसंबंधाने आपल्या देशातील अधिकारी पुढारी आपल्या देशबांधवांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीतच आहेत. ही माझी कादंबरी ही व्यसनावर लिहिली आहे. परंतु अशी व्यसने पुष्कळच आहेत. त्यातील मद्य पान' हा एकच विषय घेऊन त्या मद्यपानाचा निषेध त्याच्या गळी उतरविण्याकरिता हा त्याला कादंबरीचा पेहराव चढविला आहे. सांप्रत आपणास आपल्या देशाच्या स्थितीपरत्वे अनेक कर्तव्य कर्मे करावयाची आहेत. ती आपण यथाशक्ती बरोबर रीतीने केली, तरच आपला तरणोपाय आहे. ह्या अनेक कामापैकी काही कामे आपणास स्वत:करिता करावयाची असतात, काही कामे आपल्या कुटुंबाकरिता, काही कामे आपल्या इष्टमित्रांकरिता आणि काही कामे साधारण आपल्या सर्व लोकांकरिता म्हणजे देशाकरिता करावयाची असतात. ही सर्वच कामे अगत्याची आहेत. परंतु देशाकरिता करावयाची म्हणून जी कामे आहेत, ती अत्यंत महत्त्वाची आहेत. असे देशहितेच्छू म्हणतात. कारण ती कामे जर मनुष्याने बरोबर रीतीने केली तर बाकीची सर्व कामे केल्याचे श्रेय त्यात येते. आता यातील कोणती कामे प्रथम केली पाहिजेत याविषयी वाद घालण्याचे हे स्थळ नव्हे. तथापि इतकी गोष्ट मात्र खरी की, ज्या देशात आपले कर्तव्य खर्या कळकळीने करणारे स्वयंसेवक पुष्कळ असतात. त्याच देशाची भरभराट होते. नुसते देशाभिमानावर, निबंध लिहून किंवा व्याख्याने देऊन बर्तमानपत्रांतून 'देशभक्त' ही पदवी मिळवणारे लोक स्वार्थरहीत आपापल्या सामर्थ्याप्रमाणे देशहिताच्या संबंधाने आपले कर्तव्य करणार नाहीत, तर त्यापासून काही उपयोग नाही. खर्या कळकळीने आपल्या देशाच्या संबंधाने कर्तव्य करणारी स्वयंसेवक मंडळी सध्या आमच्या देशात जरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत, तरी त्यांनी निराश होता उपयोगी नाही. कारण सांप्रत आमच्या देशस्थितीचे जहाज विसाव्या शतकाच्या भयंकर वादळात सापडले आहे, ते सुरक्षित थडीला लावण्यासाठी दिवसेंदिवस नवीन नवीन नावाडी तयार होत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. काही दिवसांनी हे नवीन स्वयंसेवक त्यांच्या कष्टाचे वाटेकरी होतील. अशी आमची खात्री आहे. प्रस्तुत कादंबरीच्या विषयासंबंधाने लिहावयाचे म्हणून आपल्या दयाळू इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले, त्या १९१८ साली मुंबई इलाख्याचे अबकारी उत्पन्न शून्य होते, परंतु आज दारूचे उत्पन्न १०,००,००,००० रुपयांवर मा. ह्या इलाख्याच्या उत्पन्नाचे आकडे पाहिले म्हणजे छातीत धडकीच भरते. मान आपल्या देशातील धनाचा निरर्थक किती हास होत आहे. हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. प्राचीन हिंदुस्थानात मद्य होते. परंतु दारूच्या R) ज्या भयंकर खपाकडे पाहिले म्हणजे इंग्रजी अमदनीच्या पूर्वी त्यांचे मान अगदी क्षुल्लक होते. महाराष्ट्रात तर दारू अज्ञातच होती. त्याला प्रमाण एल्फिस्टन साहेबांचा अभिप्रायच आहे. ते म्हणतात, 'ड्रिन्क wअस अल्मोस्त उन्क्र्रोwन इन ंिन्रश्त्र !' परंतु पुढे इंग्रजी अमदानीत दारू वाटेल त्याने पिण्याचे सत्र सर्वत्र सुरू झाल्यामुळे अबकारीचे उत्पन्न 'शून्यावरून कोट्या वर वाढले आणि आमचे लोक पूर्ण दारूबाज बनले. हाय ! हाय ! काय ही आमच्या देशाची शोचनीय अवस्था...! ही एक विवशी आमच्या घरात पूर्णपणे शिरली आहे. हिला शेकडो नव्हे हजारो नव्हे तर लाखो देशबांधव बळी पहून सर्वपरी नाश करून घेत आहेत. हे प्रत्यक्ष दिसत असूनही आणि कोट्यवधी रुपयांचा हास होत आहे, हे कळूनही आमच्या हृदयाला आच लागत नाही, याचे जर काही कारण असेल, तर आमच्या लोकांची ह्या मद्यपानापासून सुटण्याची इच्छाच नाही. असे म्हणावे लागते. आम्ही कितीही सभा भरवल्या आणि मद्यपाननिषेधक वचने म्हणून व्याख्याने दिली, तरी मनोनिग्रहाशिवाय मद्यप्राशनाचा प्रसार कमी व्हावयाचा नाही. सरकार काही करीत नाही, तेव्हा आपणच ह्या भयंकर शत्रूपासून आपल्या शरीराचा, लौकिकाचा, धनाचा, कुटुंबाचा आणि देशाचा बचाव करण्याकरिता मनाचा दृढनिश्चय केला पाहिजे. मद्याचे वाईट परिणाम लक्षात आणून आपण वेळीच सावध झाले पाहिजे. ह्या व्यसनाला उच्च वर्ग, मध्यम वर्ग, आणि कनिष्ठ वर्ग कसा बळी पडतो, हे दाखविण्याकरिता आपल्या समाजातील तीन चित्रे प्रस्तुत कादंबरीत मी रेखाटली आहेत. ह्या तिन्ही वर्गांचे मत दारू नको' असेच आहे. पण हे मत मृत स्थितीत कसे आहे हे दाखविण्याचा मी प्रयत्न केला असून त्याला जिवंतपणा आणण्यासाठी सद्बुद्धिप्रेरित कळकळीचे प्रयत्न कसे व्हावयास पाहिजेत हे दाखविले आहे. शंभरापैकी शंभर माणसे जेव्हा स्वयंस्फूर्तीने ह्या मद्यपानाचा निषेध करण्यास पुढे सरसावतील तेव्हाच आपल्या राष्ट्रोन्नतीचे पाऊल पुढे पडेल, आपल्या उद्योगधंद्यांची बढती होईल, शेतीची सुधारणा होईल, विद्वानात कर्तबगारी येईल आणि सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळी करणार्या पुढारी मंडळीच्या प्रयत्नास यश येईल. नाथ माधव
|
 |
 |
|