|
नाच ग घुमा
Author: माधवी देसाई
Publisher: इंद्रायणी साहित्य प्रकाशन
|
|
Price: $9.14 $7.31 20% OFF ( ~272 Pages, R300)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: साहित्यिक भावनेवर जगतात, भावुक लेखन करतात, पण वेळ आली तर कायद्याचा कठोर आधारही घेतात. मोठी, समाजमान्य, प्रतिष्ठित माणसं जे वागतात, त्यांना अनेक प्रकारे आपल्या कृतीचं समर्थन करता येतं. कारण ते शब्दसृष्टीचे ईश्वर असतात, लोकप्रियतेचं वलय त्यांच्याभोवती असतं. माझं त्यांच्याशी लागलेलं 'भावनेचं' लगन आहे असच मी मानते. आम्ही सामान्य माणसं साहित्यावर, सौंदर्यावर, सत्यावर निखळ प्रेम करतो. आम्हाला कायदा समजत नसतो; पण भावना जपण्याचं सामर्थ्य मात्र आमच्यात जरूर असतं.
'प्रेम' या शब्दाचं नेमकं रूप आमच्या मनात लेखकांनीच उभं केलेलं असतं. काव्यातून आम्ही निसर्ग अनुभवत असतो. 'हिरवेगार गालिचे' न बघताही मनाची 'फुलराणी' झालेली असते.
माझ्या दृष्टीने 'स्वामी' मधली रमा-माधव यांची प्रेमकथा, ही एक आदर्श प्रेमकथा असते. मी 'ते' प्रेम प्रत्यक्ष जीवनात शोधत बसते. त्याचं अनुकरण करण्यासाठी धडपडत असते. प्रेमावर माझा अपार विश्वास असतो आणि एक दिवस प्रचंड धक्का बसतो, तडाच जातो त्या विश्वासाला, श्रद्धेला, भावनांना! आणि त्या दिवशी मला आठवायला लागतात, माझीच अनेक रूपं! कुमारी, सुवासिनी, माता, विधवा, पुन्हा सुवासिनी आणि आता घटस्फोटिता, परित्यक्ता! या रूपात मी अनेक साज ल्यायले, नाचत राहिले. सभोवतीचे सारे गात होते, ताल धरत होते, अंगणं बदलत होती, पण मी मात्र तीच होते. बेळगाव, पुणे, कोल्हापूर, गोवा, मुंबई, कोवाड अन आता पुन्हा बेळगाव! किती गावं? किती रूपं? 'नाच ग घुमा'चा ताल मात्र तोच!
"मी अशी - मी तशी -"
आता गळ्यात सौभाग्य अलंकार नाही. पण ... मात्र कपाळावर लाल भडक कुंकू आहे. ती निशाणी आहे माझ्या प्रिय हिंदुधर्माची! बदलत गेलेल्या भारतीय स्त्रीजीवनाची, कपाळावरची ती रक्तरंजित खूण - मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची, दु:खाची अन मोहाचीही! .. एका कोमल भावुक रक्तकमळाची! जे प्रत्येक भारतीय स्त्रीयेच्या कपाळावर जन्मापासून रेखाटलेलं आहे!
Reader Comments: गजानन भागवत writes on Thu Feb 21 17:08:32 2019: अशी अनेक जण बोलती होतील आणि वास्तव म्हणजे काय याचे दाहक चित्रण सर्वांसमोर येईल Mahadev Hegade writes on Wed Nov 18 14:48:35 2015: Aganipankhsadanand writes on Wed Jan 19 12:36:14 2005: I had read this book 6 to 7 years back. But still i can't forget the impact of this book. Its fantastic.
|
 |
 |
|