|
करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी
Author: डॉ. रा. चिं. ढेरे
Publisher: पद्मगंधा प्रकाशन
|
|
Price: $14.62 $11.69 20% OFF ( ~410 Pages, R480)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एका भारतीय ख्यातीच्या शक्तिपीठाची अधिष्ठात्री देवता आहे; आणि विशेष लक्षणीय बाब ही आहे की, तिच्या अनेक ठाण्यांत तुळजाभवानीप्रमाणेच ती महिषमदिर्नीच्या रूपातही पूजली जात आहे. कोल्हापूरच्या जगदंबेच्या रूपाचा सर्वांगीण वेध ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनी या ग्रंथात घेतला आहे.
Review courtesy of Maharashtra Times: म. टा. १९ Jउलै २००९ श्रीजगदंबेचे अक्षरपूजन कोल्हापूरच्या जगदंबेच्या रूपाचा सर्वांगीण वेध ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनी 'करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी ' या ग्रंथात घेतला आहे. 'पद्मगंधा प्रकाशना'च्या या ग्रंथाचे विमोचन मंगळवारी (२१ जुलै) पुण्यात होत आहे. याच दिवशी रा. चिं. ढेरे वयाच्या ऐंशीव्या घरात पाऊल टाकत आहेत. या गंथातले त्यांचे हे मनोगत. ............ आषाढी अमावास्या हा आपल्या परंपरेत घरातील सर्व दीपपात्रे लखलखीत करून, देवघरात दिवे उजळून पुजण्याचा दिवस. या दीपपूजेच्या सुमुहूर्तावर मीही अक्षरांचे लक्ष दिवे प्रज्वलित करून कोल्हापूरच्या श्रीजगदंबेची महापूजा वाचकांच्या साक्षीने मांडली आहे. कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एका भारतीय ख्यातीच्या शक्तिपीठाची अधिष्ठात्री देवता आहे; आणि विशेष लक्षणीय बाब ही आहे की, तिच्या अनेक ठाण्यांत तुळजाभवानीप्रमाणेच ती महिषमदिर्नीच्या रूपातही पूजली जात आहे. करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीचे हे अक्षरपूजन करण्याचा संकल्प सोडल्यापासून, गेल्या दोन वर्षांत मी कर्नाटकात काही शोधयात्रा केल्या; काही देवीस्थानांची दर्शने घेतली; अनेक जाणकारांशी संवाद साधला; काही अलक्षित शोधसाधने अभ्यासली. मातबर पूर्वसूरींचे संशोधन आणि विवेचन पैतृक वारसा म्हणून स्वीकारताना, त्याचे परीक्षण-परिष्करण करण्याचे स्वातंत्र्य (त्यांच्याविषयीचा आदर जागा ठेवून) वापरले आणि त्यांचा वारसा यथाशक्य समृद्ध करण्याचा विनम्र प्रयत्न करीत राहिलो. 'अवसेच्या राती नक्षत्रांच्या ज्योती' उजळविताना खूप ताण सोसावे लागले. आनंदही लाभला. हे करताना माझ्या मर्यादांमुळे, महाराष्ट्रातील अनेक देवीस्थानांची यात्रा मी स्वत: करू शकलो नाही. माझ्यासाठी माझ्या मुलांनी आणि मला मुलांप्रमाणे असणार्या, जिव्हाळ्याच्या तरुणांनी ही यात्रा केली. काही स्थाने माझ्या स्नेही मंडळींनी अभ्यासली होती. त्यांनी जे पाहिले-लिहिले, ते त्यांनी आवर्जून माझ्यापर्यंत झीज सोसून पोचवले. स्वत: न जाता, इतरांच्या दृष्टीतून प्राप्त झालेली शोधसामग्री वापरताना अनेकदा आपण चकव्यात सापडतो; काही गफलतीही होतात. अशा गफलतींचा अनुभव अनेक संशोधकांना पूवीर आला आहे. कदाचित मी त्याला अपवाद असणार नाही. साधनांबाबतही (दोन-चार कटू अनुभव वगळता) परिचित-अपरिचितांनी उत्तम प्रतिसाद दिला. काहींनी तर ओळखपाळख नसताना स्वयंस्फूतीर्नेच सहयोग दिला. जे माझ्या हातीं पडले आहे, त्या सर्वांचा वापर मी करू शकलो नाही; ज्या अज्ञाताकडे संकेत केला गेला होता, त्या दिशांना मी सर्वत्र जाऊ शकलो नाही; ज्याचा समावेश सविस्तर करायचे ठरविले होते, त्याचा अनेक जागी संक्षेपच करावा लागला आहे. या ग्रंथात सर्वत्र माझी भावनिक आणि वैचारिक मनोगते विखुरलेली आहेत. किंबहुना, या प्रकृतीच्या माझ्या सर्वच ग्रंथांप्रमाणे हा ही ग्रंथ भावस्निग्ध मनोगतात भिजलेल्या संशोधनानेच अक्षररूप पावला आहे. हे वास्तव कदाचित माझ्या मर्यादांचे द्योतक असेल-कदाचित माझ्या सार्मथ्याचे निदर्शक असेल. यासंबंधी निर्णय करण्याचे वाचकांचे स्वातंत्र्य मी कसे नाकारू? आता माझ्या शक्ती फार उणावल्या आहेत. नवे कोणतेही आश्वासन मी माझ्या वाचकांना देऊ शकत नाही. भाग्यवशात काही भले घडले, तर ते तुमच्यापुढे येत राहीलच; घडू शकले नाही, तर आजवर अज्ञात शक्तीने माझ्या हातून घडविले, तेवढे प्रेमाने स्वीकारून, वाचकांनी मला क्षमा करावी. मी १९५५ पासून गेली ५५ वषेर कोल्हापूरला वारंवार जात राहिलो आहे आणि श्रीजगदंबेच्या चरणसान्निध्यात अपूर्व सुखाचा अनुभव घेत राहिलो आहे. कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी ही माझ्या मातुल घराण्याची कुलस्वामिनी. माझे धाकटे मामा हयात असेपर्यंत वर्षभरातील सर्व कुळधर्मांत तळी भरताना तिचे स्मरण उदोकाराने गाजत राहिले. १० मे १९५१ या दिवशी वाई क्षेत्रात कृष्णेकाठी मामांचे अकाली निधन झाले आणि त्यांच्या घरचे सारे कुळधर्म खंडित झाले. वृद्ध आजीने उद्धवस्त मनस्थितीत सर्व कुलदैवतांचे टाक स्वहस्ते मुठेच्या प्रवाहात विसजिर्त केले. खरे तर त्यांची स्थूल मूतिर्रूपेच मुठेत विसजिर्त झाली आणि त्यांचे प्राणतत्त्व माझ्या अक्षरांच्या अक्षय देव्हार्यात येऊन विसावले; त्यांना चैतन्याचा स्पर्श घडवीत राहिले. तेव्हापासून मी नितांत निष्ठेने त्यांचे कुळधर्म, लेखणीची दिवटी-बुधली हाती धरून सतत साजरे करीत राहिलो आहे. त्यांच्या कृपेची पाखर माझ्या मस्तकावर निरंतर आहे.
|
 |
 |
|