|
चार नगरांतले माझे विश्व
Author: जयंत नारळीकर
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $24.37 $19.49 20% OFF ( ~550 Pages, R800)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ही कहाणी आहे असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीची. ही कहाणी आहे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, वडिलांकडून आलेला बुद्धिमत्तेचा वारसा पुढं नेणार्या किंबहुना आपल्या कर्तृत्वानं वेगळा ठसा उमटवणार्या भारतीय शास्त्रज्ञाची. ही कहाणी आहे, पाश्चात्य देशांत व्यवसायाच्या अनेक संधी येऊनही त्या नाकारत मायभूमीशी असलेली नाळ कायम ठेवत भारतात परतलेल्या निगर्वी व्यक्तिमत्त्वाची. ही कहाणी आहे डॉ. जयंत नारळीकर यांची.
Review courtesy of eSakal: ई-सकाळ १२ ऑक्टोबर २०१२ दिग्गज शास्त्रज्ञानं घडवलेलं रसाळ 'विश्व'दर्शन! -- सुरेंद्र पाटसकर ही कहाणी आहे असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीची. ही कहाणी आहे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, वडिलांकडून आलेला बुद्धिमत्तेचा वारसा पुढं नेणार्या किंबहुना आपल्या कर्तृत्वानं वेगळा ठसा उमटवणार्या भारतीय शास्त्रज्ञाची. ही कहाणी आहे, पाश्चात्य देशांत व्यवसायाच्या अनेक संधी येऊनही त्या नाकारत मायभूमीशी असलेली नाळ कायम ठेवत भारतात परतलेल्या निगर्वी व्य क्तिमत्त्वाची. ही कहाणी आहे डॉ. जयंत नारळीकर यांची. "चार नगरांतले माझे विश्व' हे त्यांचं आत्मचरित्र अलीकडंच प्रकाशित झालं आहे. एखाद्या व्यक्तीनं आत्मचरित्र लिहिण्याची ही काही पहिली वेळ नाही; परंतु प्रसिद्ध व्यक्तींभोवती एक वलय असते, त्यामुळं त्यां च्याबाबतची माहिती वाचण्याची उत्सुकता असतेच. त्यातही ती व्यक्ती नारळीकर यांच्यासारखी असेल, ही उत्सुकता अधिक असते. अनेकदा अशा प्रसिद्ध व्यक्तींची भाषणं, लेख आदींद्वारे सर्वांपर्यंत पोचलेली असते. नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या जीवनातले विविध पैलू या आत्मचरित्रात मांडले आहेत. हे आत्मचरित्र फिरतं ते बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चार शहरांभोवती. त्यातही केंब्रिजबद्दलची थोडी जास्त माहिती याच वाचायला मिळेल. याचं प्रमुख कारण म्हणजे भारतीयांना केंब्रिजबद्दल असलेलं आकर्षण. डॉ. नारळीकर केंब्रिजमध्ये असताना नियमितपणे घरी आई-वडिलांना पत्रं लिहून आठवड्यातल्या घडामोडी कळवत असत. ती सर्व पत्रं त्यांच्या आईनं जपून ठेवली होती. त्यांचा उपयोग केंब्रिजचं दर्शन घडवताना करण्यात आला आहे. डॉ. नारळीकर यांनी आडनावाच्या कथेपासून सुरवात केली आहे. त्यांचा जन्म झाला कोल्हापूरममध्ये. संस्कृतपंडित असलेले आजोबा आणि रॅंग्लर असलेले वडील यांच्याकडून त्यांना ज्ञानाचा वसा मिळाला. केंब्रिजमधून उच्चविद्याविभूषित होऊन वडील परतले, ते बनारसला. ते वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) गणित विभागाचे प्रमुख झाले होते. त्यामुळे नारळीकर यांचं बालपण "बीएचयू'च्या आवारातच