Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


ब्रिटिशांची भारतातील राजनीती
Author: एस. गोपाल
Publisher: डायमंड पब्लिकेशन्स
Add to Shopping Cart
Price: $15.23 $12.18 20% OFF ( ~553 Pages, R500)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
ई-सकाळ रविवार, २६ चरीलह २००६
मराठी भाषांतराचा 'एएतिहासिक' प्रकल्प
(डॉ. राजा दीक्षित)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी केवळ मायमराठीतच लिहिण्याची शपथ घेतल्याचे आपल्याला माहीत असते; पण याच राजवाडयांनी १८९४ मध्ये 'भाषांतर' नावाचे मासिक सुरू करून परभाषेतील उत्कृष्ट ग्रंथ मराठीत आणण्याचा प्रयोग केला, हे अनेकांना अज्ञात असते. मासिकाच्या पहिल्या अंकात भाषांतराचे महत्त्व सांगताना 'लोकस्थिती सुधारावयाची असेल तर ती आतून सुधारली पाहिजे,' असे अर्थपूर्ण विधान राजवाडयांनी केले होते. त्यांचे मातृभाषेवरचे प्रेम एकारलेले नव्हते आणि आपलेही तसे नसावे, एवढा बोध यावरून घेण्यास हरकत नाही.

राजवाडयांची आठवण येण्याचे कारण असे, की भारतीय इतिहासाविषयीच्या अकरा इंग्रजी ग्रंथांचा मौलिक खजिना नुकताच मराठीत उपलब्ध झाला आहे. नवी दिल्ली येथील 'भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (आयसीएचआर) या संस्थेने करवून घेतलेली ही भाषांतरे पुण्याच्या 'डायमंड पब्लिकेशन्स'चे दत्तात्रेय पाष्टे यांनी प्रकाशित केली आहेत. २७ फेब्रुवारी २००६ ला डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते व प्रा. ज. वि. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा संच प्रकाशित झाला. डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला अन्यथा गेली सुमारे पंचवीस वर्षे धूळ खात पडलेली ही भाषांतरे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होती. तमाम मराठी इतिहासप्रेमींनी सर्व संबंधितांचे |ऋ|णी राहावे, अशी ही कामगिरी आहे. या प्रकल्पाचे इतिहासाच्या व भाषांतराच्या अंगाने सखोल परीक्षण करायचे तर तोच एक वेगळा प्रकल्प ठरू शकेल! येथे फक्त परिचयपर धावती मीमांसा अभिप्रेत आहे.

