Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 
Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts

तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे
Author: म. सु. पाटील
Publisher: शाद्वल प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~350 Pages, R350) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.

Synopsis:
महाराष्ट्र टाईम्स नोव्हेंबर २६ २००५
शोध - कवी तुकारामाचा
तुकाराम सर्वसामान्य माणसांनाही आपल्या जवळचे कवी का वाटतात? त्यांच्या मोठेपणाविषयी आदर वाटला तरीही त्यांच्या आपल्यामध्ये काही साम्य आहे असे वाटते ? मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. सु. पाटील यांनी आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधासाठी 'कविमन स्वरूप व शोध'- या विषयाच्या निमित्ताने ज्ञनदेव आणि तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास केला. आणि 'तुकाराम' अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे' हा ग्रंथ सिद्ध झाला. त्याविषयी.......
....................................
ज्ञनेश्वर आणि तुकाराम हे दोन्ही संत म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी साहित्याचे मानबिंदू. शतकांमागून शतके उलटली तरीही त्यांच्या लेखणीचे गारुड मराठी मनावर स्वार करून आहे. एवढेच नव्हे तर नव नव्या दृष्टिकोनांमधून त्यांच्या अभंग वाङZमयाचा आणि ग्रंथांचा विचार करणे सातत्याने चालूच आहे. मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. सु. पाटील यांनी आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधासाठी 'कविमन र्‍ स्वरूप व शोध'- या विषयाच्या निमित्ताने ज्ञनदेव आणि तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास केला. भारतीय साहित्यशास्त्र आणि पाश्चात्य साहित्यविचार यांचा आधार त्यांनी घेतला. अपल्या या विषयाचे युरोपीय साहित्य विचाराच्या संदर्भात पुनर्वाचन केले आणि 'तुकाराम'-अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे' हा ग्रंथ सिद्ध झाला.
कवी म्हणून तुकारामांच्या अभ्यासाचे परिशीलन करताना त्यांनी अनेक निरीक्षणे मांडली आहेत. तुकाराम सर्वसामान्य माणसांनाही आपल्या जवळचे कवी का वाटतात? त्यांच्या मोठेपणाविषयी आदर वाटला तरीही त्यांच्या आपल्यामध्ये काही साम्य आहे असे वाटते, ते मुख्यत: आयुष्यात त्यांना जे सोसावे लागले, त्यांचे आंतरिक जीवन त्यातून जे ढवळून निघाले, त्यामुळे कटु अनुभवांमुळे भवतालच्या माणसांपासून त्यांचे तुटत जाणे, यातून देवाकडे वळण्याची प्रेरणा, अध्यात्मसाधना आणि कवित्वाच्या स्फूतीर्कडे झालेला प्रवास, साधकावस्थेच्या प्रवासातले हे टप्पे गाठत असताना त्यांना जो अंतर्बाह्य विश्वाशी झगडा द्यावा लागला, त्यातून कवित्व आणि पारमाथिर्क जीवनाचा आणि व्यक्तित्वाचा विकास कसा होत गेला हे सगळे डॉ. पाटील यांनी सूक्ष्मदृष्टीने आणि नेमकेपणाने सांगितले आहे.
तुकारामांच्या कविवृत्तीसंबंधी लिहिताना ते त्यांच्या अनुभवनिष्ठ कवित्वाकडे निदेर्श करतात.
अनुभवें आलें अंगा| तें या जगा देतसें|
नव्हती हाततुके बोल| मूळ अ३ल अंतरिंचीं| |
या अनुभवांना बळ होते, ते हृदयनिवासी विठ्ठलाचा हात हातात आहे याचे.
तुकारामांच्या कविव्यक्तित्वाचा शोध डॉ. पाटील यांनी कसोशीने घेतला आहे. तुकारामांची एक भक्त म्हणून झालेली जडणघडण, पूर्व संतांचे त्यांच्यावरील संस्कार, यांची अभंगामधील प्रतिबिंबे या लेखनातून स्पष्ट दिसतात. नामभक्ती हे फार मोठे साधन. त्याच्या अनेकरंगी आराधनेतून तुकारामांना आलेली परिपूर्णता शब्दांमध्ये कशी प्रकट होते, त्यामुळे संज्ञविश्व उजळत जाऊन 'तुका आकाशाएवढा' कसा होतो, प्रेमपाशाने आपण पांडुरंगावर सत्ता गाजवतो आणि त्यामुळे आपण 'शब्दसत्ता' असणारे भक्त आहोत अशासारख्या जाणीवांचा सखोल वेध लेखकाने घेतला आहे.
तुकारामांचे काव्य मुख्यत: भावकाव्याशी सार्धम्य सांगणारे आहे. त्यामुळे त्यातील उत्कटता मनाचा वेध घेते.
स्त्रिया, पुत्र कलत्र हे तव मायावंत|
शेवटीचा अंत कोणी नाही| |

