|
मुंबईच्या नवलकथा
Author: गंगाधर गाडगीळ
Publisher: दिलीपराज प्रकाशन
|
|
Price: $3.59 $2.87 20% OFF ( ~150 Pages, R82) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: कोकणच्या किनार्याजवळच्या दलदलीनं भरलेल्या एका चिमुकल्या बेटांच्या पुंजक्याचं जगातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बंदरात आणि संपन्न आधुनिक महानगरात रूपांतर कसं झालं ही एक रोमहर्षक कहाणी आहे. एखाद्या साम्राज्याच्या उदयास्ताच्या कहाणीइतकीच ती रोचक आहे. गाडगीळ हे मुंबईकर. तेव्हा या कहाणीनं त्यांचं लक्ष वेधून घ्यावं आणि तिचा शोध घेण्यात त्यांनी रमावं हे साहजिकच आहे. 'दुर्दम्य' सारखी कादंबरी लिहिणारे गाडगीळ हे बंडूकथांचे आणि फिरक्यांचेही लेखक आहेत. जीवनात जे गंमतीदार आहे, हास्यकारक आहे ते त्यांच्या नजरेत भरल्याशिवाय रहात नाही. मग मुंबईकडे केवळ गांभीर्यानं पाहणं त्यांना शक्यच नव्हतं. मुंबईच्या विकासाची कहाणी जितकी रोमहर्षक तितकीच गंमतीदारही आहे हे त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यातूनच या मुंबईच्या नवलकथा जन्माला आल्या. रविवारच्या लोकसत्तेत त्या क्रमानं प्रसिद्ध झाल्या आणि वाचकांना अतिशय आवडल्या. त्या कथांत आणखी काही कथांची भर घालून हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. साधारणत: १८२० ते १८६० या कालखंडातल्या मुंबईतल्या घडामोडींवर त्या आधारलेल्या आहेत. त्यात मुंबईत आगबोटी आल्यावर एक सगळी आगबोटच भाड्याने घेऊन बाणकोटला जाऊन येणाच्या हौशी पाठारे प्रभू तरूणांची जशी कथा आहे. तशी गिरगावातल्या बोलणाच्या कोंबड्याची देखील आहे. त्यात हातांच्या दाही बोटांत सोन्याच्या अंगठ्या घालून गुदामं फोडायला निघालेल्या खास मुंबईच्या दरोडेखोरांची हकिकत आहे. रखवालदारांना एक तर प्राणास मुकायला तयार व्हा नाहीतर एक दोन अंगठ्या घेऊन आपल्या गावाला निघून जा असा पर्याय तो ठेवीत असे. मुंबादेवीच्या रोज गावात फिरायला जाणाच्या कासवांचीही तिथे कथा आहे, तशीच मुंबईतल्या पहिल्या जातीय दंग्याची देखील आहे. चोरांपेक्षा नागरिकांनाच अधिक भयभीत करणाच्या मुंबईच्या पोलिसांच्या दराच्याची चुणूक तुम्हाला त्यात मिळते. त्याचप्रमाणे आपल्या घरी आलेल्या नेटिव्ह मुलांना उद्दामपणे अवमानित करणाच्या इंग्रज गृहस्थाला हेडरसन नावाच्या इंग्रज शिक्षकानं कसं छडीनं फोडून काढलं त्याचीही गोष्ट इथे सांगितलेली आहे. अशा आणखी कितीतरी गंमतीदार नवलकथा या पुस्तकात आहेत. त्या तुम्हाला नवल करीत आणि हसत ठेवतील. पण त्याबरोबरच मुंबईच्या विकासाच्या अनेक टप्प्यांचीही त्या तुम्हाला माहिती देतील. मुंबईत आगबोटी आल्या. इथे सर्वांना समान लेखणारं आणि नि:पक्षपातीपणानं न्यायदान करणारं सुप्रीम कोर्ट स्थापन झालं. महापालिकेचा आणि पोलिसदलाचा विकास झाला. शिक्षणसंस्था स्थापन झाल्या. देशभरात रुपया हे एकच चलन वापरलं जाऊ लागलं. पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू झालं इत्यादि घटनांतून आधुनिक मुंबईच नव्हे तर आधुनिक भारत कसा घडत गेला ते देखील या नवलकथा सांगतात. केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर सगळ्याच वाचकांना त्या आवडतील आणि हसवतील.
|
 |
 |
|