|
गारंबीचा बापू
Author: श्री. ना. पेंडसे
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~227 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: सपाट बापू पुलावर हॉटेल चालवू लागला, तेव्हा गारंबीला भोगमय जीवनाचं दर्शन घडू लागलं. त्याचा उधळा स्वभाव - अण्णा खोत चिडत, चरफडत. पण करतात काय? एकुलता एक जावई. बायकांना दंड लावलेली लुगडी ज्यांच्या नेसावी लागत, त्यांच्याच घरात मॅंचेस्टरची तलम धोतरं सपाट बापू सर्वांच्या नाकावर टिच्चून वापरी.
पण जगावं कसं, याचे धडकीबाज पाठ देणारा वीर दुसराच होता. अफाट बापू! गारंबीतले हे दोन बापू आपापल्या परीनं बरेच गाजले. दोन बापूंतला फरक दाखवण्याकरता त्यांना ही नावं मिळाली होती. 'अफाट' नाव ठेवण्यात गारंबीनं विलक्षण मार्मिकता दाखवली यात शंका नाही. या बापूचं सारचं अफाट होतं. त्यानं पैसा मिळवला, पैसा उधळला, दुसर्याकरता पैसा खर्च केला. व्यसनं केली, लग्नबाह्य संबंध ठेवला. आणि हे सारं अफाट होतं. पैसा कसा खर्च करावा, याचे वस्तुपाठ म्हणजे बापूचं जीवन होतं.
अफाट बापूकडून गारंबी काहीच शिकली नाही. वणद्याच्या पाटासारखा पैशाचा पाट बापूनं गारंबीत आणून सोडला; पण गारंबी बापूकडे शुंभासारखी पहात राहिली. बापूला वळण लावण्याचं सामर्थ्य तिनं दाखवलं नाही.
हे दोन बापू गारंबीला नवं जीवन, नवी दृष्टी द्यायला असमर्थ ठरले, याचं कारण काय? गारंबीची माती, हवा, पाणी - सार्यांचाच तो दोष होता, असं म्हणाव लागतं. त्रिकोणातले लोक असचं मानतात. गारंबीत स्थायिक होणारा माणूस अंती गारंबीसारखाच व्हायचा हा आडाखा होता. वणद्याच्या पाटाचा तो प्रभाव होता. त्याचं पाणीच तसं. ते ज्याच्या पोटात जाईल, त्याला त्यानं आपल्या पोटात घेतलंच!
Reader Comments: Bhakti koli writes on Mon Dec 14 05:38:17 2020: MarathiNilesh Oak writes on Thu Jul 8 08:04:52 1999: Must read for those interested in description of village
life in Konkan. It's english translation is also available
"Wild Bapu of Garambhi" and is excellent.
|
 |
 |
|