भाषांतरित संचातील पाच ग्रंथ प्राचीन भारताविषयीचे आहेत. जेव्हा प्राचीन भारताच्या अभ्यासासाठी मुख्यत: व्हिन्सेंट स्मिथच्या ग्रंथावर विसंबून राहावे लागत होते, अशा काळात हेमचंद्र रायचौधुरी (१८९२ - १९५७) यांनी भारतीय राष्ट्रवादी परिदृष्टीतून प्राचीन भारताच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली. तिला साधनशोध आणि व्यासंगाचा भक्कम पाया लाभला होता. 'प्राचीन भारताचा राजकीय इतिहास' (१९२३) हा त्यांचा ग्रंथ. त्यामध्ये भारतीय इतिहासाच्या प्राचीनतेची सीमारेषा रायचौधुरींनी अभ्यासपूर्वक मागे नेली आणि स्मिथ वगैरेंनी दुर्लक्षित केलेल्या मुदद्यांवर प्रकाश टाकला. प्राचार्य सदाशिव आठवले व डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनी त्याचे भाषांतर केले आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी (१९०७-६६) म्हणजे भारतीय इतिहासलेखन क्षेत्रातील एक उत्तुंग शिखर. 'उत्पादनाची साधने आणि उत्पादन - संबंध यांच्या विकासप्रक्रियेचे कालक्रमानुसारी सादरीकरण' ही इतिहासाची कोसंबीकृत व्याख्याच त्यांचे वेगळेपण दर्शविण्यास पुरेशी आहे. द्वंद्वात्मक भौतिकतावादाच्या मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय इतिहासाचा अन्वयार्थ लावला. मात्र मार्क्सवाद त्यांनी यांत्रिकपणे वापरला नाही. आशियाई उत्पादन पद्धतीचा मार्क्सचा सिद्धान्त तर त्यांना फारसा मान्यच नव्हता. तुलनात्मक पद्धतीचा आणि आंतरविद्याशाखीय दृष्टीचा वापर करून त्यांनी प्राचीन भारताच्या इतिहासावर भाष्य केले. 'भारतीय इतिहासाचा अभ्यास' (१९५६) आणि 'प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता' (१९६५) हे प्रस्तुत संचातील त्यांचे दोन ग्रंथ या दृष्टीने पायाभूत महत्त्वाचे आहेत. त्यातील पहिल्याचे भाषांतर दि. का. गर्दे यांचे आहे, तर दुसर्‍याच्या भाषांतरकर्त्याचे नाव इतिहास अनुसंधान परिषदेच्या दप्तरी नसल्याने ते छापलेले नाही. गर्दे यांच्या भाषांतरात जाणवण्याजोग्या उणिवा आहेत. ग्रंथनामाचे भाषांतर चपखल नाही. मिथसाठी कथा, मेसोलिथिकसाठी मध्ययुग किंवा चाल्कोलिथिकसाठी ताम्रयुग, हे चुकीचे भाषांतरित शब्दप्रयोग नमुन्यादाखल पुरेसे आहेत. भाषांतरावर योग्य ते संपादकीय संस्कार झाले नाहीत, हे उघड आहे. रामशरण शर्मा (जन्म १९२०) हे स्वातंत्र्योत्तर काळातील ख्यातनाम इतिहासकार. मार्क्सवादी दृष्टिकोनातून आणि सामाजिक, आर्थिक व संस्थात्मक पैलूंवर भर देऊन त्यांनी प्राचीन भारताविषयी संशोधन केले. भारतीय सामंतशाहीविषयीची त्यांची मांडणी तर विशेष गाजलेली आहे. 'प्राचीन भारतातील राजकीय विचार आणि संस्था' हा त्यांचा ग्रंथ डॉ. पंढरीनाथ रानडे यांनी अनुवादित केलेला आहे. प्राचीन भारतीय राजनीतीतील स्थित्यंतरांचा अभ्यासपूर्ण व अर्थपूर्ण वेध या ग्रंथात घेतलेला आहे. डॉ. डी. एन. झा यांनी १९६४ मध्ये पाटणा विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधाचे संस्कारित रूप म्हणजे 'माआरYयोत्तर व गुप्तकालीन राजस्वपद्धती' हा ग्रंथ होय. त्याचे हस्तलिखित कोसंबी व रामशरण शर्मा यांच्या नजरेखालून गेलेले होते, एवढे सांगितले तरी त्याचे मोल स्पष्ट होईल. कोणत्याही देशाच्या- विशेषत: प्राचीन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आकलनासाठी भू-व्यवस्था व महसूल पद्धतीची तपशीलवार मीमांसा आवश्यक आहे. ते कार्य या ग्रंथाने समर्थपणे बजावले. त्याचे भाषांतर डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केलेले आहे. या पाच ग्रंथांच्या अभ्यासाने प्राचीन भारताविषयीची जाण समृद्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासाविषयीचे चार ग्रंथ या संचात समाविष्ट केलेले आहेत. इतिहास संशोधनाची व लेखनाची आधुनिक परंपरा भारतात रुजवली ती पाश्चात्त्य इतिहासकारांनी. त्यांपैकी अनेक जण 'प्रशासक - इतिहासकार' म्हणून ओळखले जातात. ब्रिटिशांच्या प्रशासकीय गरजांपोटी आणि भारतावरील त्यांच्या प्रभुत्वाचे साधन म्हणून त्यांनी इतिहासाचा वापर केला. त्यांची इतिहासदृष्टी साम्राज्यवादी होती. तरीही इतिहासाच्या शास्त्राची संशोधनपद्धती भारतात रुजवण्याबाबत त्यांच्या कामगिरीचे मोल विसरून चालणार नाही. विल्यम हॅरिसन मूरलॅंड (१८६८ - १९३८) हा 'प्रशासक - इतिहासकार' त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. भारताच्या संदर्भात आर्थिक इतिहासाचा पाया घालण्यात त्याचा वाटा मोठा होता. 'अकबरकालीन हिंदुस्थान' (१९२०) आणि 'अकबर ते औरंगजेब' (१९२३) हे त्याचे ग्रंथ गाजलेले आहेत. त्यांचे अनुवाद अनुक्रमे सौ. सुनंदा कोगेकर व श्री. राजेंद्र बनहट्टी यांनी केलेले आहेत. ब्रिटिश धोरणांचे समर्थन करणे आणि ब्रिटिश अमलापेक्षा मुघल काळातच भारतीय समाजाची आर्थिक स्थिती दयनीय होती, असे दाखवणे, हे मूरलॅंडचे अंतस्थ हेतू होते. अशा बौद्धिक कसरतींचा अभ्यासही उदबोधक ठरू शकतो, तसेच मूरलॅंडच्या अन्वयार्थाशी मतभेद झाले तरी त्याची संशोधनपरता नजरेआड करता येत नाही. सर जदुनाथ सरकार (१८७० - १९५८) हे भारताचे एक थोर इतिहासकार. महाराष्ट्राला तर ते चांगलेच परिचित आहेत. सरकारांच्या लेखनातून त्यांचे पांडित्य व भाषाप्रभुत्व प्रत्ययास येते. इतिहासाला शास्त्रीय बैठक देणार्‍या जर्मन इतिहासकार रांकेचा त्यांच्यावरील प्रभाव स्पष्ट जाणवतो. 'सत्य हे सुखद आहे की दु:खद आहे, याची पर्वा न करता मी सत्यकथन करणार' असा त्यांचा बाणा होता. अर्थात सामाजिक शास्त्रांमध्ये सत्य सापेक्ष असते. त्यामुळे सरकारांसारखे सत्यान्वेषी इतिहासकारसुद्धा अतयंत वादग्रस्त ठरले. 'औरंगजेब' हा त्यांचा महाग्रंथही (१९१२-२४) त्याला अपवाद नाही. या दृष्टीने डॉ. शरद कोलारकर यांनी अनुवादित केलेला हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. मध्ययुगीन भारतीय इतिहासपरंपरेत इतिहासकारांच्या अलिगढ संप्रदायाची कामगिरी वैशिष्टयपूर्ण आहे. या संप्रदायातील एन. ए. सिद्दिकी यांचा 'मोगलकालीन महसूल पद्धती' (१९५९) हा संस्कारित प्रबंध - ग्रंथ डॉ. प्र. ल. सासवडकर यांनी अनुवादित केला आहे. मुघल साम्राज्याच्या पतनाची व्यक्तिकेंद्रीत मीमांसा फोल ठरवणारा आणि त्या संदर्भात भौतिक मीमांसा करणारा, असा हा अभ्यास आहे. असंख्य मूळ साधने पिंजून काढून सिद्ध केलेला हा प्रबंध आर्थिक इतिहासात महत्त्वाची भर घालणारा आहे.