गेलं. शिक्षणही बनारसमध्येच झाले. लहानपणाच्या आठवणी सांगताना त्यांनी १९४० आणि १९५० च्या दशकातलं चित्रणही रंजक पद्धतीनं केलं आहे. आपल्या शालेय व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी एक आठवण नारळीकरांनी सांगितली आहे. ""एकदा दहावीतल्या सहामाहीत पायथागोरसचं प्रमेय विचारलं होतं, तेव्हा त्याची सिद्धता त्यांनी वेगळ्या पद्धतीनं केली होती. उत्तरासाठी त्यांना पूर्ण गुण मिळाले होते; परंतु शिक्षकांनी मुद्दामहून त्यांना बोलावून घेतलं व शाबासकी दिली आणि सल्लाही दिला, की मॅट्रिकच्या परीक्षेत मात्र पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणेच उत्तर लिही. उत्तर अचूक आहे; परंतु परीक्षकाला अनेक प्रश्नपत्रिका तपासायच्या असतात. त्यामुळं त्याला प्रश्नाचं पूर्ण उत्तर वाचायला वेळ नसतो. नेहमीची पद्धत दिसली नाही की शून्य गुण मिळतील.'' हा किस्सा परीक्षार्थी जीवन पुरेसं स्पष्ट करणारा आहे. केंब्रिजमध्ये जाण्यासाठीची धडपड आणि ट्रायपॉस परीक्षेची तयारी यांची माहिती देताना तिथल्या सामाजिक रूढी-परंपरांचं वर्णनही नारळीकरांनी केलं आहे. ट्रायपॉसच्या दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन रॅंग्लर झाल्यानंतर तिसर्या वर्षांसाठी त्यांनी खगोल विज्ञानाशी संबंधित विषय निवडले. याला काही प्रमाणात कारणीभूत झाली ती फ्रेड हॉएल यांची पुस्तकं, अशी आठवण त्यांनी नमूद केली आहे. विशेष म्हणजे ट्रायपॉसची तिसरी परीक्षा नारळीकर यांना डिस्टिंक्शन मिळालं व टायसन मेडलही मिळालं. नारळीकरांच्या वडिलांना म्हणजे तात्यासाहेबांनाही १९३० मध्ये टायसन मेडल मिळालं होतं. त्यानंतर ते कुणाही भारतीयाला मिळालं नव्हतं. त्यानंतर हॉएल यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्याबरोबरचं संशोधन हा कालखंड वाचताना वैज्ञानिक भाषा कुठंही क्लिष्टतेनं मांडलेली नाही. संशोधनानंतर गृहस्थाश्रमातील प्रवेश, मुंबईत "टीआयएफआर'मध्ये केलेलं काम, पुण्यात "आयुका'ची उभारणी आदींची माहिती त्यांनी सुगम पद्धतीनं मांडली आहे. "जीएमआरटी'चे नियंत्रणकेंद्र पुण्यात सुरू करण्याची कल्पना आणि त्याहीपुढं जाऊन सुरू झालेलं आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी केंद्राची (आयुका) स्थापना यांची कथा वाचण्यासारखी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शालेय जीवन ते "आयुका'तून निवृत्त होईपर्यंतच्या प्रवासात भेटलेल्या दिग्गजांची आणि सहकार्यांची ओघवत्या भाषेत ओळख नारळीकरांनी करून दिली आहे. त्यामुळं ते केवळ आत्मचरित्र न राहता त्या कालखंडाची ओळख करून देणारा दस्तावेजच झाला आहे. स्वत-चं संशोधन करताना सर्वसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी त्यांनी घेतलेलं प्रयत्नही यानिमित्तानं अधोरेखित होतात. यशापयशाच्या भोवर्यात सापडलेल्या आजच्या पिढीला ह्या पुस्तकातून नक्कीच प्रेरणा मिळेल. डॉ. नारळीकरांबद्दल सर्वसामान्यांना असणारं कुतूहल हे पुस्तक वाचल्यावर नक्की शमेल.
Other Links:
|
 |
 |
|