|
श्री. दा. पानवलकर यांची कथा
Author: श्री. दा. पानवलकर
Publisher: साहित्य अकादमी
|
|
Price: $6.47 $5.17 20% OFF ( ~270 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: श्री. दा. पानवलकर परंपरेचे आणि पुरूषार्थाचे भान ठेवून लिहितात. त्यांच्या या पुरूषार्थाचा आक्रमक कृतीवर विश्वास आहे. परंपरेतील सत्य, मांगल्य, प्रेम, ज्ञान, परतत्व या गोष्टी वंदनीय आहेत हे त्यांना पटते. परंतु आजच्या भ्रष्ट, भरभराटीच्या जगात त्या कुठे शोधता येतील याचा अंदाज त्यांना लागत नाही. त्यांच्या अंत:करणातला हळुवारपणा ते पृष्ठभागावर आणित नाहीत. त्यांच्या मनाची दृश्यभूमी करडी, कोरडी, करकरीत आहे. सर्वसाधारणपणे ज्या तर्हेचे कौटुंबिक नातेसंबंधातले अगर तरूण स्त्री पुरूषांच्या कंपित हृदयाचे भावसाफल्य सर्वबाजूनी मनाला भिडते, त्या तर्हेचे भावसाफल्य पानवलकराच्या वृत्तीला अपरिचित आहे, ते त्यांना दुबळे, भाबडेदेखील वाटण्याची शक्यता आहे. त्यांचे साफल्य हे रक्ताच्या अनिवार मागणीचे, बेदरकार, विध्वंसक कृतीचे आहे. कुस्करून लुटलेल्या सुखाचे आहे, या सुखाची पारध करीत फिरणार्या साहसी, शिकारी वृत्तीचे आहे. तसेच अज्ञाताचा वेध घेण्यासाठी सर्वस्वाची बाजी लावणार्या अवलिया फकीर सन्याशाचे, कलंदर कलावंताचे आणि दरिद्री ज्ञानवंताचे सुद्धा आहे. आदिम जगात, दीन गाजवणा-या बलदंड माणसाचा हा पुरूषार्थ आहे. या कथाचे संपादन व संकलन करणारे प्रा. म. द. हातकणंगलेकर ज्येष्ठ, सव्यसाची व साक्षेपी समीक्षक असून सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करीत असत. काही वर्षापूर्वी प्राचार्य पदावरून निवृत्त.
कथानुक्रम ... प्रस्तावना यापरि सांडुनि दमयंती औदुंबर साय सर्च पद्म झळा अपील भूमी चांदणं सहदेदा अग्नी आण एका नृत्याचा जन्म कमाई अग्निसर्प हुंकार
प्रस्तावना १९६० ते १९८५ या पाव शतकातले श्री. दा. पानवलकर हे एक महत्वाचे आणि जबरदस्त सामथ्यांचे कथाकार. १९४५ नंतर मराठी कथेच्या अंतरंगात आणि बहिरंगात फार मोठा बदल घडून आला. पुरातन काळातील कहाण्या, बोधकथा पासून अर्वाचीन काळातील हरि नारायण आपटे यांच्या स्फुट कथांपर्यंत निवेदनात्मक साहित्याने प्रवास केला होता. ब्रिटिश साहित्याशी परिचय झाल्या नंतर परंपरागत मराठी साहित्यात जे अनेक बदल झाले त्यात नवीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रणालीचा उगम झाला, तसेच साहित्यप्रकारांचे अंतरंगही पालटले. या ओघात स्फुट कथेची कथा अणि कथेची लघुकथा झाली. प्रा. ना. सी फडके यांनी लधुकथेचे सुबक, लालित्यपूर्ण रचनातंत्र मराठी कथाकृतीवर बिंबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हे प्रामुख्याने कथेच्या रचना कौशल्याचे, भाषाशैलीचे, वातावरण निर्मितीचे आणि व्यक्तिचित्रणाचे तंत्र होते. कथेतील घटना आणि व्यक्ती यांच्या परिणामकारक मांडीचे कौशल्य कोणत्या सूत्रानुसार अभ्यासावे आणि आत्मसात करावे याचा विचार प्रा. फडके यांनी मुख्यत: ब्रॅन्डन मॅथ्यूज, क्लेटन हॅमिल्टन या अमेरिकन टीकाकारांच्या विचाराच्या अधारे आणि एडगर अॅलन पो आणि ओ हॅनरी या कथाकारांनी निमांग केलेल्या तंत्रशुद्ध कथांच्या नमुन्यानुसार मराठीत मांडला होता. या नैपुण्याचा कोच वि. स. खांडेकरासारख्या निखळ जीवनावर्षवेधी कथाकारालाही वाटू लागला. य. गो. जोशी यानी या लघुकथेच्या तंत्र मंत्राचा बडेजाव आपल्या कथालेखनाने अणि तंत्र महात्म्यावरच्या उपहासगभं आघातानी साफ कमी करेपर्यंत, सुमारे १९४० पर्यंत तो टिकून होता. य. गो. जोशी यांनी कथेच्या रचनेपेक्षा तिचे अंतरंग महत्वाचे आहे आणि या अंतरंगात आपल्या देशातल्या सनातन नातेबंधानाना, भावजीवनाला आणि सर्वसामान्य माणसांच्या कौटुंबिक सुखदु:खाना मध्यवर्ती स्थान देणेच योग्य आहे, त्यासाठी भाषाशैलीची आर्जवे करण्याची गरज नसते, नितळ भावनेचा परिस लागला की सामान्य अनुभवाचेही कठासुवर्ण बनविता येते, ही धारणा वाढीला लावली. 