प्रस्तुत संचात आधुनिक भारताविषयीचे दोन ग्रंथ आहेत. 'आजकालचा भारत' हा रजनी पाम दत्त यांचा ग्रंथ १९३९ मध्ये प्रसिद्ध झाला. भारतात मार्क्सवादी इतिहासलेखनपरंपरा रुजवणार्‍या ग्रंथांमध्ये त्याचा समावेश होतो. इंग्लंडमधील प्रकाशकाने काही स्फोटक भागांची काटछाट केलेली असूनही भारतातल्या ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली. आधुनिक भारताच्या इतिहासाची भौतिकवादी मीमांसा त्यामध्ये आढळते. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या शोषक स्वरूपावर या ग्रंथाने प्रकाश टाकला. सरळधोपट वर्णनपर राजकीय इतिहासाला फाटा देऊन जी व्यापक अन्वयार्थात्मक मांडणी रजनी पाम दत्त यांनी केली, ती आजही मोलाची वाटते. या ग्रंथात थोडी भर टाकून व मूळ आवृत्तीतील गाळलेला भाग समाविष्ट करून १९७० मध्ये जी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली तिचे य. ना. देवधरकृत भाषांतर प्रस्तुत संचात समाविष्ट आहे. सर्वपल्ली गोपाल यांचा 'ब्रिटिशांची भारतातील राजनीती' (१९६५) हा ग्रंथ आजसुद्धा उपयुक्त वाटतो. १८५८ ते १९०५ या कालखंडातील ब्रिटिश राजनीतीचा मूळ साधनांच्या आधारे केलेला हा सखोल अभ्यास आहे. ब्रिटिश धोरणांशी संबंधित वैचारिक आशय लेखकाने उलगडून दाखवला आहे. इतिहासाचे आधुनिक तत्त्वज्ञान वैचारिक पोत महत्त्वाचा मानते. त्या दृष्टीने मौलिक ठरलेल्या या ग्रंथाचे भाषांतर डॉ. सरोज देशपांडे यांनी केलेले आहे.

मातब्बर इतिहासकारांचे हे अकरा ग्रंथ मराठीचिये नगरी आणण्याची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. भाषांतरकर्त्यांमध्ये इतिहास संशोधकांपासून भाषातज्ज्ञ व साहित्यिकांपर्यंत विविध प्रकारच्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भाषांतराची शैली पुस्तकपरत्वे भिन्न असल्याचे जाणवते. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेसारख्या संस्थेने असा महाप्रकल्प अधिक काळजीपूर्वक राबवणे गरजेचे आहे, हे या निमित्ताने नमूद करायला हवे. संच प्रकाशित करताना धोरणाची व परिभाषेची एकवाक्यता हवी. मूळ ग्रंथ, ग्रंथकार व अनुवादित आवृत्ती यांविषयीची माहिती पद्धतशीरपणे द्यायला हवी. प्रकल्प - संपादनाची स्वतंत्र व्यवस्था करायला हवी. हे संपादन जाणकारीने व कार्यक्षमतेने करायला हवे. या सर्व बाबतीत उणिवा राहिल्या आहेत. प्रकाशक श्री. पाष्टे हे प्रकाशन व्यवसायात नवे आहेत. संचाच्या निर्मितीची बाजू सर्वसाधारणपणे समाधानकारक असली तरी नवखेपणाच्या खुणासुद्धा निश्चितच जाणवतात. तथापि श्री. पाष्टे यांनी हे शिवधनुष्य निर्धारपूर्वक उचलले, हेच अभिनंदनीय म्हटले पाहिजे.

अनुवाद - डॉ. सरोज देशपांडे

Write your review for this book

Other works of एस. गोपाल
   जवाहरलाल नेहरू

Similar books:
  इतिहास
   मुस्लिम मनाचा शोध
   श्रीमान योगी
   सिंधी साहित्याचा इतिहास
   शोध महात्मा गांधींचा - भाग १ आणि २
   कान्होजी आंग्रे
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.