|
माझी वाटचाल : मेटकॉफ हाउस ते राजभवन १९५२ - १९८९
Author: राम प्रधान
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $15.23 $12.18 20% OFF ( ~470 Pages, R500)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हे माजी सनदी अधिकारी आणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक वाटचालीचा आढावा घेतला आहे. प्रधान यांचा जन्म २७ जून १९२८ रोजी मुंबईत दादर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय मिलिटरी अकाउन्ट्समध्ये क्लार्व होते. त्यांचे आजोळ नागोठाणे येथे होते. राम प्रधान यांचं मुंबईतील बालपण, त्यानंतर त्यांच्या वडिलांना सुपरिंटेन्डंट पदावर बढती मिळून त्यांची दिल्लीला झालेली बदली, त्यानंतर दिल्लीतील वास्तव्याचे अनुभव, असिस्टंट अकाउन्ट जनरल म्हणून त्यांच्या वडिलांची दिल्लीहून पुण्याला झालेली बदली, पुण्यात न्यू इंग्लिश स्वूल, नानावाडा येथे त्यांचं झालेलं शालेय शिक्षण, त्यानंतर फग्युर्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण, गणित घेऊन बी. ए. केल्यानंतर मुंबईला एम. ए. (संख्याशास्त्र )साठी घेतलेला प्रवेश; पण आईच्या आजारपणामुळे एम.ए. अध्र्यावरच सोडावं लगणं, त्यानंतर आईचा झालेला मृत्यू, त्यानंतर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत नॅशनल सॅम्पल सव्र्हेच्या प्रकल्पात काम करण्यासाठी रुजू होणे, त्याचदरम्यान स्पर्धा परीक्षेला बसण्याचा घेतलेला निर्णय आणि आय.सी.एस. झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी दिल्लीच्या मेटकॉफ हाऊसमध्ये मिळालेला प्रवेश या टप्प्यापर्यंतची वाटचाल सुरुवातीला प्रधानांनी सांगितली आहे. यानंतर आय.सी.एस. प्रशिक्षणादरम्यानचे अनुभव त्यांनी कथन केले आहेत. त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना व्याख्यान द्यायला आलेले नामवंत उच्चपदस्थ, त्यापैकी लक्षात राहिलेल्या व्यक्ती आणि त्यांची व्याख्यानं, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून दिल्लीच्या आसपासच्या विविध गावांना दिलेल्या भेटीतून प्रशासकीय अधिकाण्यांसमोर कोणती आव्हानं असतात, याचा आलेला प्रत्यय आणि प्रशिक्षणातील इतर बाबींबाबतही त्यांनी तपशीलवारपणे लिहिलं आहे. प्रशिक्षणाचाच भाग म्हणून भारतीय सैन्याबरोबर घालवलेल्या काही दिवसांबाबतही त्यांनी तपशीलाने लिहिलं आहे. त्यादरम्यान त्यांच्यावर ओढवलेल्या जीवघेण्या संकटांबद्दल त्यांनी सांगितलं आहे. प्रशिक्षणासाठी केलेल्या देशाटनाचे विविध अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात १५ ऑगस्टचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि २६ जानेवारीची परेड यासाठी तिन्ही सैन्यदलांच्या अकिअण्यांबरोबर केलेलं काम, संसद भवनात घालवलेले काही दिवस, प्रशिक्षण सुरू असतानाच गडकण्यांच्या मुलीशी विवाह करण्याचा घेतलेला निर्णय इ. घटनांबाबत त्यांनी लिहिले आहे आणि त्यांच्या वडिलांना आणि भावंडांना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचाही त्यांनी समावेश केला आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर ते मुंबईला राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. त्या सेवेत आलेले अनुभव आणि ती सेवा बजावत असताना भेटलेल्या महत्त्वाच्या आणि इतर व्यक्ती यांच्याबाबत त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. तसेच तेथील वास्तव्यात भेटलेल्या व्यक्तींविषयी, त्यातील काहींशी जुळलेल्या ऋणानुबंधांविषयीही त्यांनी लिहिले आहे. छोट्या गावांमध्ये कामासाठी केलेली भटकंती, भटकंती करत असताना पत्नीबरोबरचे सहजीवन आणि त्या भटकंतीतील वेगवेगळे अनुभव याबद्दल त्यांनी निवेदन केलं आहे.
|
 |
 |
|