Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्यांची
Author: अतुल देऊळगावकर
Publisher: मौज प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~150 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
ई-सकाळ रविवार २ जुलै २००६
पर्यावरण प्रश्नांचा मनुष्यकेंद्री, सखोल; परंतु एकांगी आढावा
( संतोष शिंत्रे )

आपल्या सभोवतालच्या निसर्ग आणि पर्यावरणविषयक प्रश्नांनी आता खूपच गंभीर स्वरूप धारण केलं आहे. स्टीफन हॉकिंगसारख्या शास्त्रज्ञांनी तर आता लवकरच माणसाला पृथ्वीवरून गाशा गुंडाळायला लागेल, असंही भाकीत केलं आहे. अशा पार्श्वभूमीवर त्या प्रश्नांमधला शहरी आणि विकासात्मक भाग, त्यावरचे तारतम्याने करण्याचे उपाय समजून (तेही प्रवाही मराठीमध्ये) घेण्यासाठी अतुल देऊळगावकर यांचे "बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्यांची' हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. .......
कीटकनाशके, पूर, मातीची धूप, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, रसायने, जलनियोजन अशा अनेक विषयांचा त्या त्या क्षेत्रांमधील कामाचा विस्तृत आढावा लेखकाने अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने घेतला आहे. शहरी पर्यावरण प्रश्नांमधील राजकारण, नोकरशाहीची चलाखी, सरकारी निष्क्रियता हीदेखील पुस्तक वाचताना अस्वस्थ करून सोडते. सर्वसाधारण वाचकांपर्यंत हे सगळेच विषय मराठीतून कमी वेळा पोचतात. ते पोचवणे हे श्रेय नि-संशय लेखक आणि प्रकाशक यांचेच आहेत.
गावपातळीवर, शहरात आणि या दोन्ही ठिकाणी सरकारी पातळीवर, पर्यावरणातल्या मुद्द्यांवर काम करताना, कृतिशील मार्गदर्शनाची गरज भासते. विविध व्यक्ती, संस्था यांना प्रश्नाच्या मुळाशी जाऊन मांडणी करणे आवश्यक असते. अनेक वेळा आकडेवारीचाही प्रश्न येतो. चटकन हाताशी आकडेवारी मिळतेच असे नाही.
श्री. देऊळगावकर यांच्या पुस्तकाने ही उणीव फार मोठ्या प्रमाणावर भरून काढली आहे. विशेषत- जमिनीची धूप वाचवणे, जलसंधारण, वाहनांचे प्रदूषण यासंबंधीची माहिती अत्यंत मोलाची आहे.
पुस्तकात अनेक ठिकाणी, प्रश्नांच्या सोडवणुकीबद्दलची सरकारी पातळीवरची अनास्था आणि त्या प्रश्नाचा राजकीय फायदा मात्र उठवण्याची त्यांची वृत्ती यावरही खूपच चांगला प्रकाश टाकला आहे. पर्यावरणात काम करणार्‍या भावी कार्यकर्त्यांना ही माहिती खचितच उपयुक्त ठरेल. लोकांच्या संघटित विरोधाने, हरिहर पॉलिफायबर्ससारखा विनाशकारी प्रकल्प कसा बंद झाला, हेही यात वाचायला मिळते. संगय्या हिरेमठ, चंडी प्रसाद भट, प्रा. भागवतराव धोंडे, विलासराव साळुंखे, मराठवाड्यातले विजय अण्णा बोराडे आणि बॅ. जवाहर गांधी अशा अनेक विचारवंताच्या प्रत्यक्ष कामाची ओळख अतिशय शास्त्रीय पद्धतीने पण सोप्या भाषेत लेखकाने करून दिली आहे. पर्यावरण व विकासाच्या संदर्भात सामूहिक कृतीमागच्या प्रेरणा लेखक जाणून घेऊ इच्छितो. या मर्यादेत ही सामूहिक कर्तृत्वाची बखर आहे.