अशांसारख्या अनेक उक्तींमधून त्यांच्या अ१हिक, प्रपंचविषयक प्रतिक्रिया प्रकट होतात. तुकारामांचे अभंगांचे विषय, त्यांच्या मांडणीची वैशिष्ट्ये, प्रतिमा, अलंकार, या सर्वाचे मूलगामी विवेचन या ग्रंथात केलेले आहे.
वाङZमयीन इतिहासाच्या संदर्भात तुकारामांच्या काव्याचे महत्त्वही डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले आहे. मुळात ज्या ज्ञनदेवांवर तुकारामांची अपार श्रद्धा होती, त्यांनी लेखनासाठी अभिजनांच्या संस्कृत भाषेअ१वजी सामान्यांच्या, स्त्रीशूदांच्या प्राकृत मराठीचा आधार घेतला. एकनाथांनंतर साक्षात जगण्याशी संबंध असणारे संतकाव्य क्षीण झाले. अशा वेळी अनवट आणि अपारंपरिक असे लेखन तुकारामांनी केले. स्वत:चे अनुभव आणि भवतालच्या जनजीवनाचे मानस, त्यातील गुंतागुंत, सुखदु:खे, सत्य, असत्ये - अडाणीपण याचे चित्रण करणे हा त्यांचा हेतू होता. म्हणून प्रसंगी बंडखोरी, संकेताचे भंग, परिवर्तन, अशा रोमॅंटिक वास्तव वादाशी तुकारामांचे नाते असल्याचे डॉ. पाटील यांनी मांडले आहे. केशवसुत, कुसुमाग्रज, सुवेर, ढसाळ, दलित, स्त्रीवादी कवयित्री या कवींच्या कवितांचे तुकारामांच्या कवितेशी असणारे सार्धम्यही ते दाखवून देतात.
डॉ. पाटील यांचे त्या ग्रंथातील विवेचन त्यांचा चिकित्सक जिज्ञसू पिंड, काव्यातील जाणकारी, विलक्षण समीक्षादृष्टी, या सर्वाचे मनोहर दर्शन घडवणारा आहे. तुकारामांच्या काव्यानुभवाची संघटनासूत्रे या नावाला न दचकता ग्रंथ जरूर वाचावा, कवी तुकारामांचे सम्यग दर्शन त्यामुळे घडेल आणि एक उच्च दर्जाचा आनंद आणि समाधान मिळेल, यात शंका नाही.
- डॉ. वीणा देव
=========
लोकसत्ता डिसेंबर ४ २००४
म. सु. पाटील यांनी आपल्या तुकारामावरील ग्रंथामध्ये या अद्भुत शैलीचे रहस्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकारामावर आजवर अनेकांनी लिहिले, पण एक साहित्यकृती म्हणून केलेले वाङ्मयीन विश्लेषण हे या ग्रंथाचे वेगळेपण आहे. या ग्रंथातली महत्त्वाची सूत्रे आहेत ती अशी- तुकारामांची अभंगगाथा ही अस्तित्वलक्ष्यी कृती आहे. बळवंत मनापर्यंतचा प्रवास, उद्वेगाचे अभंगात रूपांतर आणि इतर सत्तांशी संघर्ष हे दुसरे सूत्र आहे आणि अध्यात्माचे लोकशाहीकरण करणारा पॅराडाइम शिफ्ट हे तिसरे सूत्र आहे. डॉ. रमेश वरखेडे यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, 