|
आई तुझ्याच ठायी
Author: मंगला गोडबोले
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~170 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आई... भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं. आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्र्वराचा अंश काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं...
आईपणाइतकं गुंतागुंतीचं आणि न ओलांडण्याजोग नातं दुसरं नाही असं मनोगतात म्हणणार्या मंगला गोडबोले यांनी या पुस्तकात आईपणाच्या प्रक्रियेचा शोध घ्यायाचा प्रयत्न केला आहे. तेरा प्रकरणांमधून त्यांनी आई आणि मूल या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आई होण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने तपासून पाहिली आहे, त्याचबरोबर आईवर काय काय जबाबदार्या समाज लादत असतो आणि असे असून हाच समाज आईला मदत कशी नाकारतो,शेवटी आईच आपल्या मुलांची कशी रक्षणकर्ती असते ते विविध उदाहरणातून पटवून दिले आहे. या पुस्तकात साहित्यातील, समाजातील आणि प्रत्येकांच्या मनातील आईच्या प्रतिमेचा शोध लेखिकेने घेतला आहे. संपूर्ण पुस्तकात लेखिकेची भाषा कधी नर्मविनोदी, कधी संशोधनात्मक तर बर्याचवेळा लालित्यपूर्ण अशी आहे. लेखिकेने कुठेही पंतोजीचा शिकवायचा आव आणलेला नाही पण आईची महानता आणि आईपण सांभाळताना स्त्रीची होणारी धावपळ लेखिकेने अगदी अचूकपणे दाखविली आहे. पुस्तक वाचल्यावर प्रत्येक आईला,आई होऊ पाहणार्या तरुणींना आणि प्रत्येक पुरुषाला आईचे वेगळपण नक्की जाणवेल आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आई समजून घ्यायचा विचार तर करेल.
By Author
|
 |
 |
|