Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fontsशून्य महाभारत मागे - 1 - पुढे
प्रकरण - ३

द्रौपदी कृष्णाच्या शिबिरासमोर थांबली. द्वारावरील रक्षकांनी द्रौपदीस ओळखून आदबीने अभिवादन केले आणि आत कृष्णाला वृत्त द्यायला गेले.

कृष्ण तेव्हा मंचकावर बसून चिंतन करण्यात निमग्न झाले होते.

"द्रौपदीदेवी आल्या आहेत."

कृष्ण भानावर आले आणि द्रौपदीला आत आणण्याची आज्ञा दिली.

द्रौपदी साध्या वेषात होती पण तरीही ती एखाद्या विद्युल्लतेसारखी तेजस्वी दिसत होती. तिचा करोध जणू तिच्या नेत्रांत साकळला होता. कृष्णाने तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि जणू काही क्षणार्धात त्याला सारे काही कळून चुकले.

"बोल कृष्णे... का आली आहेस तू?"

द्रौपदीने त्याच्याकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहिले. मग ती म्हणाली,

"हे कृष्णा, तू असा का रुष्ट झालास आमच्यावर की ज्यामुळे तू त्या पापी कौरवांची बाजू घ्यावीस? अरे, तूच तर नेहमी आम्हांला धीर दिलास, आमच्यावरील संकटे सुसह्य व्हावीत म्हणून उपदेश केलास. या युद्धाच्या कगारावर तूच आम्हांला आणून ठेवलेस... आणि तूच आमचा शेवटी त्याग केलास? असे कोणते प्रलोभन तुला पडले पुरुषोत्तमा! का तू सुद्धा आपल्या दिल्या वचनांना जागू नयेस..."

"हे कृष्णे, मला तुझा उद्वेग समजतो आहे. मला समजते आहे की तू एवढी का संतप्त झाली आहेस. तुला द्यूतगृहातील तुझ्या अपमानाचा सूड घ्यायचा होता. तुला तुझ्या पाचही पतींवर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा होता. तुझी फक्त माझ्यावर श्रद्धा होती. मी तुझ्याबरोबर असलो तरच तुझ्यावरील अन्यायाचाला घेतला जाईल याची तुला जाण होती,"

"होय कृष्णा, तू अगदी माझ्या मनातीलच बोलतो आहेस. पण तुझे वागणे मात्र त्याच्या अगदी उलट आहे. का पुरुषोत्तमा, का तू असा वागलास?"

कमल उमलावे तसे हास्य कृष्णाच्या मुखावर उमलले.

"हे कृष्णे," कृष्ण मृदुलतम तृणांकुरांसारख्या कोमल शब्दात म्हणाला, ""धर्म फार सूक्ष्म आहे. तुला त्याची जाणीव कशी असेल? मी परमात्मा असूनही अद्यापही धर्म मला नीट समजला आहे असे मला वाटत नाही. मी अन्य प्राणिजगताबद्दल अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की ते अगदी मी दाखवलेल्या मार्गाने जात आहेत. पण मनुष्यप्राण्याचे काही वेगळेच आहे. केवळ मनुष्य आहे म्हणून धर्म सा आहे त्यापेक्षा जास्ति गुंतागुंतीचा बनलेला आहे. केवळ मनुष्य आहे म्हणून धर्म जास्त कुटिल आणि जटिल बनला आहे. कृष्णे, मी धर्माचा निर्माता आहे, म्हणून मलाच धर्म एवढा जटिल-कुटिल का आहे, हे समजावून घ्यायचे आहे."

कृष्णाचेलणे ऐकूण द्रौपदी जास्तच गोंधळात पडली. कृष्ण , आपला सखा , आज एवढा अलिप्त आणि कोड्यात का पडतो आहे हे द्रौपदीला समजेनासे झाले. ती म्हणाली,

"हे कृष्णा, हे सख्या, तुला काय हवे आणि काय नको हे तुलाच जास्त माहीत. मी अज्ञ आहे, सामान्य आहे. मला एवढेच माहीत आहे की तू न्यायाची बाजू सोडून अन्यायाची बाजू घेतली आहेस!"

कृष्ण यावर म्हणाला,

"कृष्णे, मला एका प्रश्नाचे उत्तर देशील?"

"विचार कृष्णा... कोणताही प्रश्न विचार."