दिल्लीस्थित अनिल आगरवाल, सुनीता नारायण आदी मंडळी आणि त्यांची "सी.एस.ई.' ही संस्था, त्यातून झालेले काम, ही पुस्तकाची प्रेरणा आहे. भारतीय पर्यावरण चळवळीत शहरी भागाला, मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून त्या अंगाने(च) संपूर्ण विषय मांडणारा हा एक विचारप्रवाह. जंगलं, वाईल्ड लाईफ बायॉलॉजी, अर्थव्यवस्थेतले जंगलांचे स्थान याकडे या विचारधारेतल्या लोकांचं फारसं लक्षही नसतं किंवा त्यांना ते गाभ्याचे प्रश्नच वाटत नाहीत. या विचारप्रवाहाव्यतिरिक्त अन्य एक "जल-जंगल-जमीन'मधल्या जंगलांचा, त्यातल्या प्राणी - पक्षी - झाडं - कीटक या विविधतेचा विचार करून अभ्यासपूर्ण मांडणी करणारा एक विचारप्रवाह भारतीय पर्यावरण व निसर्ग चळवळीत खूप महत्त्वाचा आहे.
श्री. आगरवाल यांच्या कामामुळे मोहित होऊन, भारावून प्रस्तुत लेखकानेही या दुसर्‍या प्रवाहाला क्षुल्लक लेखले आहे. या बाजूचा पुरेसा अभ्यास किंवा आकलन नसताना लेखकाने त्या विचारधारेतल्या लोकांबद्दल सतत भाबडे, अविवेकी, अतिरेकी असे उल्लेख केले आहेत. वाचकांना यातून दिशाभूल आणि बुद्धिभेद करणारे संदेश जाऊ शकतात. या पुस्तकासाठी केलेल्या "भ्रमंती'मध्ये लेखकाला ही बाजू लक्षातच येऊ नये, हे एक आश्चर्यच म्हणायला हवे. समग्र माहिती न घेता पर्यावरणातल्या एका अत्यंत मूलभूत विचाराबद्दल उपेक्षेने लिहिण्यामुळेच हे पुस्तक पर्यावरण प्रश्नांचा "अखबार' न होता बखर याच पातळीवर राहते. बखरी एखाद्या व्यक्तीच्या गुणांनी, कार्यांनी प्रभावित होऊन लिहिल्या जातात, म्हणूनच तर इतिहास "बखरीं'ना अस्सलऐवजी दुय्यम पुराव्याचेच स्थान देतो. विवेकी आणि अविवेकी हे निसर्ग/ पर्यावरणवाद्यांचे दोन प्रकार लेखकाने कल्पिले आहेत ते याच शहरी पूर्वग्रहामधून. बरे, असा भेद करण्यामागे कुठलेही तात्त्विक, अर्थशास्त्रीय विवेचन पुस्तकात आलेले नाही. आहेत ती फक्त काही टाळ्या मिळविणारी चमकदार वाक्यं. पर्यावरण समस्यांचं राजकारण व्हावं आणि राजकारणाच्या पर्यावरणात बदल व्हावा किंवा त्या काळात भारतात पर्यावरणवाद होता तो फक्त झाडे लावा आणि फार तर प्राणी वाचवा अशांसारखी. यातले प्रत्येक वाक्य अभ्यासपूर्ण मांडणी आणि विवेचनाने खोडता येईल. त्याची ही जागा नव्हे; पण लेखकाने त्याच्या आदर्शांचे पूर्वग्रह त्यातून दिसतात. अशास्त्रीय, वरवरचे ढोबळ उल्लेखही पुस्तकात याचमुळे आले असावेत. ""जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने बडे देश कुठल्याही वनस्पतीचा कुठलाही भाग पकडून, त्यातल्या डीएनएद्वारा संपूर्ण वनस्पती प्रयोगशाळेत करू शकतात,'' हे सरसकट विधान (पान १३७) हे त्याचे उदाहरण.