'भोत्ते मन स्त्रष्टे झाले की काव्य जन्माला येते आणि स्त्रष्टे मन द्रष्टे झाले की, पर्यायी सृष्टिचित्र (युरोपिया) रेखाटले जाते. तुकारामांच्या कवित्वाचे मूळ अस्तित्वाच्या लढाईत आहे आणि आत्मसंघर्ष करीत करीतच त्यांच्या आत्म्याचा विकास झालेला आहे. आधी आत्मनिंदा, मग आत्मपरीक्षण, आत्मसाधना आणि त्यातून बळिवंत होणे अशी ही अस्तित्वलक्ष्यी कृती आहे. या शब्दशक्तीमुळेच बदल घडून येतो. त्याचाच विस्तार काव्यानुभवाची संघटना सूत्रे या प्रकरणामधून म. सु. पाटील यांनी केला आहे. ज्ञानेश्वरीत अभिजात आणि रोमॅंटिक अशा संकरित काव्यदृष्टीचे दर्शन घडते. तुकारामांपर्यंत चालत आलेले हे रूढ पारिभाषित बदलले. तुकारामांनी अभिजाततेऐवजी वास्तव बोलीभाषेत आपले अनुभव मांडले. नियमांचे उल्लंघन आणि बंडखोरी तसेच रोमॅंटिक वास्तववादाशी नाते असलेली ही नवी संकरदष्टी होती. वरखेडे यांनी सअॅं पॅराडाइम शिफ्ट तो हाच. प्रस्थापित तत्त्वज्ञान आणि मुल्ये यात स्थित्यंतर होऊन नवी पर्यायी व्यवस्था पुढे येणे म्हणजे विचारव्यूहांचा गुरुत्वमध्य बदलणे. तुकारामांनी ग्राम्य आणि आरूष शब्दांना, सामान्यांच्या भक्तीला सौंदर्यमूल्यांची प्रतिष्ठा दिली आणि सावळे सौंदर्यशास्त्र दिले. पाटील यांनी तुकारामांच्या शब्दकळेचा केलेला अभ्यास आणि आधुनिक भाषाशास्त्रानुसार काढलेले निष्कर्ष एका वेगळ्या अंगाने संतवाङ्मयावर प्रकाश टाकतात. तुकारामांची काव्यसृष्टी अनुभवमूलक असली तरी शास्त्रे-पुराणे, गीता, भर्तृहरीचे काव्य अशा अभिजात नीतिवचनांना त्यांनी आपल्या सहजबोलीतून कसे भावरूप दिले आहे त्याचेही सोदाहरण विवेचन पाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या या अभ्यासपूर्ण ग्रंथाचा सारांश असा सांगता येईल- तुकारामांची रचना ही भाषिक रचिते आहेत. वास्तव जीवनाला समांतर, पण भाव-अभावरूपाने जीवनाशी जोडलेली आभासी विश्वासारखी ही आनंदरूप फॅंटसी आहे. तुकारामांनी जसे आत्मभान प्राप्त करून घेतले तसे या काव्यरचनांची रूपे समजून घेत क्षणमुक्ती अनुभवणे हे सामान्य माणसालाही शक्य आहे. जीवनवादी अभ्यासकांना तुकारामांना शब्दसृष्टीतल्या फॅंटसीचे निर्माते म्हणून संबोधलेले फारसे रुचणार नाही, पण भाषेच्या आविष्कारात संस्कृती-इतिहास आणि संद्न्याविकास कसा लपलेला असतो हे पाहायचे असेल तर ही अनुभवरूपे वाचायलाच हवी.
-- दीपक घारे