"तुला अर्जुनाने पणात जिंकले होते. नियमाप्रमाणे तोच तुझा पती होता. पण युधिष्ठिराने जेव्हा माता कुंतीची आज्ञा म्हणून तुला पाचही बंधूंशी विवाह करावा लागेल असे सांगितले तेव्हा तुला काय वाटले?"

द्रौपदीच्या चेहर्‍यावर कृष्णमेघ दाटी करून आले. तिची मुद्रा सुकल्या पुष्पाप्रमाणे म्लान झाली. तिच्या कंठातून शब्द फुटेनासा झाला.

"बोल कृष्णे, माझ्यापासून काही लपवू नकोस." कृष्ण जरा मोठयाने म्हणाला. त्याची मुद्रा गंभीर झाली होती. त्याच्या चेहर्‍यावरचे तेज उगवत्या सूर्याप्रमाणे वाढले होते.

"कृष्णे, मी या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडून कधीतरी मिळेल याची अनेक वर्षे वाट पाहात होतो. सांग कृष्णे, तुला एकाशी नव्हे तर पाच बंधूंशी विवाह करावा लागणार आहे, हे सांगण्यात आल्यावर तुला काय वाटले?"

द्रौपदीच्या चेहर्‍यावरील आभा, रात्र होताच प्रकाशाने विरून जावे तशी विरली होती. तिच्या नेत्रांत अश्रू दाटी करून आले. ती खाली बसली. मस्तक झुकवले. अश्रूंचा महापूर वाहू लागला.

रात्रीने पहाट होण्याची वाट पाहावी तेवढ्याच आतुरतेने द्रौपदी काही बोलेल याची कृष्ण वाट पाहात होता.

"का हा प्रश्न विचारलास कृष्णा? का?"

कृष्णाने प्रत्युत्तर दिले नाही. तो शांतपणे आपल्या आसनावर बसून राहिला. द्रौपदीलालावे लागेलच हे जणू त्याला माहीतच होते!

"का माझ्या हृदयावर आता ओरखडे काढतो आहेस कृष्णा? का? अरे, तूच तो होतास ना... जो म्हणाला होता... धर्माने हा विवाह मान्य केला आहे म्हणून... अरे, तूच म्हणाला होतास ना की मी... मी पूर्वजन्मात धर्मकार्यात काही चूक केली म्हणून मला हे पाचही पतींशी विवाह मान्य करावे लागतीलच म्हणून, आणि तूच मला हा प्रश्न विचारतो आहेस?"

कृष्ण उद्विगत झाला.

"कृष्णे, तू साधी आहेस आणि मूर्खही! तू अयाजिन आहेस. तुझा जन्म यज्ञातून झाला. तुला कसला आला पूर्वजन्म? तुला जर कधी पूर्वजन्म असताच तर तू विद्रोह केला असतास... प्राणार्पण केले असतेस... पण तू तसे केले नाहीस. कारण माझ्या प्रिय द्रौपदी, तू अयाजिन होतीस. तुला कसले आले पूर्वकार्य? पण केवळ व्यास म्हणाले आणि तू ते मान्य केलेस. तू मान्य केलेस द्रौपदी, कारण तुला पूर्वसंस्कार नव्हते. मला खरे सांग द्रौपदी, तुला तेव्हा नेमके काय वाटले? खरे उत्तर दे... मला सत्य जाणायचे आहे."

द्रौपदी जरा सावरून बसली. तिला असे वाटले जणू ती या अवघ्या जन्मात एकदम बावळट ठरली आहे.

"कृष्णा, खरे सांगू?"

"होय द्रौपदी... मला सत्यच ऐकायचे आहे..."

"मी या पाचही पतींपासून संतुष्ट आहे!"

"तू संतुष्ट आहेस द्रौपदी. तू का संतुष्ट आहेस हे सुद्धा मला माहीत आहे पण कृष्णे, जेव्हा तुला फक्त अर्जुनाशी नव्हेतर सर्व बंधंूशी विवाह करावा लागेल असे युधिष्ठिराने सांगितले तेव्हा तुला काय वाटले?"

