|
नटसम्राट
Author: वि. वा. शिरवाडकर
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $4.62 $3.69 20% OFF ( ~90 Pages, R135)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: शिरवाडकर यांचे सर्वांत गाजलेले नाटक, या नाटकाने इतिहास निर्माण केला. आजही प्रत्येक कलाकाराला हे नाटक एक आव्हान वाटतं. या नाटकासाठी शिरवाडकरांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला. नटसम्राट गणपतराव बेलवलकर या माणसाची ही शोकात्मिका आहे. एके काळी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले गणपतराव आपली सर्व मालमत्ता मुलांमध्ये वाटून टाकतात आणि ऐन वार्धक्यात निराधार होतात, हक्काची मुलंही विचारेनाशी होतात. वृध्दावस्थेतील एकाकीपणा हा या नाटकातील केंद्रवर्ती आशय असला तरी अत्यंत उत्कट वृत्तीच्या संवेदनाक्षम माणसाला भोवतीच्या व्यवहारी जगातले सांकेतिक जगणे जगता येत नाही. कोणीही कोणाचे नसते हा विच्छिन्न करणारा जीवनार्थ या नाटकाला प्राप्त होतो. अत्यंत प्रभावी स्वगते, भावनेला आव्हान करणारी शब्दकळा, आप्पा आणि कावेरी यांची परिणामकारक व्यक्तिचित्रे यांमुळे हे नाटक प्रभावी ठरले. नटसम्राट हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीला शिरवाडकरांनी दिलेले हे एक अजरामर रत्न आहे.
Reader Comments: जगन्नाथ तुकाराम गायकवाड writes on Wed Mar 16 15:20:09 2016: मी या पूर्वी या नाटका बाबत ऐकून होतो .आज बरोबर सेवानिवृत झाल्यानंतर नानांनी साकारलेला नटसम्राट हा चित्रपट पाहिला जरी नाना या चित्रपटात म्हणाले असले आमचंकाय हो?लेखकांच्या शब्द संपदेवर आंम्ही मोठे झालो हा नानांचा मोठेपणा आहे पहिल्याच दिवशी दूसरा शो प्रथम पाहिला अथ पासून ईथ पर्यंत माझ्या डोळ्यातील आश्रु मला लपवता आले नाहीत.तीच आवस्था बाराव्या वेळा हा चित्रपट पाहताना झाली.ज्ञानेश्वरीत माउली सुद्धा एका ओवीत म्हणतात " सकल तिर्थांचिये धुरे । जिये का माता पितले । तया सेवेसी शरीरे । लोण किजे ।।" पिंजरा य चित्रपटात नजरेला दावी पाप त्यास नेत्र म्हणू नये । विसरला आई बाप त्यास पुत्र म्हणू नये.हे जरी खरं आसल तरी आजची " नटसम्राट "ही वस्तस्तिथी आहे.ही खंत वाटते.शेवटी नानांच्या कटो-यात हे प्रेम भिक्षा म्हणून नव्हे तर देणं म्हणून अर्पण करतो.yogesh patil writes on Thu Jun 1 05:21:23 2006: Write your comments on the book here and
click on "Add My Comments".
pls. give me for read
|
 |
 |
|