Review courtesy of Maharashtra Times:
महाराष्ट्र टाईम्स नोव्हेंबर २६ २००५
शोध - कवी तुकारामाचा

तुकाराम सर्वसामान्य माणसांनाही आपल्या जवळचे कवी का वाटतात? त्यांच्या मोठेपणाविषयी आदर वाटला तरीही त्यांच्या आपल्यामध्ये काही साम्य आहे असे वाटते ? मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. सु. पाटील यांनी आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधासाठी 'कविमन स्वरूप व शोध'- या विषयाच्या निमित्ताने ज्ञनदेव आणि तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास केला. आणि 'तुकाराम' अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे' हा ग्रंथ सिद्ध झाला. त्याविषयी.......

....................................

ज्ञनेश्वर आणि तुकाराम हे दोन्ही संत म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी साहित्याचे मानबिंदू. शतकांमागून शतके उलटली तरीही त्यांच्या लेखणीचे गारुड मराठी मनावर स्वार करून आहे. एवढेच नव्हे तर नव नव्या दृष्टिकोनांमधून त्यांच्या अभंग वाङZमयाचा आणि ग्रंथांचा विचार करणे सातत्याने चालूच आहे. मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. सु. पाटील यांनी आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधासाठी 'कविमन र्‍ स्वरूप व शोध'- या विषयाच्या निमित्ताने ज्ञनदेव आणि तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास केला. भारतीय साहित्यशास्त्र आणि पाश्चात्य साहित्यविचार यांचा आधार त्यांनी घेतला. अपल्या या विषयाचे युरोपीय साहित्य विचाराच्या संदर्भात पुनर्वाचन केले आणि 'तुकाराम'-अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे' हा ग्रंथ सिद्ध झाला.

कवी म्हणून तुकारामांच्या अभ्यासाचे परिशीलन करताना त्यांनी अनेक निरीक्षणे मांडली आहेत. तुकाराम सर्वसामान्य माणसांनाही आपल्या जवळचे कवी का वाटतात? त्यांच्या मोठेपणाविषयी आदर वाटला तरीही त्यांच्या आपल्यामध्ये काही साम्य आहे असे वाटते, ते मुख्यत: आयुष्यात त्यांना जे सोसावे लागले, त्यांचे आंतरिक जीवन त्यातून जे ढवळून निघाले, त्यामुळे कटु अनुभवांमुळे भवतालच्या माणसांपासून त्यांचे तुटत जाणे, यातून देवाकडे वळण्याची प्रेरणा, अध्यात्मसाधना आणि कवित्वाच्या स्फूतीर्कडे झालेला प्रवास, साधकावस्थेच्या प्रवासातले हे टप्पे गाठत असताना त्यांना जो अंतर्बाह्य विश्वाशी झगडा द्यावा लागला, त्यातून कवित्व आणि पारमाथिर्क जीवनाचा आणि व्यक्तित्वाचा विकास कसा होत गेला हे सगळे डॉ. पाटील यांनी सूक्ष्मदृष्टीने आणि नेमकेपणाने सांगितले आहे.

तुकारामांच्या कविवृत्तीसंबंधी लिहिताना ते त्यांच्या अनुभवनिष्ठ कवित्वाकडे निदेर्श करतात.

अनुभवें आलें अंगा| तें या जगा देतसें|

नव्हती हाततुके बोल| मूळ अ३ल अंतरिंचीं|ऽ

या अनुभवांना बळ होते, ते हृदयनिवासी विठ्ठलाचा हात हातात आहे याचे.

