|
तूर्तास ...
Author: दासू वैद्य
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~130 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हा दासू वैद्य यांचा पहिला कवितासंग्रह . दासू वैद्यांची कविता निसर्गापेक्षा मानवी जीवनात अधिक रमते, जीवनातील अंतर्गत विरोधांचा आवर्जून वेध घेते. हा विरोध अभिव्यक्त करण्यासाठी ते व्यावहारिक बोलीभाषेचा अवलंब करतात. भाषेची प्रस्थापित काव्यात्म रूपे आणि अलंकरण यांपासून दासू आपल्या कवितेला कटाक्षाने दूर ठेवतात. तूर्तासमधील कवितांमधून ते मानवी जीवनातील वास्तवाच्या अलिप्त, कोरड्या आणि क्वचित मिस्कील कथनातून आपल्या क्षुब्ध आणि तीव्र भावना व्यंजित करतात . यातील कविता समकालीन असूनही ती समकालीन काव्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. या काव्यसंग्रहाला साहित्य क्षेत्रातले अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, २१ मार्च २००४
स्वत:चे वेगळेपण सिद्ध क्रणारी प्रगल्भ कविता
नव्वदीच्या दशकात लिहू लागलेल्या नव्या क्वींचे काही वाचनीय कवितासंग्रह अलीक्डे प्रकाशित झालेले आहेत. त्यातला 'तूर्तास' हा दासू वैद्य यांचा संग्रह स्वत:चे वेगळेपण सिद्ध क्रणारा आहे. विरोध, विसंगती, विपरीतता यांचे चित्रण क्रताना उपहासाचा, उपरोधाचा अवलंबही त्यात आढळतो. बरीचशी कविता वर्णवर्ग अशा कक्षेत फिरत राहिलेली आहे.
नव्वदीच्या दशकातल्या नव्या क्वींनी अशा कक्षा ओलांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या दशकात विचारप्रणाली आणि चळवळी यांना आलेल्या रुपांविषयीची ती प्रतिक्र्या आहे इसे म्हणता येईल. दासू वैद्य यांच्या बर्याच कवितांतून अशा प्रकारची आनुभवाची प्रगल्भता आढळते. नुसताच अनुभव नव्हे, तर वाढही. कविता एकेका व्यक्तीची असते, समूहातल्या एकेकटया व्यक्तीची असते. एका व्यक्तीच्या माध्यमातून समूहातल्या एकेक्टया व्यक्ती बोलत असतात. त्यामुळे कोणतीही कविता निव्वळ एका व्यक्तिची आभिव्यक्ती नसते. ती एका समूहाचीही नसते, तर समूहातल्या एकेका व्यक्तीची आभिव्यक्ती असते.
त्यामुळे अत्यंत आत्मकेंद्रित, व्यक्तिकेंद्रित कविताही समूहातल्या एकेका व्यक्तीच्या जगण्याचा उच्चार असते. नव्या क्वींना कवितेविषयीचे भानही आलेले दिसते. 'तूर्तास' या संग्रहात तर ते निश्चितपणे आढळते. 'तूर्तास'मध्ये हे भान आढळते.
वैद्य यांची कविता ही 'सर्वसामान्य' म्हटल्या जाणार्या माणसांविषयीची आहे. ९ टक्के भारतीय हे याच कोटीतले लोक आहेत. या ९ टक्के माणसांच्या चिंता, काळज्या, संक्टे, स्थिती, गती, भवितव्य यांच्यावियचीच्याच या कविता आहेत. त्याचबरोबर पाच टक्क्यांच्या जगण्यातली कृत्रिमताही व्यक्त झालेली आहे. सुरुवातीच्याच 'राजघाट' या कवितेत 'अ' सामान्य आणि 'सर्व'सामान्य यांच्यातला भेद व्यक्त झाला आहे. 'अ'सामान्यांचे मरणही कृत्रिम ऐपचारिक्तांनी वेढलेले आसते. तर सर्वसामान्यांच्या मरणाला आतड्याचा पीळ असतो.
सर्वसामान्य मरतो तेव्हा 'गोठ्यातली चंद्री गाय कडब्याला तोंड लावत नाही'. क्वीने पुढे 'बस एवढंच' असे म्हटलेले असले तरी सरकारी इतमाम, चंदनाची लाक्डे, सर्वधर्मीय प्रार्थना, राष्ट्रीय प्रसारणात शोकाकुल धून- या सर्वच गोष्टी क्शा निरर्थक आणि दांभिक असतात हेच सुचवलेले आहे. त्याचबरोबर एक दंभस्फोटही आहे.आपल्या चमत्कारिक लोक्शाहीत प्रतिनिधी म्हणजे जणू काही राजे- महाराजे जोपर्यंत आपले लोक्प्रतिनिधी प्रौढ होत नाहीत, तोपर्यंत आपली लोक्शाहीदेखील प्रौढ होणे शक्य नाही.
वर्तमान काळात 'लोक' म्हणून ओळखल्या जाणार्या माणसांना काहीही किंमत नसल्याची जाणीव 'अहवाल' या कवितेत आतिशय भेदक्तेने व्यक्त झालेली आहे. झुरळ, पाली, उंदीर, ढेकूण, डास, मांजरी, कुत्री या गोष्टी फार झाल्याने जगणे क्से असह्य झालेले आहे हे क्वी सांगतो. राजकीय स्थितीवरची टिप्पणी वा सामाजिक परिवर्तनाच्या घोषणा यांचा उच्चार कवितेत न क्रताही 'तूर्तास'मधल्या कवितांमध्ये प्रखर सामाजिक- राजकीय भाष्य आढळते. 'वर्तमान' या कवितेत क्वीने विचारले आहे. 'कुठेच काही जळत नाहीय मग हा जळक्या मांसासारखा वास कसा?' वातावरणातली हिंस्रता काही कवितांमध्ये सूचक्तेने आलेली आहे. 'लोकांसाठी गोष्ट' या कवितेचा सरळसरळ राजकीय अन्वयार्थ लावता येईल. 'गारुड्याची पुंगी हिसक्वणार्या नागाची गोष्ट' इथे सांगितलेली आहे. 'आम्हीच आपले' या कवितेत तर सरळसरळ धार्मिक भेदातून उदभवणार्या हिंसेचा निषेध केला आहे. 'वाहत्या रस्त्यावर' ही एक आतिशय सुंदर कविता या संग्रहात आहे. 'आयुष्य' या कवितेत म्हटले आहे : 'कमी तापवलं तर नासण्याची भीती जास्त तापवलं तर आलेल्या दाट सायीमुळे गुदमर होतो आयुष्याचा विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल?
'तूर्तास'मधली प्रतिमसृष्टी लक्षणीय आहे. सर्वधर्मीय प्रार्थनांचे लोट, अंगावर धावून येणारे दिवस, समुद्राचं उन्मत्त जनावर, बेवारशी म्हातार्यासारखा अंधार, झोपमोड झालेला पाऊस, सरपटणारी रात्र, फ्णा आपटणारा अंधार वगैरे प्रतिमांमधून दु:सह वर्तमानाचीच भंगलेली प्रतिबिंबे उमटलेली आहेत.'तूर्तास'मधल्या कवितांना वैयक्तिक आणि सामजिक आसे दोन्ही पदर आहेत आणि पुष्क्ळदा ते एक्मेकांत मिसळूनही गेलेले आहेत. 'तूर्तास'मधल्या कवितांतून, त्यातील प्रतिमासृष्टीतून त्याची प्रचीती येते.
वसंत आबाजी डहाके
|
 |
 |
|