द्रौपदी काही क्षण विचार करत राहिली. मग म्हणाली,

"मला तेव्हा काय वाटले? कृष्णा, अरे तेव्हा मला कळत तरी काय होते? मला एवढेच माहीत होते की, जसे मला वागायला सांगितले गेले आहे तसेच मी वागले पाहिजे. हे खरे की मला अर्जुनाचे आकर्षण वाटले होते. पण तेही जेव्हा त्याला प्रथम पाहिले तेव्हा! मुळातच माझ्या पित्याने माझ्यासाठी एवढा अवघड पण का ठेवला होता हेच मला समजले नव्हते."

"मग?" द्रौपदी बोलायची थांबली तेव्हा कृष्णाने विचारले.

"मला विवाह म्हणजे काय, स्त्री-पुरुष संबंध नेमके काय असतात हेच माहीत नव्हते. मी वयात आले आहे आणि आता स्वयंवरात मला योग्य असा पती मी निवडायला हवा असेच मला सांगण्यात आले होते."

"मग कृष्णे, जेव्हा कर्णाने धनुष्य उचलले तेव्हा "मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही.' असे तू का म्हणालीस?" कृष्णाने विचारले.

"मला तसे सांगण्यात आले होते." द्रौपदी मळभावून आलेल्या स्वरातम्हणाली,

"म्हणजे?" कृष्णाने ंमळ आश्चर्याने विचारले.

"मला तसे तातांनी सांगितले होते. या जगात हा पण पूर्ण करू शकतील असे दोनच पुरुष आहेत. पण या दोहोंत एक मला योग्य नाही. तो खालच्या जातीचा आहे. तुला त्याला नाकारावे लागेल असे तात म्हणाले. मी तातांची आज्ञा अव्हेरू शकत नव्हते. त्यांची शी इच्छा होती तिसेच मी वागले."

कृष्णाच्या मुखावर पुन्हा स्मित उमलले.

"म्हणजे, तुला अर्जुनाशी का विवाह करायचा आहे हे सांगण्यात आले नव्हते."

"नाही पुरुषोत्तमा, एक पुरुष कर्ण आहे हे सांगण्यात आले होते, परंतु दुसरा कोण आहे याची मला मुळीच माहिती नव्हती. हे दयाघना, तुम्हीही स्वयंवरास उपस्थित होतात. अर्जुन बराह्मणवेषात होता. त्याची वस्त्रे मलिन होती आणि तो अतिसामान्य दिसत होता. परंतु मला माझ्या तातांनी शी आज्ञा |इ|दिली होती त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात वरमाला घालण्याखेरी मिला गत्यंतरच नव्हते. मी आज्ञाधारक कन्येप्रमाणे वागले. मी माझा धर्म पाळला."

"परंतु द्रौपदी जेव्हा तुला पाच बंधूंशी विवाह करावा लागेल असे युधिष्ठिराने सांगितले तेव्हा तुला काय वाटले?"

"मला काय वाटले ते मला कोणी विचारलेच नाही कृष्णा. धृष्टद्युम्न अशा विवाहाच्या विरोधात होता. तात गोंधळून गेले होते. पण व्यासांनी या विवाहाचे समर्थन केले. असा विवाह धर्मसंगत आहे असे सांगितले. मला धर्मज्ञांच्या इच्छा डावलता येणे कसे शक्य होते?"

कृष्ण आसनावरून उठून उभा राहिला आणि द्रौपदीजवळ आला. तिचा चेहेरा वर उचलला आणि तिच्या कमलनयनांत दाटून आलेले अश्रू उत्तपरयानेटिपले.

"हे सखे, तुझी वेदना मला समजली."

" आणि तरीही कृष्णा तू दुर्योधनाची बाजू घेत आहेस! तू माझ्या अपमानांचा मुळीच विचार करीत नाहीस. तू एवढा निष्ठूर का झाला आहेस?"

कृष्णाच्या चेहर्‍यावर गांभीर्य व्याप्त झाले. तो म्हणाला,

"द्रौपदी, व्यासांनी तुझ्यावर अन्याय केला. पांडवांनी तुझ्यावर अन्याय केला. जो धर्म तुला सांगण्यात आला तो कोठला धर्म? जर युधिष्ठिरासारखा धर्मज्ञ स्वत:च "मातेची आज्ञा' प्रमाण मानून तुझ्याशी विवाहाची इच्छा प्रदर्शित करतो तर त्याच युधिष्ठिराने पतिधर्म विसरून तुला पणावर कसे लावले? नाही सुभगे, धर्म असा नव्हे. जो धर्म व्यक्तीच्या इच्छेचा आणि भावनांचा आदर करीत नाही तो धर्म नव्हे."

