Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ
Author: बाळ राणे
Publisher: मुद्रा प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $7.46 $5.96 20% OFF ( ~350 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Review courtesy of Loksatta:
रविवार, २१ ऑगस्ट २००५
संतपरंपरेचा तेजस्वी पाईक

महाराष्टरला काही शतकांची संतपरंपरा असून गेल्या शतकातही संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, शेगावचे गजानन महाराज अशा संतांनी समाजाला एक नवे वळण दिले, नवी दिशा दिली. या सर्व संतांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी कर्मकांडांचा पुरस्कार न करता, तत्कालीन समाजाला नेटका प्रपंच करण्याची शिकवण दिली. काम, स्वच्छता यांचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले. संत गाडगे महाराज तर स्वत: झाडू घेऊनच जातील. त्या गावी स्वच्छता करीत असत, हा इतिहास सर्वांनाच ठूक आहे. अशाच संतपरंपरेत आणखी एक संत होऊन गेले आणि ते म्हणजे, श्री गुलाबराव महाराज. आपल्या वर्‍हाडाने महाराष्टरला जे संत दिले, त्यापैकीच एक म्हणजे गुलाबराव महाराज. आपली दृष्टी गमावलेल्या गुलाबराव महाराजांना ज्ञानाची मात्र दिव्यदृष्टी लाभली होती आणि त्यामधून त्यांनी प्रबोधनपर अशा १३३ ग्रंथांची निर्मिती केली तीही त्यांना प्राप्त झालेल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात! गुलाबराव महाराजांनीही समाजाला कर्मकांडात न अडकवता प्रपंचाच नेटका सल्ला दिला. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. महाराजांचे हे सर्व कतरृत्व बाळ राणे यांनी 'प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ' या चरित्रग्रंथाद्वारे आपल्यापुढे मांडले आहे.
वरती म्हटल्याप्रमाणे आपली दैनंदिन कामे न सोडता महाराजांनी कसे समाजकार्य केले याची अनेक उदाहरणे या ग्रंथाद्वारे वाचायला मिळतात. त्यामागे होती दुर्दम्य विचारशक्ती आणि अध्यात्माची नेटकी बैठक! तत्कालीन तथाकथित भोंदू बाबा महाराजांच्या भोंदूगिरीवरही गुलाबराव महाराजांनी कोरडे ओढले आहेत. ही बाब आजच्या समाजाच्याही डोळयात अंजन घालणारी ठरावी. जगदगुरु शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात केलेल्या ग्रंथनिर्मितीमुळे संत ज्ञानेश्वरांचीच आठवण होते. इतर संतांच्या कार्याच्या तुलनेत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या या महाराजांची ओळख या ग्रंथामुळे होते.

अभय जोशी

Write your review for this book

Other works of बाळ राणे
   महासागर
   आकाशगंगा
   आयुष्य नावाचं महाकाव्य
   दक्षिण आफ्रिका : गाथा स्वातंत्र्याची
   यज्ञकुंड

Similar books:
  चरित्र
   राजा शिवछत्रपति
   जवाहरलाल नेहरू
   कहाणी लंडनच्या आजीबाईंची
   कान्होजी आंग्रे
   महानायक
   More ...  
  धार्मिक
   समर्थ रामदास विवेक दर्शन
   श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी
   संस्कारधन
   राष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव
   सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.