Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


जीवन समजून घेतांना ...
Author: गौर गोपाल दास
Publisher: मंजुल पब्लिशिंग हाऊस
Add to Shopping Cart
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~210 Pages, R225)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
आला दिवस ढकलू नका
प्रत्येक क्षण समरसून जगा
मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात. 'माणसाची आजची अवस्था; या विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात.
नाती दृढ करणं असो, स्वत:ची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालयीन ठिकाणी स्वत:तले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो; गौर गोपाल दास आपल्याला त्या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिकोन आहे.
तो जाणून आपणही संपन्न होतो. आजच्या घडीला, दास ह्यांचे अगणित अनुयायी आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ लाइफ-कोचपैकी ते एक आहेत. त्यांनी आपलं जीवनज्ञान लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवलं
आहे. जीवन समजून घेताना... ह्या त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारांतून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात.
'आपल्या बुद्धिचातुर्यामुळे इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे कार्य गौर गोपाल दासजी हे आधुनिक काळातील वक्ते अतिशय सहजतेने पार पाडतात.' - हेमा मालिनी
'जीवन जगताना अर्थपूर्णता आणि समतोल ह्या दोन्हींचं भान कसं राखावं ह्याबद्दल मिळालेले मार्गदर्शन, तेही गोष्टीरूपात आणि समजण्यायोग्य दाखले देत.' - नितीन गडकरी
अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके
===========
मुनोगत
९ मे २०१७, मला वैशाली माथूर यांचा फोन आला. पेंग्विन रैंडम हाउस इंडिया, इथे त्या 'एक्झिक्युटिव्ह एडिटर; म्हणून काम करतात. शिवाय, 'राईट्स अॅन्ड लॅंग्वेज पब्लिशिंग'च्या त्या प्रमुख आहेत. त्यांनी माझे काही व्हिडिओज ऑनलाइन पाहिले होते. मी पेंग्विनसाठी पुस्तक लिहू शकेन का, याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांचा हा फोन होता. मला ती कल्पना आवडली. लोकांची विचारधारा बदलून, त्यांना जीवन जगताना आधार आणि मदत मिळावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. गेली दोन दशकं मी माझ्या भाषणांतून आणि व्याख्यानांतून सातत्याने तसा प्रयत्न करत आलो आहे. माझा उद्देश वरच्या पातळीवर नेण्यासाठी माझ्यासमोर सुवर्णसंधी चालून आली होती.
स्वाभाविकत:च, मला पटकन 'हो' म्हणावंसं वाटलं. पण मनाच्या कोप-यात किंचितशी संदिग्धता होती. त्यामुळे, मी लगेच होकार दिला नाही. त्याऐवजी, मी त्यांना साचेबद्ध उत्तर दिलं की, 'पाहू या. मी तुमच्याशी संपर्क साधतो'. कदाचित, माझं उत्तर ऐकून त्यांना उद्वेग वाटला असणार. माझी ही द्विधावस्था होण्याचं कारण म्हणजे मी लेखक नाही. काही वर्षांपूर्वी लिहिलेले दोन-चार लेख आणि थोड्या कविता या व्यतिरिक्त पेनाचा उपयोग मी फक्त काही कागदपत्रांवर सह्या करण्याकरता आणि की-बोर्डचा वापर डायरी लिहिण्यासाठी अथवा इतर काही नोंदी करण्यासाठी तेवढा करत होतो.
असेच काही दिवस गेले ... त्यांच्या म्हणण्याचा मी गंभीरपणे विचार करू लागलो. नेमका त्या वेळेस लंडन इथे असलेल्या श्रुती धर्म दास या माझ्या जुन्या मित्राचा फोन आला. मी अनेक व्याख्यानं ऑनलाइन द्यायला सुरुवात करण्याआधीपासून ते माझे स्नेही होते. त्यांचा अचानक फोन आल्यामुळे मला जरा नवल वाटलं. फोनवर त्यांनी मला सांगितलं की, 'मी आता पुस्तक लिहायला घेतलं पाहिजे. ते म्हणाले, 'एखाद्या वक्तयाच्या म्हणण्याला पुष्टी मिळण्यासाठी त्याने स्वत: पुस्तक लिहिणं फार गरजेचं आहे. ही पुढची पायरी आहे. तुमच्या पुस्तकामुळे श्रोत्यांचा दुहेरी लाभ होईल. तुमचं बोलणं कानात साठवल्यानंतर, घरी जाऊन त्यांना तुमचं पुस्तक वाचता येईल. तसंच, भाषणाची आणि विचार मांडण्याची सवय असलेल्या तुमच्यासारख्या वक्तयाला असं पुस्तक लिहिणं फारसं कठीण जाणार नाही.' माझ्याबद्दल त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मला छान वाटलं.
