|
वाद-संवाद
Author: अरूण कांबळे
Publisher: प्रतिमा प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~120 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: 'रिडल्स इन हिंदुइझम' या डॉ. आंबेडकराच्या ग्रंथावरील गाजलेला वाद-संवाद. Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार २७ जुलै २००३
द्रष्टी 'अभिरुची'
मराठी मनाला समृद्ध करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा मोठा वाटा होता, त्यात 'अभिरुची' या मासिकाचा क्रमांक बराच वरचा लागतो. १९४३ पासून सुरु झालेलं हे मासिक अभिजात कवितांच्या प्रकाशनाबद्दल चांगलंच गाजलं. मराठी काव्याभिरुची संपन्न करण्यामध्ये अभिरुचीचा सहभाग होता. कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, शरदच्चंद्र मुक्तिबोध, ना. घ. देशपांडे अशा अनेक नामवंतांच्या कवितांनी अभिरुचीची पानं कायम सजलेली असत. या कवितांच्याच जोडीनं विनोदी लेखन आणि 'वाद-संवाद' या सदरानंही रसिक मनाला मोहवून टाकलं होतं.
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी, भाषेचा - आशयाचा बोजडपणा, नावीन्याच्या आणि प्रयोगशीलतेच्या नावाखाली चाललेला भोंगळपणा हे या वाद-संवादाचे विषय असत. वृत्ती-प्रवृत्तींवर टीका केली जाई आणि ती व्यक्तिगत पातळीवर घसरणार नाही, याची काळजीही घेतली जाई. शमा आणि निषाद म्हणजे द. ग. गोडसे आणि मं. वि. राजाध्यक्ष यांनी हे चुरचुरीत आणि पौष्टिक सदर जवळजवळ नू वर्षे चालवलं. त्या काळात या सदरावर अनेकांचा रोषही ओढवला, पण अशी वृत्तीलक्ष्यी टीका वाचण्याची सवय वाचकांना लागली. 'टवाळा आवडे विनोद' या वचनाला छेद देणारं लेखन मं.विं.नी या सदरात सातत्याने केलं.
१९४३ ते ५३ या वर्षांतील या सदरांचं निवडक संकलन वाद-संवाद (निषाद आणि शमा) याच नावानं प्रसिद्ध झालं आहे. तात्कालिक लेखन वगळून आजही प्रस्तुत वाटेल, असे लेख यात घेतल्याचं संपादकांनी म्हटलं आहे. 'मुद्रणसाक्षेप' किंवा 'पदवी आणि प्रबंध' असे लेख याची उत्तम उदाहरणे आहेत. सिनेमागृहात राष्ट्र्गीत वाजवण्याचा आग्रह धरणार्या एका सरकारी आदेशाचे मध्यंतरी बरेच चर्वितचर्वण झाले. 'राष्ट्र्गीताचा बेंडबाजा' या स्फुट लेखातून ही व्याधी तशी जुनीच असल्याचं कळतं आणि निषादाचा अर्थात मं.वि. राजाध्यक्ष यांचा द्रष्टेपणा जाणवून मान आदरानं झुकते. लेखकद्वय निषाद आणि शमा (ऊर्फ मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि द. ग. गोडसे) (संपादन) ग. रा. कामत आणि मीना गोखले
|
 |
 |
|