तुकारामांच्या कविव्यक्तित्वाचा शोध डॉ. पाटील यांनी कसोशीने घेतला आहे. तुकारामांची एक भक्त म्हणून झालेली जडणघडण, पूर्व संतांचे त्यांच्यावरील संस्कार, यांची अभंगामधील प्रतिबिंबे या लेखनातून स्पष्ट दिसतात. नामभक्ती हे फार मोठे साधन. त्याच्या अनेकरंगी आराधनेतून तुकारामांना आलेली परिपूर्णता शब्दांमध्ये कशी प्रकट होते, त्यामुळे संज्ञविश्व उजळत जाऊन 'तुका आकाशाएवढा' कसा होतो, प्रेमपाशाने आपण पांडुरंगावर सत्ता गाजवतो आणि त्यामुळे आपण 'शब्दसत्ता' असणारे भक्त आहोत अशासारख्या जाणीवांचा सखोल वेध लेखकाने घेतला आहे.

तुकारामांचे काव्य मुख्यत: भावकाव्याशी सार्धम्य सांगणारे आहे. त्यामुळे त्यातील उत्कटता मनाचा वेध घेते.

स्त्रिया, पुत्र कलत्र हे तव मायावंत|

शेवटीचा अंत कोणी नाही|ऽ

अशांसारख्या अनेक उक्तींमधून त्यांच्या अ१हिक, प्रपंचविषयक प्रतिक्रिया प्रकट होतात. तुकारामांचे अभंगांचे विषय, त्यांच्या मांडणीची वैशिष्ट्ये, प्रतिमा, अलंकार, या सर्वाचे मूलगामी विवेचन या ग्रंथात केलेले आहे.

वाङZमयीन इतिहासाच्या संदर्भात तुकारामांच्या काव्याचे महत्त्वही डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले आहे. मुळात ज्या ज्ञनदेवांवर तुकारामांची अपार श्रद्धा होती, त्यांनी लेखनासाठी अभिजनांच्या संस्कृत भाषेअ१वजी सामान्यांच्या, स्त्रीशूदांच्या प्राकृत मराठीचा आधार घेतला. एकनाथांनंतर साक्षात जगण्याशी संबंध असणारे संतकाव्य क्षीण झाले. अशा वेळी अनवट आणि अपारंपरिक असे लेखन तुकारामांनी केले. स्वत:चे अनुभव आणि भवतालच्या जनजीवनाचे मानस, त्यातील गुंतागुंत, सुखदु:खे, सत्य, असत्ये - अडाणीपण याचे चित्रण करणे हा त्यांचा हेतू होता. म्हणून प्रसंगी बंडखोरी, संकेताचे भंग, परिवर्तन, अशा रोमॅंटिक वास्तव वादाशी तुकारामांचे नाते असल्याचे डॉ. पाटील यांनी मांडले आहे. केशवसुत, कुसुमाग्रज, सुवेर, ढसाळ, दलित, स्त्रीवादी कवयित्री या कवींच्या कवितांचे तुकारामांच्या कवितेशी असणारे सार्धम्यही ते दाखवून देतात.

डॉ. पाटील यांचे त्या ग्रंथातील विवेचन त्यांचा चिकित्सक जिज्ञसू पिंड, काव्यातील जाणकारी, विलक्षण समीक्षादृष्टी, या सर्वाचे मनोहर दर्शन घडवणारा आहे. तुकारामांच्या काव्यानुभवाची संघटनासूत्रे या नावाला न दचकता ग्रंथ जरूर वाचावा, कवी तुकारामांचे सम्यग दर्शन त्यामुळे घडेल आणि एक उच्च दर्जाचा आनंद आणि समाधान मिळेल, यात शंका नाही.

- डॉ. वीणा देव

Loksatta Review

Write your review for this book

Other works of म. सु. पाटील
   सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध
   लांबा उगवे आगरी

Similar books:
  संशोधन
   मराठी रियासत - खंड १ ते ८
   युगांत
   धार आणि काठ
   भाषणरंग: व्यासपीठ आणि रंगपीठ
   नथुरामायण
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.