Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fontsशून्य महाभारत मागे - 1 - पुढे
प्रकरण - २

अर्जुन खिन्न मुद्रेने युधिष्ठिराच्या शिबिरात आला तेव्हा तेथे युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव द्रौपदीसह बसलेले होते. अर्जुनाची खिन्न्ता पाहून युधिष्ठिराने विचारले,

"अर्जुना, असे काय अशुभ घडले आहे की ज्यामुळे तू निराश आहेस?"

अर्जुनाच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले व तो सद्गदित कंठाने म्हणाला, ""हे महाबली, कपटी दुर्योधनाची अखेरची चालही यशस्वी झाली. कृष्णास त्याने शब्दात पकडून आपल्या बाजूला वळवले. आपल्याला मिळाली ती फक्त श्रीकृष्णाची सेना. पण या सैन्याचा आपल्याला काय उपयोग? आपल्याला हवा होता तो आपला सखा कृष्ण. केवळ तोच आपल्या चातुर्याच्या बळावर आपल्याला विजयश्री आणून देऊ शकला असता."

हे वृत्त कळताच सार्‍यांवरच खिन्न्तेचे मळभ दाटून आले.

मग युधिष्ठिर म्हणाला, ""ठीक आहे. जसे परमेश्वराच्या मनात आहे तसे होईल."

यावर भीम संतप्त होऊन, नेत्रांतून अग्निज्वाला ओकत म्हणाला,

"या कपटी दुर्योधनाला मी रणांगणात माझ्या गदेने ठेचून ठार मारेन."

द्रौपदीच्या नेत्रांतून अविरत अश्रुपात होत होता.

ती म्हणाली,

"माझा सखा माझ्यापासून का दुरावला? असे आम्ही कसले घोर पातक केले होते की त्याची आम्हाला अशी शिक्षा मिळावी?"

नकुल आणि सहदेव भयभीत सशांप्रमाणे भीमार्जुनाकडे पाहात बसले.

अर्जुन म्हणाला,

"आता आपल्याला स्वबलानेच हे युद्ध करावे लागेल हे निश्चित! कृष्ण किमान हाती शस्त्र घेणार नाही ही आपल्या लाभाचीच बाब आहे. आता आपणाकडे एकूण नऊ अक्षौहिणी सेना आहे तर द्रुपद, युयुधान, विराट, धृष्टकेतूसारखे महावीरही आहेत. कौरवांकडे भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तासारखे वीर आहेत. कौरवांकडील भीष्म आणि द्रोण आपलेच हितचिंतक आहेत. त्यामुळे हे महावीर संपूर्ण सामर्थ्याने आपल्याशी काही केल्या लढणार नाहीत. आपल्याला खरी भीती आहे ती कर्ण आणि अश्वत्थाम्याची. कर्ण पहिल्यापासून माझा द्वेष करतो, त्यामुळे कर्ण आपल्याला जड जाणार आहे हे निश्चित. परंतु मी माझे सारे सामर्थ्य पणाला लावून त्याचा पाडाव करेन. अश्वत्थाम्यासही आपणास रणात पाडता आले तरच आपला विजय सुकर होईल."

युधिष्ठिर म्हणाला,

"तू म्हणतो ते खरे आहे अर्जुना, पण कृष्ण जर त्यांच्या बाजूने असेल तर तो सर्वांना अग्निस्फुल्लिंगाप्रमाणे प्रदीप्त करेल. त्याचे भाषण ऐकले की नेभळटांना सुद्धा स्फुरण चढते. नद्याही मार्ग सोडून धावू लागतील असे शब्दसामर्थ्य त्याला लाभले आहे. नाही अर्जुना, आपला विजय सुकर नाही."

भीम काडकन शड्डू ठोकत, आरत नेत्र करत म्हणाला,

"हे बंधो, असे भयभीत भाषण फक्त तूच करू शकतोस. तुझ्यामध्ये पुरुषार्थ असा नाहीच. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे तुला काहीच वाटत नाही. आपल्याला भोगाव्या लागलेल्या यमयातनांचे तुला विस्मरण झालेले दिसते. स्वत:ला धर्म संबोधतोस तू, परंतु धर्माचे गूढ तुला माहीत नाही. आम्हाला वडीलपणाचा धाक दाखवत आमच्या पुरुषार्थास दडपणे तेवढे तुला चांगले मिते. द्यूतगृहात तू माझ्या करोधावर आवरण घातले नसतेस तर त्या नीच दुर्योधनाचे मस्तक मी माझ्या गदेने तेथेच छिन्न-भिन्न केले असते."