मी पुस्तक लिहिण्याचं टाळत होतो, त्यामागे लिहिण्याचा अनुभव नाही हा एकमेव मुद्दा नव्हता. विचार मांडण्याच्या निमित्ताने मी सतत जगभर प्रवास करत असतो. पुस्तक लिहायचं म्हणजे, ठरावीक वेळ हाताशी उपलब्ध असायला हवा, स्थैर्य हवं, विचारांची बैठक जमण्यासाठी अवधी हवा, या साच्या गोष्टींची मला जाणीव होती. त्याचप्रमाणे पुस्तकातून मी वाचकांना नेमकं काय देऊ इच्छितो, तेसुद्धा ठरवायला हवं होतं. त्यातून पुस्तक लिहायचं तर, भाषणांचे अनेक दौरे रद्द करावे लागले असते. म्हणजेच, माझ्यावर विसंबून असणान्या अनेकांना तोंडघशी पाडल्यासारखं झालं असतं. अशा विचारात असताना मी ऑनलाइन सहजच काहीतरी स्क्रोल करून पाहत होतो. अचानक, सर रिचर्ड ब्रेन्सन यांनी उधृत केलेलं एक वचन माझ्या वाचण्यात आलं. त्यांनी म्हटलं होतं, 'समजा, तुम्हाला कुणी एखादी सुवर्णसंधी देऊ करत असेल आणि तुम्ही तिला न्याय देऊ शकता की नाही याच्याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर, 'हो' असं उत्तर द्या. त्यानंतर ते कसं करायचं याचा विचार करा.' माझ्या दृष्टीने हा संकेत होता. आता, निर्णय घ्यायला टाळाटाळ करण्यात अर्थ नव्हता. मी वैशाली माथूर यांना फोन लावून म्हटलं की, 'तुम्ही मांडलेल्या प्रस्तावावर विचार करायला मी तयार आहे.'
माझा दिवस एका शहरात उगवतो तर दुसर्‍या शहरात मावळतो. हे पुस्तक वाचताना तुमच्या ते लक्षात येईलच. माझा जीवनोद्देश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सातत्याने प्रवास करणं ही आज माझी ओळखच झाली आहे. लिखाणाच्या विचारात हिवाळा सरला, उन्हाळा संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. पुस्तकलेखनाचा विचार माझ्या मनात आता जोर पकडू लागला. विचार करता-करता डिसेंबर महिना उजाडला. मनन-चिंतनासाठी आणि जे धडे आजवर गिरवले होते किंवा आत्मसात केले होते, त्यांवर अधिक विचार करण्यासाठी मी सर्व कामांतून महिनाभर वेळ काढला.
या जीवनप्रवासात जी तत्त्वं मी जाणली अथवा अनुभवली, तीच तत्त्वं मी या पुस्तकातून तुमच्यासमोर मांडली आहेत. पण ही तत्त्वं एकत्रितपणे सांधायची कशी, हे मात्र मला समजत नव्हतं. अनेकांच्या भेटीगाठीतून आणि योगदानातून आकाराला आलेल्या विचारसूत्रांना हॅरी अय्यर आणि ललिता अय्यर या दोन व्यक्तिरेखांतून एकत्र आणायचं, हे मी निश्चित केलं. खरंतर, आधुनिक जीवनाचा हा त्यांचा प्रवास अनेकांचा प्रवास आहे. मुळात, जीवन हाच एक प्रवास आहे. तथापि, इतरांच्या हातून घडलेल्या चुका आणि त्यांनी अमलात आणलेले उपाय यांवरून जर आपण काही शिकू शकलो, तर आपण आपलं जीवन अर्थपूर्ण करण्यासोबत सहज सुलभ आणि आनंदीही करू शकतो. भाषण देणं अथवा विचार व्यक्त करणं यापेक्षा, पुस्तक लिहिणं जास्त कठीण आहे, हे लेखनादरम्यान माझ्या लक्षात आलं; पण इतरांच्या जीवनात थोडा अधिक अर्थ आणण्यासाठी मी जर मदत करू शकलो, तर ती मी आवर्जून करेन आणि म्हणूनच पुस्तक लिहिण्याचं हे आव्हान पेलायला मी तयार झालो आहे. वाचकांच्या जीवनामध्ये ईश्वरकृपेने सकारात्मक बदल व्हावा, ही आता एकच प्रार्थना आहे, धन्यवाद!

Write your review for this book


Similar books:
  मानसशास्त्र
   १० फिलगुड फॅक्टर्स
   मनात : मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर
   मानस-मुद्रा
   आत्मविश्वासाचा कानमंत्र
   देहबोली
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.