एका ठिकाणी तर "पूर का येतात' याबद्दलचे पर्यावरण शास्त्रज्ञांचे अचूक विवेचन दिले आहे. पण राजकारण्यांनी, बड्या देशांनी त्या विवेचनाचा राजकीय फायदा घेतला, हे सांगताना पर्यावरणवाद्यांनाच त्याबद्दल जबाबदार धरले आहे! पान २७ वर सरसकट सगळ्या वनाधिकार्‍यांना खलनायक ठरवताना त्यांना वन्य जीव तस्करीतही लेखकाने असेच ओढले आहे. ज्या "रोम्यांटिक' (शब्द नेमाड्यांचा)पणाचा आरोप लेखक इतरांवर करतो तोच "रोम्यांटिक'पणा, भाबडेपणा, विकासाचे समर्थ (म्हणजे काय?) पर्याय नसणे, हे दोष जी विचारधारा लेखक मांडू पाहतो, त्यातही आहेतच. ज्या स्वामिनाथन आणि बोरलॉग यांची पर्यावरणवाद्यांविषयी नकारघंटा वाजवणारे इत्यादी मते तो देतो, त्यांच्या मांडणीच्याही मर्यादा निश्चित आहेत. नुकत्याच संसदेत येऊ घातलेल्या आदिवासी हक्क विधेयकाच्या निमित्ताने मनुष्यकेंद्री पर्यावरण विचारातल्या त्रुटीही समोर येत आहेत. काही ठिकाणी, प्रसंगी नकारघंटाच वाजवावी लागते, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. मात्र, लेखकाच्या प्रतिपादनातील या महत्त्वाच्या त्रुटी वगळता पुस्तकाची उपयुक्तता निर्विवाद आहे. पर्यावरणासंबंधी प्रश्नांमध्ये सरळसोट उत्तरे तर नसतातच, पण पावलोपावली जनजागृती, सरकारी यंत्रणांना हलवणे, प्रश्नांची अर्थशास्त्रीय बाजू लक्षात घेणे, या व अशा अनेक आर्थिक-सामाजिक- राजकीय गुंतागुंती असतात. श्री. आगरवाल, चंडी प्रसाद भट, राजेंद्रसिंह, सुनीता नारायण आदी कृतिप्रवण मंडळींनी त्यावर मात कशी केली याचा प्रेरणादायी वृत्तान्त फार प्रभावीपणे पुस्तकात मांडला आहे. या प्रश्नांवरचे उपाय शक्य आहे तिथे सुचवले आहेत. लेखकाने केलेल्या भ्रमंतीचाही फायदा लेखनात झाल्याचे जाणवते. पुस्तक वाचून झाल्यावर निराश न वाटता ठाम कृती करायची इच्छा वाचकाला होते. अजून वेळ गेलेली नाही हे जाणवते. हे पुस्तकाचे आणि ल
एखकाचे यश.
- संतोष शिंत्रे


Loksatta Review
Reader Comments:

writes on Mon Jul 31 19:07:56 2006:

crane kneel husbands.occasioned toast Shattuck conceal likened

Write your review for this book

Other works of अतुल देऊळगावकर
   विश्वाचे आर्त
   डळमळले भूमंडळ
   स्वामीनाथन
   बोलिले जे

Similar books:
  प्रवास
   पृथ्वी प्रदक्षिणा आणि साहसी प्रवास
   अपूर्वाई
   जावे त्यांच्या देशा
   अहा, देश कसा छान
   पूर्वरंग
   More ...  
  संदर्भग्रंथ
   मुस्लिम मनाचा शोध
   यमुनापर्यटन
   शोध महात्मा गांधींचा - १
   ब्रिटिश रियासत खंड १,२
   त्रिवेंद्रमची मराठी हस्तलिखिते
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.