Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


नक्षत्रचित्रे
Author: शांता शेळके
Publisher: सुरेश एजन्सी
Add to Shopping Cart
Price: $3.42 $2.73 20% OFF ( ~100 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
भालजी पेंढारकर, सुधीर फडके, कुसुमाग्रज, इंदिरा संत, भा. रा. भागवत, रणजित देसाई, व. पु. काळे व विजया राजाध्यक्ष या सुहृदांची हृद्य व्यक्तीचित्रे

"अवतीभवतीच्या व्यक्तिमत्त्वांचा आणि घटनांचा रोचक वेध"
नक्षत्रचित्रे हे त्यांचं दुसरं छोटेखानी पुस्तकही खूप वाचनीय आहे. याचं स्वरूप मात्र निराळं आहे. रणजीत देसाई, व. पु. काळे, विजया राजाध्यक्ष, कुसुमाग्रज, बाबुजी अशा अतिशय मान्यवर थोर व्यक्तिमत्त्वांची नेटकी शब्दचित्रे- म्हणजेच नक्षत्रचित्रे.. प्रथितयश साहित्यिक, कवी, गायक-गायिका यांच्या जीवन कहाणीबद्दल रास्त कुतूहल त्यांच्या चाहत्यांना असतं. ही व्यक्तिमत्त्वं कशी घडत गेली त्यांच्या प्रगतीचे टप्पे कोणते होते, स्वभाव- आवडी-नावडी कशा होत्या, प्रतिकूलतेवर त्यांनी कशी मात केली इत्यादी माहिती जाणून घ्यायची असते. ही गरज काही प्रमाणात हे पुस्तक पूर्ण करील. वेगळ्या प्रकारचा वाचनानंद देईल. या लेखनाच्या निमित्ताने बाईंच्या मनात प्रश्न येतो की, वाङ्मयीन समीक्षा, विद्वानांनी केलेलं मूल्यमापन, केवळ रंजकता आणि सर्जनशील कला यांच्यामध्ये काही गूढ नातं असतं का? असल्यास त्याचं नेमकं स्वरूप काय, याचं उत्तर जाणत्या वाचकांनी शोधावं असं त्या सूचित करतात. रणजीत देसाईंच्या काही कथा रागदारी संगीत गाणार्‍या कलावंतांच्या जीवनावर बेतलेल्या.. त्यात निर्माण केलेलं वातावरण, अन्य तपशील, गायनकलेत वर्षांनुवर्षे रममाण झालेलाच एखादा नेमकेपणाने देऊ शकेल, असे.. शांताबाईंनी जेव्हा देसाईंचं कोवाडचं घर पाहिलं, त्यांची सूर-संगत ध्यानी घेतली तेव्हा सर्व उलगडा झाला, हे त्या वाचकाला सांगतात. व्यक्तीची स्वभाववैशिष्टे आणि कलावंताच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. कुसुमाग्रजांचा सहवास हा बाईंच्या दृष्टीने हृद्य, रंजक आणि मन समृद्ध करणारा अनुभव. अॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबर्‍या अथवा तत्सम इंग्रजी साहित्य हा दोघांच्या पसंतीचा प्रांत. या निमित्ताने त्यांच्या रसाळ गप्पा होत असत. अनुभवांची देवाण-घेवाण होई. कविराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे गहिरे रंग सामोरे येत.. शांताबाईंनी ते सर्व वाचकाला आस्थेने सांगितलं आहे.
गीतलेखनाच्या क्षेत्रात गदिमांचं नाव अत्यंत लोकप्रिय झालेलं असताना, एखादा निर्माता- दिग्दर्शक गीतलेखनाची संधी देईल, यावर शांताबाईंचा विश्वासच बसत नव्हता. तशी संथा भालजी पेंढारकरांनी त्यांना दिली. मी मनातून थोडी हुरळून गेले त्या सांगताच.. ५०-५५ सालातल्या कोल्हापुरातल्या त्या रम्य आठवणी गीतलेखन- पहिला धडामध्ये त्यांनी जागविल्या आहेत. स्वराज्याचा शिलेदार चित्रपटाची जडणघडण, त्या निमित्ताने भालजींच्या व्यक्तिमत्त्वाची सुंदर ओळख करून दिली आहे. १०-१२ पानांचा हा लेख मुळातूनच वाचावा इतका छान आहे.. ६० वर्षे शांताबाईंनी साहित्य विश्वात स्वत:चं योगदान दिलं. दर्जेदार गीतलेखन केलं, ललित लेखन केलं. हे करताना बारकाईने निर्मितीच्या प्रक्रियेचा वेध घेतला. कलावंतांचं अंतरंग, त्यांच्या मनातले ताणतणाव, त्यांचा लहरीपणा इत्यादीचा मागोवा घेतला. त्याचीच एक झलक म्हणजे हे अत्यंत वाचनीय पुस्तक.
-- मोहन कान्हेरे, रविवार २५ , सप्टेंबर २०११

Other Links:

Write your review for this book

Other works of शांता शेळके
   तोच चंद्रमा ....
   कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
   आंधळी
   चौघीजणी
   निवडक शांता शेळके

Similar books:
  व्यक्तिपरिचय
   वपुर्झा
   दाद
   श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी
   नथुरामायण
   एक होता कार्व्हर
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.