|
टायगर हेवन
Author: बिली अर्जनसिंग
Publisher: आरती प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~200 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: १९५९ सालची गोष्ट आहे. मे महिन्यातल्या एका कोवळ्या सकाळीच मी माझ्या हत्तीणीवर - भगवान प्यारीवर - बसून नेपाळ सीमेलगत पसरलेल्या जंगलपट्टात पोहोचण्यासाठी माझ्या फार्मवरून निघालो. दिवस अगदी स्वच्छ उन्हाचा व जरा उष्णच होता आणि समोरच्या गवताळ पठारापलीकडे सात मैलांवरच्या जंगल रेषेपासून वर वर चढत गेलेल्या हिमालयाच्या रांगा दिमाखात उभ्या होत्या. मी अगदी आरामात माहुताच्या मागे बसलो होतो व माझा कुत्रा पिंचा - हत्तीणीच्या सावलीमधून चालत होता. पिंचा फार पायात घोटाळतोय असं वाटल्यावर भगवान प्यारीने अधेमधे लाथा झाडल्या तर त्या चुकवताना पिंचाची तारांबळ होत होती. जवळजवळ तासभर आम्ही शेताडीतून, सकाळी तिथं कामाला येणार्या शेतकर्यांकडे बघत बघत चाललो होतो.
म. टा. ८ जानेवारी २०१२ रोमहर्षक जंगलसफारी वाढती लोकसंख्या, जंगलतोड, वाढत्या लोकसंख्येला अन्न मिळावं यासाठी लागवडीखाली येणारी जमीन अशा मानवनिमिर्त समस्यांमुळे वन्य प्राण्यांचं क्षेत्र कमी होऊ लागलं आणि त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. हिमालयाच्या पायथ्यापासून ते नेपाळच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या दाट जंगलाचा आणि जंगली प्राण्यांचा विनाश पाहूनच एकेकाळचे शिकारी अर्जनसिंग यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी प्राण्यांच्या रक्षणाकरता अभयारण्यच उभारण्याचं ठरवलं. शिकारी ते संरक्षणवादी असा त्यांचा झालेला विलक्षण प्रवास आणि त्या प्रयत्नांतून झालेली 'दुधवा अभयारण्या'ची उभारणी 'टायगर हेवन'मध्ये आहे. आज दुधवा राष्ट्रीय अभयारण्य दिसतंय ते केवळ अर्जनसिंग यांच्या अथक प्रयत्नांमुळेच. इंदिरा गांधींनी १९७२मध्ये व्याघ्रप्रकल्प व राष्ट्रीय उद्यान जाहीर करण्याआधीची ही कथा आहे. या पुस्तकात लेखक वाचकाला स्वत:बरोबर जंगलात घेऊन जातो. वन्य प्राण्यांच्या सवयी, लकबी, तेथील निसर्ग यांची ओळख करून देतो आणि जंगलसफरीचं अफलातून दर्शन घडवतो. मूळ पुस्तक मराठीतच लिहिलं असावं, असं वाटण्याइतकं ओघवतं भाषांतर विश्वास भावे यांनी केलं आहे. वन्य प्राण्यांचं संरक्षण व संवर्धन म्हणजे केवळ शिकारीवर बंदी नव्हे, तर त्यांचा अधिवास संरक्षित करणे. त्यांना लागणार्या इतर गोष्टी म्हणजे पाणी, भक्ष्याचा पुरवठा, नरमादी गुणोत्तर आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं आणि गुरांना संपूर्ण बंदी... खरंतर संवर्धन करणे म्हणजे एखाद्या जंगलात माणसाने 'काहीही न करणं'... निसर्ग आपोआप स्वत:ची काळजी घेतो... असं लेखक म्हणतो.
|
 |
 |
|