'शेवग्याच्या शेंगा', 'सुपारी', 'वहिनीच्या बांगडया' यासारख्या घरंदाज भावजीवनाचे दर्शन घडविरा-या कथा त्यांनी लिहिल्या. कथेतील घटना, प्रसंगापेक्षा त्यातील भावसंपन्नता ही अधिक अर्थपूर्ण असते या तत्वाचा पुरस्कार करताना, सैल रचनेच्या भावसंपन्न नवकथेचा पहाटकाल त्यांना दिसू लागला होता असे आज मागे वळून पाहताना म्हणता येते. अर्थात नवकथेच्या अनेक दिशापैकी ही एक दिशा होती. नवकथेची अन्य वैशिष्टये थोड्याच काळात स्पष्ट होऊ लागली. १९४५ नंतरच्या दोन दशकात 'सत्यकथे'च्या माध्यमातून नवकथेचे रुप आणि रंग साकार होऊ लागले. गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगुळकर आणि अरविंद गोखले या कथाकारांनी नवकथेचा स्वभाव आणि अंतरंग सष्ट केले यात शंका नाही. नवकथेने जर कोणते पहिले प्रमेय प्रस्थापित केले असेल तर ते कथेतील घटना प्रधानाचे वर्चस्व कमी करण्याचे. जीवनाचा अंतस्थ आशय हा नेहमीच घटनेशी निगडीत असत नाही. किंबहुना जीवनावर प्रभाव टाकणार्या घटना या भौतिक पातळीवर आकारबद्ध झालेले सघन प्रसंग नसतात तर त्यांचे स्वरुप मोठ्या प्रमाणावर मानसिक आंदोलनाचे. अबोध मनात साचत गेलेल्या दडपणांचे, त्यातून दृढ झालेल्या मनोरंगांचे, दिशाहीनपणे वाहणा-या संवेदना प्रवाहाने, त्यात उसळणा-या तर्कशून्य पण आकर्षक कल्पनाविश्वाचे असते, हे नवकथेने स्वीकारले. या प्रमेयाचे उत्तम दर्शन गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या कथेत घडविले. नवकथेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ती अधिक तन्य, काव्यमय झाली. वासनाविकार आणि चितन आणि यांच्या बेबंद प्रवाहात न्हाऊन निघाली. तिच्यातले आंतरिक उमाळे अधिक जिवंत आणि नैसर्गिक झाले, तिच्यातील आदिम प्रवृत्तीचे दर्शन सांकेतिक सभ्यतेचे बांध तोडून घडू लागले. पु. भा. भावे आणि काही मर्यादेत अरविंद गोखले यांच्या कथात हे दिसले. हा वारसा नंतर स. ह. जोगळेकर, श्री. ज. जोशी, नरहर फेणे, जातेगावकर आणि जी. ए कुलकर्णी यांनी चालू ठेवला. अर्थात जी. ए. कुलकर्णी यांची कथा या वैशिष्ट्यापुरती मर्यादित नाही हे उघड आहे. नवकयेचे या पुढचे वैशिष्ट्य म्हणजे ती अधिक निखळ व जीवनसन्मुख झाली. ती केवळ खेडेगावातील साध्या भोळ्या, गरीब, लाचारी, भटक्या गाणसांच्या जीवनाचे चित्रण करू लागली असे नव्हे, तर उपेक्षितांचे अंतरंगात ती जगू लागली आणि तिथल्या अलल वारीत बोलू लागली. या प्रदेशात आणि बोली भाषेत तिला आपले जातिवंत देशीपण गवसले. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेला ही साहित्य सोनियाची खाण सहजपणे सापडली. त्यातले सोने अन्य ग्रामीण कथाकार आपापल्या मगदुराप्रमाणे उचलित आहेत. ते मूळ खाणीपेक्षा अधिक कसदार कसे आहे हे दाखविण्याचा अट्टाहामही काहीजण करीत आहेत. नवकथेचे हे विशेष स्पष्ट झाल्यानंतर कथाकारांची जी नंतरची पिढी उजेडात आली तिच्यात दि. बा. मोकाशी, शांताराम, श्री. ज. जोशी, अच्युत बर्वे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार हे कथाकार आहेत. ... ...
|
 |
 |
|