|
लेखकाची गोष्ट
Author: विश्राम गुप्ते
Publisher: देशमुख आणि कंपनी प्रकाशन
|
|
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~330 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ... अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स
"माणसाचं आयुष्य एकरेषीय नसतं, अनेक घटना-प्रसंग-कारणांच्या परिणामाने ते घडत-बिघडत असतं. त्यामुळे स्वत:तील एखाद्या पैलूविषयी सांगताना ते तेवढ्यापुरतं नसून एकंदर जगण्याविषयीचं कथन ठरतं. लेखकाची गोष्ट - अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक विश्राम गुप्ते यांनी मी फक्त माझा लेखकीय प्रवासच तेवढा सांगणार आहे असं जरी म्हटलेलं असलं तरीसुध्दा तो तेवढाच नाही हे पुढे वाचताना लक्षात येतं. परंतु हे आत्मचरित्रदेखील नाही. स्वत:च्या लेखकपणाच्या मर्यादेत राहून गरजेपुरता स्वत:च्या आयुष्यातला भाग ह्यात आलेला आहे. आपला भूतकाळ त्यांनी लेखनाशी जोडून घेतला आहे. पुस्तकांच्या प्रभावाने आपल्यात काय आणि कसे बदल होत गेले हे लिहिलं आहे. त्याचप्रमाणे स्वत: लिहायला लागल्यानंतर त्यावेळचे आपले वागणे, विचार-कृती, उत्तेजित होणे वा नैराश्यग्रस्त होणे, तेव्हाचे जगणे म्हणजे काय ह्याचा उलगडाही लिहिला गेला आहे. जगण्याच्या ओघात `आत' काय काय घडत होतं ते लिहायला लागल्यानंतर अधिकाधिक स्पष्ट होत गेलं त्याची ही गोष्ट आहे. लिहिण्याची धडपड म्हणजे `आतलं ऐकून लिहिणं.' म्हणून ही `लेखका'ची गोष्ट आहे. वाचनाच्या हव्यासामुळे त्यांच्या मनाच्या गाभ्यात लेखक बनण्याची आस जागी झाली असावी. सीए, वकील असा सरधोपट जीवनमार्ग न पत्करण्याचं कारण हेच होतं. प्रयत्न करूनही सीएच्या आर्टिकलशिपमध्ये त्यांचं लक्ष लागत नसे. वकिली करताना कामगारांचा वकील झाले पण प्रत्यक्षात मात्र व्यवसायापेक्षा न्याय-निवाड्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांना जास्त रमायला होत असे. ह्याचा परिणाम म्हणजे ह्या दोन्ही व्यवसायातून त्यांनी माघार घेतली. आपल्याला नक्की काय करायचं आहे हे ठरवता येत नव्हतं. संभ्रमावस्थेत असताना बाबा आमटेंच्या आनंदवनात ते दोनदा गेले, परत आले आणि नंतर श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाले. समाजसेवेचा ध्यास घेतला. झोपडपट्टीच्या कामात झोकून दिलं. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे, कसं जगायचं आहे ह्याविषयी स्पष्टता असेल तर जगणं त्यामानाने सोपं होतं. ठरवलेल्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याचा मार्ग अवघड असला तरीही वाटचाल सुकर बनते कारण ती दिशादर्शक असते. पण मुळात जर सुस्पष्टताच नसेल तर मार्गाची शोधाशोध आणि वाटचाल, दोन्ही अवघड बनते. ह्या काळात माणूस स्वत: उदास आणि सैरभैर होतो, चिडचिड करतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं इतरांशी वागणंही त्रासदायक होत रहातं. विश्राम गुप्तेंचंही हेच झालं. ते म्हणतात, `केवळ असणं आणि काहीतरी होणं ह्या दोन प्रेरणांच्या लठ्ठालठ्ठीत मी लिहिण्याची वाट शोधली.' लिहिण्याचीच वाट त्यांनी का शोधली असावी? आपलं सगळं लक्ष लेखनावर केंद्रित करण्याचा निर्णय का घेतला असावा?" -- चित्रा राजेंद्र जोशी. पूर्वप्रकाशित - अक्षरधारा - जून २०१९
"सर्वसामान्य माणसाला न झेपणारा अतीव प्रांजळपणा आणि आपल्याच जगण्याला कठोर साक्षीभावाने तपासणे या आत्मचरित्रात सहसा न आढळणान्या गोष्टी. विश्राम गुप्ते यांची ही 'लेखकाची गोष्ट' या दोन गोष्टी तर अगदी सहजपणे करतेच, पण त्याचबरोबर प्रत्येकच वाचकाता. लेखकाला ज्याची त्याची आपली गोष्ट निदान स्वत:पुरती तरी प्रामाणिकपणे सांगायला. तपासायला प्रवृत्त करते. लेखकाची गोष्ट | विश्राम गुप्ते यांचे हे सव्हायव्हल गाईड फॉर एव्हरी मराठी रायटर एका लेखकाने वाचकाला आणि एका वाचकाने लेखकाला कसे घडवले त्याची अद्भुत कहाणी सांगते. ए मस्ट रीड बुक." --संजय भास्कर जोशी
Other Links:
|
 |
 |
|