द्रौपदीने कृष्णाकडे विस्मित मुद्रेने पाहिले.

"म्हणजे कृष्णा..., हा विवाह धर्मसंगत नाही?"

"नाही द्रौपदी. हा विवाह धर्मसंगत नाही." मग काही वेळ शांत राहिल्यावर कृष्णाने विचारले, ""द्रौपदी, ज्या कर्णाने आधी पण जिंकला, तो तुझा खरा पती असताना त्याला अवमानित करण्यास तुला सांगण्यात आले. तो कर्ण कोण आहे हे तुला माहीत आहे?"

द्रौपदीच्या चेहर्‍यावर फक्त प्रश्नजान्ह होते.

"कर्ण हा पहिला पांडव आहे सुभगे. तो कुंतीचा प्रथम पुत्र आहे."

"नाही कृष्णा..." द्रौपदी गोंधळून गेली होती.

"होय द्रौपदी... कर्ण हा कुंतीपुत्र आहे, सूतपुत्र नव्हे. आणि द्रौपदी, जरी कर्ण सूतपुत्र असता तरी धर्माप्रमाणे तुला त्याचाच पती म्हणून स्वीकार करावा लागला असता. कारण स्वयंवराचा पण घाजेषत करताना हे स्वयंवर फक्त क्षत्रियांसाठीच आहे असे सांगण्यात आले नव्हते. अर्जुन तर बराह्मण म्हणून या स्वयंवरात सामील झाला होता."

"म्हणजे माझा फक्त वापरच करण्यात आला तर!" द्रौपदी क्षणार्धात सारे काही समजून उद्गारली. ""अरे कृष्णा, पण तूही याबद्दल मला काहीच का म्हणाला नाहीस? जर पांडव एवढे अनीतिमान होते तर तू तरी का त्यांची बाजू घेतलीस? का त्यांची बाजू घेऊन कुरु-सभेत संधीचा प्रस्ताव घेऊन गेलास? का कृष्णा तू हा अन्याय उघडया डोळ्यांनी पाहिलास?"

कृष्णाने द्रौपदीचे आकरंदन सहानुभूतीने ऐकून घेतले.

"द्रौपदी तुझा जन्म यज्ञातून झाला. ज्या यज्ञातून तुझा जन्म झाला तो यज्ञच मुळात द्रोणाचार्यांच्या वधासाठी योग्य पुत्रास जन्म देण्यासाठी झाला होता. त्या यज्ञातून तुझाही जन्म झाला. अगदीच अनपजेक्षतपणे पण द्रुपदाने तुझाही स्वीकार केला, कारण त्याला तूही एखाद्या दिव्य शस्त्रासारखीच प्राप्त झाली होतीस. हे मंगले, द्रुपदाने तुझा विवाह अर्जुनाशी व्हावा असा निश्चय केला कारण पांडव आणि कौरवांतील हाडवैर एकदिवस युद्धातलणार याची त्याला खात्री होती. जर तुझा विवाह कर्णाशी होता तर एकटा द्रुपद कौरवांशी लढून द्रोणाचार्यास कसा वधू शकला असता? त्यामुळे तुझा विवाह एखाद्या पांडवाशी होणेच आवश्यक होते. द्रुपदाला बळ हवे होते आणि ते बळ फक्त पांडव देऊ शकत होते. त्यात तुझा विवाह पाचही भावांशी झाला तर ऊनिच उत्तम! त्यामुळे द्रुपदाने त्यासही, या अनैतिक कर्मासही, विरोध केला नाही.

"कारण हे द्रौपदी, मुळात तू त्याच्या रक्ताची कन्या नव्हतीस.

"आपल्या रक्ताच्या कन्येला वेश्यावृत्ती करायला कोण भाग पाडेल? तू त्यांच्या रक्ताची नव्हतीस. हे सखे, म्हणून त्यांनी तुझा विवाह पाच बंधूंशी लावला. आणि स्वत:स धर्मज्ञ म्हणवणारा युधिष्ठिरही तुझ्या मोहात गुरफटल्यामुळे त्यानेही हा अन्याय होऊ दिला.

