|
आनंद साधना
Author: के. वि. (बाबा) बेलसरे
Publisher: त्रिदल प्रकाशन
|
|
Price: $5.03 $4.02 20% OFF ( ~210 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: एका साधकाचा साधन वृतांत. बाबा बेलसरे यांचे अध्यात्मिक आत्मचरित्र. प्रस्तावना विसाव्या शतकाला विज्ञानयुग समजतात. या युगांतील दोन महायुद्धे पाहिलेला व मुंबईच्या जीवनांत पूर्णपणे रुळलेला मी मध्यम स्थितींतील एक सामान्य मराठी माणूस आहे. आजुबाजूचें समाजजीवन झपाट्याने बदलत असतां त्यामध्ये संसारात नीट राहून माझ्या व्यक्तिगत जीवनांत मी समाधानाचा शोध केला, स्वानंद प्रत्यक्ष अनुभवण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्याची रूपरेषा या लहानशा आध्यात्मिक आत्मचरित्रांत आढळेल. जगात साठ वर्षे काढल्यावर सहज मनांत आले की आपण योजलें होते काय व त्यापैकी पदरांत पडलें काय याचा हिशेब तरी एकदा करून पहावा. कोणत्याही माणसाचा "मी" बनत असतां अनेक माणसांचे, अनुभवांचे आणि ग्रंथांचे संस्कार त्याच्यावर घडतात, त्या सर्वांना सारखें महत्त्व असत नाही. त्यापैकी मुख्य कोणते व त्यांचा परिणाम काय घडून आला येवढेच सांगण्यात अर्थ असतो. आपल्या अंतरांत राहणारा व आपल्या जीवनाचा केंद्रबिंदु जो "मी' तो फार गुंतागुंतीचा असतो. आपल्या मित्रांना, शत्रूना, आप्तांना, परिचितांना आणि स्वत:ला आपण निरनिराळे दिसतो. इतकेच नव्हे तर "मी" खरा कसा व कोण आहे हे आपल्या स्वत:लाही धड कळलेले नसते. म्हणून खरे आत्मचरित्र सांगणे सोपे नाही. तरीपण आत्मचरित्र कोणी लिहावें याला काही बंधन नाही. बाह्यजीवनाच्या दृष्टीने माणूस कितीही क्षुल्लक, अज्ञात, नीरस आणि उपेक्षित असो, त्याच्या अंतरांतील घडामोडी आत्मविकासाच्या दृष्टीने नेहमीच सांगण्यासारख्या असतात. मी खरा साधक नाही पण साधक होण्यास धडपडणारा इसम आहे. परमार्थाच्या मार्गावर चालणारा तिसर्या वर्गातील मी एक क्षुद्र पण अभ्यासू वाटसरू आहे. मी भगवंताच्या नामाचे थोडे सेवन केले. त्याला शरण जाण्याचा किंचित भाव ठेवला आणि श्रीसदगुरूंचे अनुसंधान राखण्याचा मनापासून अल्पसा अभ्यास केला. त्यामुळे पुढील तीन गोष्टी स्वानुभवाने मला पटल्या . १) एखादा सामान्य मनुष्यसुद्धा प्रपंचांत नीटपणे राहुन, संतांनी सांगितलेल्या भगवंताच्या मार्गावर चालू शकतो. २) प्रपंचांत भलेबुरे प्रसंग आले असतां (आणि राजापासून रंकापर्यंत ते येणारच) आपल्या अंत:करणांत होणारी घालमेल व तळमळ भगवंताच्या नामाने शांत होते. ३) श्रीसदगुरूंचा मनाने पाठिंबा घेऊन जगांत वावरले तर सर्व प्रकारच्या परिस्थितीत माणसाचे समाधान टिकतें व प्रसंगोचित कर्तव्य तो बरोबर करूं शकतो. अर्थात संतांनी स्वत: आचरलेला व लोकांना स्पष्टपणे सांगितलेला भगवंताचा म्हणजे आनंदाचा मार्ग अगदी खरा आहे, नव्हे अनुभवसिद्ध आहे. भगवंताच्या नामांत मन रमलें की भगवंताचें अनुसंधान जमतें आणि तें जमले की स्वत:च्या व इतरांच्या जीवनाकडे साक्षित्वाने पाहाण्याची कला साध्य होते. या कलेमध्ये आनंदाचा उगम आढळतो. भलत्या ध्येयाच्या नादी लागून नाम विसरले की भगवंताचें अनुसंधान हुकतें आणि तें हुकलें की साक्षित्व लोपते व तें लोपलें की जीवनांतील आनंद मावळतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे भगवंताच्या नामाने आपले अंतरंग सुधारतें, मग भगवंताशी जुळवून घेता येते, त्यामुळे आपले मन शांत होऊ लागते, आणि नंतर प्रपंचाच्या चढउतारांत देह खालीवर होत असतांना देखील आपला आनंद आपणास भोगतां येतो, हा माझ्या साधन-चरित्राचा इत्यर्थ आहे. श्रीसद्गुरुंच्या सांगण्यावरून लिहिलेल्या या आत्मचरित्रांत तसेंच दैनंदिन जीवनांत प्रगट होणारा मी आहे हा असा आहे. तो चांगला की वाईट हे ज्याचे त्याने ठरवावें. माझें साधन व समाधान त्यावर अवलंबून नाही. -- के. वि. बेलसरे
Reader Comments: महेन्द्र मधुकर सारंगधर writes on Wed Dec 28 07:35:10 2016: आनंद साधना हे पुस्तक नाशिकला मिळत नाही.तसेच दादरला west ला आयडिलला चौकशी केली त्यांच्याकडे ही नाही .सदर पुस्तक मला पाहिजे होते.कृपया काही सांगाल का?
तसेच मला PDF मध्ये दासबोध बाबा बेलसरेंचा पाहिजे आहे मिळेल का ?
|
 |
 |
|