|
सहली एक दिवसाच्या, आसपास मुंबईच्या
Author: सुरेश परांजपे
Publisher: स्नेहल प्रकाशन
|
|
Price: $7.46 $5.96 20% OFF ( ~350 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: लोकसत्ता रविवार, १६ मे २००४
पर्यटनप्रेमींसाठी उपयुक्त
चांगले रस्ते आणि वाहनांची सहज उपलब्धता यामुळे पर्यटनात आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली नसती तरच नवल. अशा पर्यटनप्रेमींची अडचण असते ती चांगल्या मार्गदर्शकाची वा चांगल्या पुस्तकाची. पुण्याच्या स्नेहल प्रकाशनानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सुरेश परांजपे लिखित 'सहली एक दिवसाच्या असपास मुंबईच्या' या पुस्तकाने मुंबईकर पर्यटनप्रेमींची चांगल्या मार्गदर्शक पुस्तकाची गरज भागली आहे.
एकंदर सात विभागांत मुंबईच्या जवळपासची एका दिवसात पाहून येण्यासारखी २४२ ठिकाणं दिली आहेत. या ठिकाणांचा अल्प परिचय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आणि तिथे असलेल्या सोयी असा सर्व तपशील दिला असल्यानं पर्यटनप्रेमींना कोणतीच शंका राहणार नाही. लेखक स्वत: या सर्व ठिकाणी फिरला असल्यानं पर्यटकांच्या दृष्टीनं कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, ते दिलं असल्यानं पुस्तकाची उपयुक्तता आणि संग्राह्यमूल्य वाढलं आहे.
शहरात आठवडाभर यंत्रवत राबणारा सामान्य माणूस सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब जवळपास एखाद्या पिकानिकसाठी जायचं म्हणतो, तेव्हा ही २४२ ठिकाणं नककीच त्याचा शीण घालवू शकतात. पुस्तकातल्या आठव्या भागात जरा दूरची ठिकाणं दिलेली आहेत.
पर्यटनप्रेमींचं भटकंतीचं वेड लक्षात घेऊनच १९५३ आणि ५४ साली होमी तल्यारखान यांनी 'रोडस, टु ब्युटी अराऊंड बॉम्बे' आणि 'एस्केप फ्रॉम द सिटी' ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. त्यात अशाच सुमारे ७० ठिकाणांचा परिचय दिलेला आहे. सुरेश परांजपे यांचं पुस्तक पाहून या दोन पुस्तकांची आठवण झाली.
या पुस्तकात लेखकानं माहितीच्या ओघात प्रचलित समजुती खोडून वस्तुस्थितीही नमूद केली आहे. उदा. अंबरनाथचं शिवमंदिर हे सरसकट हेमाडपंथी बांधणीचं मानलं जातं. पण ही शौलीच प्रचलित करणारा हेमाद्रीपंत हा १३ व्या शतकात होऊन गेला. तर अंबरनाथचं शिवमंदिर त्याच्यापूवीR किमान १५० वर्षं आधी बांधलं गेलं आहे. हे लेखकानं आवर्जून नमूद केलं आहे. शिल्पशास्त्रदृष्टया हे मंदिर दख्खनी पद्धतीचं मानतात. ते इ.स. १०६० मध्ये बांधलं गेलं आहे. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी लिखित 'शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख' या पुस्तकात या मंदिराविषयी, इथल्या शिल्पांविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
'पापडखिंड आणि बारोंडा देवी' या लेखातही पापडखिंड तलावाच्या बंधार्याखाली वाघोबाचं देऊळ आहे, पण आत मूतीR मात्र सिंहाची असल्याचं लिहिलं आहे. 'जीवदानी'बद्दल लिहितानाही अलीकडे झालेल्या बदलाबद्दल आणि २५ वर्षांपूवीR पाहिलेल्या जीवदानीची तुलना केली आहे. ती खर्या भटकंतीप्रेमीला व्यथित करणारी आहे. अलीकडे बर्याच देवस्थानांचं इतकया झपाटयानं बाजारीकरण होत आहे की, पौशांसाठी हपापलेले, भक्तांना लुबाडणारे दुकानदार पाहिले की अशा देवस्थानांना जावं का, अशी शंका मनात येते.
परांजपेंच्या या पुस्तकात १७ रंगीत फोटोही आहेत. २५० ठिकाणांची माहिती आणि फोटो फक्त १७ असं एक व्यस्त प्रमाण सोडलं तरी पुस्तक संग्रही ठेवावं असंच आहे. कारण शेवटी ही ठिकाणं पाहण्यासाठीच पर्यटकांसाठी हे लिहिलं आहे.
मिलिंद वि. आमडेकर
|
 |
 |
|