|
गवती समुद्र
Author: शांता शेळके
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $4.11 $3.28 20% OFF ( ~130 Pages, R120)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "अमेरिकेत प्रथम वसाहत करणार्या धाडसी लोकांच्या नसांत खेळणारे, नवनव्या अज्ञात प्रदेशांचा शोध घेऊ पाहणारे ते उष्ण, साहसी, जोमदार रक्त आता कायमचे थंड झाले आहे - खच्ची करून माणसावळलेल्या रानटी घोड्यासारखे. मानवी सत्तेखाली आणलेल्या सीमेवरील वसाहतीसारखे. तोंडाशी फेस आलेल्या घोड्यावर बसून आपल्या अफाट पसरलेल्या कुरणांतून वेगाने दौड करणार्या, किंवा पोटमाळ्यावरील एखाद्या खोलीप्रमाणे फर्निचरवाचून मोकळ्या-मोकळ्या दिसणार्या आपल्या भरभक्कम घरात उभे राहून गवताचे नि गुराढोराचे आपले प्रचंड साम्राज्य केवळ नजरेतल्या आगीच्या जोरावर एकत्रित ठेवणार्या जिम ब्यूटन या माझ्या काकाच्या नसांतून ते रक्त जसे खेळे, तसे ते मानवी देहात पुन्हा कधी खेळताना मी पाहीन की नाही, याची मला शंकाच आहे." "ती सकाळ अशीच ताजी अन टवटवीत होती. |माझी गाडी सॉल्ट फोर्कच्या दिशेने वेगाने धावत होती. आकाशात शुक्राची चांदणी ऐन तेजाने तळपत होती. रात्रीच्या आणि पहाटेच्या मधल्या त्या संधिकाळाच्या वातावरणात अतिसुंदर हिरवट-निळसर छटा पसरली होती. थोड्या वेळाने त्या छटेतून मृदू जांभळा प्रकाश सर्वत्र पाझरू लागला. थंड पहाटवारा वाहू लागला. मद्यापेक्षाही अधिक उत्तेजक अशा त्या शीतल झुळका मी जणू घोटाघोटाने पीत होतो."
कॉनरॅड रिश्टर च्या कादंबरीचा अनुवाद
Synopsis: Published in 1936, this novel presents in epic scope the conflicts in the settling of the American Southwest. Set in New Mexico in the late 19th century, The Sea of Grass concerns the often violent clashes between the pioneering ranchers, whose cattle range freely through the vast sea of grass, and the farmers, or "nesters," who build fences and turn the sod. Against this background is set the triangle of rancher Colonel Jim Brewton, his unstable Eastern wife Lutie, and the ambitious Brice Chamberlain. Richter casts the story in Homeric terms, with the children caught up in the conflicts of their parents.
|
 |
 |
|