|
बहिणा
Author: प्र. न. जोशी
Publisher: स्नेहवर्धन प्रकाशन
|
|
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~104 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार १२ ऑकटोबर २००३
स्त्री-संताची केवळ दखल
वारकरी पंथातील संतमंडळींच्या नामावलीत आपल्याला स्त्री-संतांचीही नावे घ्यावी लागतात. मुक्ताई तर सार्यांच्या परिचयाचीच, संत सखूही. बहिणाबाई ही तुकोबांची शिष्या. साडेतीनशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने आख्यान लावणे, अभंग रचणे, ते गाणे हे पापच मानलं जाई. त्या काळात या स्त्री-संतांनी ईशस्तुतीचा आपला मार्ग सोडला नाही. सखू किंवा मुक्ताई यांच्याबद्दलच्या कथा लोकांस परिचित आहेत. पण बहिणाई मात्र तशी दूरच ठेवली गेली. बहिणाईच्या चरित्रावर आधारित कादंबरी लिहून प्र. न. जोशी यांनी ही उणीव दूर केली आहे.
बहिणाबाईचा जन्म आऊजी कुलकर्णी यांच्या पोटी झाला. लहानपणापासूनच चूलबोळकी मांडून भातुकली खेळण्यापेक्षा तिला अभंग-स्तोत्रे आणि जप करणेच जास्त आवडायचे. पोरवयातच ती ध्यान करण्यात तल्लीन व्हायची. त्या ध्यानावेळी कैलासावर हिंडून आल्याच्या कहाण्या ती सांगत असे. या मुलीचे कसे होणार, याची काळजी तिच्या आई-वडिलांना लागली होती. वयाच्या पाचव्या वर्षी तिचे लग्न तीस वर्षं वयाच्या रत्नाकर पाठकांशी झाले. नवरा सनातनी आणि कटकट्या स्वभावाचा. देवाधर्माचे, सोवळ्याचे सारे सोपस्कार बहिणाई नेमाने पार पाडे.
रत्नाकर पाठक तिला संस्कृत स्तोत्रे शिकवीत. पण त्यांना उलट प्रश्नोत्तरे केलेली चालत नसत. पुढे प्रसंगवशात आऊजी कुलकर्ण्यांना घरदार सोडावे लागले. नंतर सातार्याजवळ रहिमतपुरास रत्नाकर पाठकांनी आपले बस्तान बसवले. येथेच विठ्ठल मंदिरात बहिणाने ज्ञानेश्वरी वाचन व निरुपण सुरु केले. पतीने ते रागे भरुन बंद करावयास लावले. ते गाव सोडून कोल्हापुरास वास करणे झाले. हळूहळू पतीच्या कर्मठ व सनातनी वृत्तीचा बहिणास जाच होऊ लागला. पण बहिणा आपले मन गाई-वासराच्या संगोपनात रमवत राही. हे वासरु एकदा जयरामस्वामींची कथा ऐकण्यासाठी बहिणाईसोबत मंदिरात येऊन प्रवचनास बसले होते, म्हणतात. बहिणाईच्या हरिभक्तीबद्दलचा राग रत्नाकर पाठकांच्या मनात वाढतच गेला. तशातच तुकोबांनी बहिणाईला तिच्या स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. बहिणाईने तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. रागाने पती घर सोडून जाण्याची भाषा करु लागताच बहिणेचे मन द्विधा झाले खरे, पण हरिभक्तीचा मार्ग तिला सोडवेना. अखेर रत्नाकर पाठकास उपरती झाली आणि तोही विठ्ठलनामात रंगून गेला. बहिणाईचे उरलेले आयुष्य नामस्मरणात व मंदिरात प्रवचन करण्यात कृतार्थ झाले.
बहिणाबाईंच्या उभ्या आयुष्याचा हा डोलारा लेखकाने संक्षेपाने रेखाटला आहे. हे चरित्र नाही, चरित्रात्मक कादंबरिका आहे, चरित्र नायिकेच्या आयुष्याचा हा सखोल वेध नाही, तर केवळ दाखला आहे. बहिणाईला आपल्या अंत:समयी मागचे बारा जन्म आठवले, म्हणतात. त्यांची परिशिष्टामध्ये सविस्तर चर्चा केली आहे, ती अप्रस्तुत वाटते. संदर्भाची सूची अशा लेखनाला विश्वासार्हता प्राप्त करुन देत असते. ती सूचीही यात दिलेली नाही.
एका संत-स्त्रीची ओळख करुन घेण्यासाठी हे पुस्तक नककीच वाचायला हवे.
|
 |
 |
|