युधिष्ठिराच्या काळजीयुत चेहर्‍यावर प्रथमच हास्य जवळुरले.

"भीमा, तुम्हाला मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. जर यापूर्वी कृष्ण आपल्या बाजूने नसता तर आपण युद्धाचा कदापि विचार केला नसता, याची तुला जाणीव आहे. कृष्णानेच आपल्या ंत:करणात सूडाचा वन्ही प्रदीप्त केला हे तू विसरतो आहेस. आता आपण युद्धाची घोषणा केली आहे आणि नेमकी त्यावेळीस कृष्णाने बाजूलली आहे. आपण आता माघारही घेऊ शकत नाही, याची मला चांगलीच जाणीव आहे. आता आपण या परिस्थितीतून चांगला मार्ग कसा काढायचा हे पाहायला हवे,"

"कसला मार्ग?" द्रौपदीने आशेने विचारले.

"द्रौपदी, तुझी कृष्णावर अनन्यसाधारण भती आहे. तो तुझ्या शब्दांबाहेर जाणार नाही असा विश्वास मला वाटतो. कृष्ण काही स्वखुशीने दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेला नाही. केवळ दिल्या शब्दाच्या पेचात सापडून त्याला कौरवांची बाजू घ्यावी लागली आहे. याचाच आपण चांगला फायदा करून घेऊ शकतो. कृष्णाला तू जर खाजगीत भेटलीस आणि कौरवांचा भेद सांगण्याचे किंवा त्यांचा पराजय कसा करता येईल, याचे रहस्य विचारलेस तर तो तुला निश्चितपणे सांगेल. शिवाय कौरवांकडची विदूर-संजयासारखी माणसेही आपल्या बाजूला आहेत. ते आपल्याला मदत करू शकतील. तेच आपल्याला विजयाचा मार्ग दाखवू शकतील."

"कृष्ण माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, याची मला खात्री आहे." द्रौपदी प्रसन्न होत म्हणाली.

या नव्या कल्पनेने पांडवांच्या मनात आनंद दाटून आला. भीम तेवढा तटस्थ होता. तो म्हणाला,

"कृष्ण कसाही असला तरी तो दुटप्पी नाही. तो श्रेष्ठ राजकारणी आहे हे खरे, पण तो वचनभंग करणार नाही. त्याला आता जर दुर्योधनाची बाजू घ्यावी लागली असेल तर तो काहीही झाले तरी ती बाजू सोडणार नाही. शिवाय आपण पराकरमी आहोत आणि आपल्या बुद्धिचातुर्यावर आपला विश्वास आहे. आपण छलकपटाने दुर्योधनाचा घात करण्यापेक्षा मग आत्मघात का करून घेऊ नये? आपण आजवर अनंत यातना भोगल्या आहेत. आपण राज्यभरष्ट होऊन चौदा वर्षे वण-वण करत भटकलो आहोत. आता आपण पुन्हा राज्य प्राप्त करण्यासाठी युद्धाचा पट ंथरला आहे. युद्धात बाहुबल महत्त्वाचे आहे, बंधो! छलकपट अधर्माचे लक्षण आहे आणि त्याला तुझ्यासारख्या धर्मपंडिताने त्यास समर्थन द्यावे, हे आश्चर्य आहे."

"भीमा, धर्म सूक्ष्म आहे. भल्या-भल्यांना त्याचे नीटपणे आकलन झाले नाही. सामान्य व्यती सरधोपट धर्मतत्त्व हेच आदर्श ठेवतात आणि त्याप्रमाणे जगतात. आपण येथे युद्ध फक्त राज्यप्राप्तीसाठी करतो आहोत काय याचा विचार करायला हवा. कौरवांनी आपल्याला प्रथमपासून द्वेषबुद्धीने अलग ठेवले. त्यांनी द्वेषबुद्धीने आपल्या वधाचे प्रयत्न केले. कधी तुला विष खाऊ घातले, तर कधी जविंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वारंवार कपट केले असूनही आपण कधीही आजवर असत्याचा मार्ग धरला नाही. परंतु आता युद्धाची दुंदुभी फुंकली गेली आहे. आपली बाजू सत्याची की असत्याची हे युद्धातील विजय-पराजय ठरवणारआहे.

"या जगतातील व्यवहारधर्म असा आहे की जो जिंकतो त्याचीच बाजू सत्य आहे असे मानले जाते. पराजिताचे सत्यही असत्य ठरते. त्याला अनंत दूषणे दिली जातात आणि अधम कोटीत ढकलले जाते. जर आपला पराजय झाला तर आपल्या यातनांचे सारे संदर्भलतील. सत्तेसाठी हपापलेल्या भावांनी सुबुद्ध कौरवांशी रक्तरंजति युद्ध केले आणि त्यात त्यांचा विनाश झाला असेच लोक म्हणतील. लोकोतीत फार मोठे सामर्थ्य आहे. लोक जेत्यांना डोयावर घेतात आणि पराजितांना पापी मानतात. आपणही हरलो तर पापी ठरू. मग या आपल्या धर्माचरणाची आणि सत्याची किंमत ती काय? लोक ते कधीच जाणू शकणार नाहीत आणि लोक जे जाणत नाहीत त्याचे काही एक मूल्य नाही. हिरा जोवर मातीत गाडला गेला आहे, तोवर त्याचे कुणाला आकर्षण असणार? तो जेव्हा बाहेर काढला जातो आणि तो जेव्हा सर्वांचे नेत्र दिपवतो तेव्हाच त्याला मूल्य येते."

भीम यावर म्हणाला,

"आपण आपल्या ंतरात्म्याला पटणार्‍या सत्याचा मार्ग धरून चालणार आहोत की लोक काय म्हणतील याचा विचार करून चालणार आहोत हे आपण प्रथम ठरवायला हवे. जी गोष्ट आपल्या ंतरात्म्याला मान्य नाही, ती शब्दांचे मधुर अवगुंठण घालून लोकांसमोर ठेवून कितीही प्राप्त यियिकार होऊन झाली तरी माझ्या मते त्याची काही एक किंमत नाही. शेवटी सत्य आणि धर्म याची मर्यादा ही आपल्या-आपल्यापुरती घालून घ्यावी लागते आणि त्या मर्यादेतच जीवन जगावे लागते. आपण आपल्या मर्यादा सोडून धर्माचा उपमर्दच करत नाही काय?

"जर आपण व्यवहारधर्माचा विचार करत असू, तर आपल्याला दुर्योधनालाष देण्याचा तरी काय अधिकार आहे? मला वाटतेआ, आपण आता कृष्णाबद्दल सारे काही विसरावे आणि स्वबलावर युद्धाची सिद्धता करावी."

द्रौपदी यावर अग्निप्रलयाप्रमाणे संतप्त होत उद्गारली,

"याचा अर्थ तुम्हाला माझ्या मानभंगाची काहीच पर्वा नाही असा होतो. तुमच्या प्रतिज्ञांचे काय झाले? की एका दुर्बल स्त्रीला तेवढ्यापुरते सांत्वन लाभावे म्हणून त्या केल्या होत्या?"

भीम यावर व्यथित होत म्हणाला,

"द्रौपदी, मला माझ्या प्रतिज्ञांचे एक क्षणही विस्मरण झालेले नाही. देहात प्राण आहे तोवर मी त्या प्रतिज्ञा पार पाडणारच."

"मग आपण आपल्यातच का विवाद घालतो आहोत? आपल्याला विजय हवा आहे आणि त्या अधमांचा विनाश. मी कृष्णाची अवश्य भेट घेईन."

भीम सोडून इतरांच्या मुखावर समाधान पसरले.

 

मागे

पुढे

 
Home Help Desk FAQ Your Comments
 

1998 - Rasik Enterprises.