" आणि हे सखे, मला तुझा विवाह पाच बंधूंशी झाला आहे हे वृत्त मिळाले तेव्हा मी द्वारकेस होतो.

"स्वयंवरानंतर मी लगोलग परतलो होतो. तू कोणा पुरुषोत्तमास वरलेस हे जाणण्याची मला तिळमात्र इच्छा नव्हती. मी तेथे आलो होतो तो एक निमंत्रित म्हणून! मला सत्य घटना कळली तोवर तुझा पाचही बंधूंशी विवाह झालेला होता.

"हे याज्ञसेनी..द्रुपद हाच खरा बुद्धिमान मनुष्य. मनुष्यस्वभावाचे ज्ञान त्याच्याएवढे कोणास असेल? ज्याने द्रोणासारख्या विद्वान बराह्मण मित्रास बालपणी दिलेले वचन टाळले. त्याला ओळखसुद्धा दाखवण्याचे सौजन्य दाखवले नाही. बराह्मण द्रोणास त्याने क्षात्रधर्म स्वीकारण्यास भाग पाडले. एका शांत ज्योतीस दावानलात रूपांतपरत केले. पांडव-कौरव द्रोणाचे शिष्य बनले. पांडवांनी द्रुपदास केवळ द्रोणांची आज्ञा म्हणून पराजित केले. आणि द्रुपदाने या द्रोणाचा सूड घेण्यासाठी केवढा अघोरी यज्ञ आरंभावा? द्रौपदी, धृष्टद्युम्न तर जन्माला आलाच... पण त्या बरोबर तूही जन्माला आलीस. एखाद्या लवलवत्या तेजाळ शस्त्राच्या पात्यासारखी!

"याज्ञसेनी, हे संुदरी, हे कमलनयने, तुझे अश्रू आवर. असा शोक तुला शोभत नाही. हे सागराएवढे अथांग हृदय असलेल्या सहृदये, सारे मानवी जीवनच दंभ आणि सूडाने व्यापलेले असेल तर तुझ्यासारख्या अयाजिन मानवी जीवाचे दुसरे काय होणार आहे बरे?

"ज्यांनी इतिहास घडवला आहे असे वाटते त्या व्यक्ती अनेकदा क्षुद्र असतात. खरे इतिहास घडवणारे अज्ञातच राहतात. त्यांचे कर्तह्रित्व जगाला नेहमीच अज्ञात राहाते. द्रुपदाचे तसेच झाले आहे द्रौपदी. त्याचे कर्तह्रित्व अज्ञात राहिले आहे. तुझ्याही दृष्टीने, पांडवांच्या दृष्टीने आणि कौरवांच्या दृष्टीने. पांडव आणि कौरव परस्पर द्वेषाने ंधळे झाले आहेत. त्यांना हवे आहे विनाशक, एक सर्वसंहारक युद्ध. होईलही हे युद्ध; पण हे सुभगे, कोणास मिळणार आहे ंतिम विजय? कोण भोगणार आहे या पृथ्वीचे राज्य? धर्मराज की दुर्योधन? कोण?"

कृष्ण या प्रश्नांवर शांत झाले. त्यांच्या कमलनयनांतच काय तेवढे तेजाळ प्रश्नजान्ह उरले. द्रौपदी अश्रुपात करत होती. जीवनातील नग्न सत्य जणू तिने प्रथमच पाहिले होते आणि त्या दर्शनाने ती भेदरून गेली होती. स्वत:चे ंत:करण उकलण्याची आवश्यकता तिला कधी भासलीच नव्हती. ती समराट द्रुपदाची कन्या होती. विश्वात सर्वात बलशाली असलेल्या पाच पुरुषांची ती पत्नी होती, कधीकाळी ती समराज्ञीही होती आणि ती पणावरही लावली गेली होती आणि अरण्यवासातील भयंकर वर्षेही तिने भोगली होती. एखाद्या क्षुद्र दासीप्रमाणे वर्षभर सैरंधरीची भूमिका निभावताना ती कामलोलुप कीचकाच्या जवळारी नरेने होरपळून गेली होती. आपण एखाद्या श्रेष्ठ पतिवरतेप्रमाणे आचरण करीत आहोत या ंध विश्वासाने ती आजवर जगत आली होती. पाचही पतींच्या भावनांची कदर करण्यात रात्रीची कृष्णस्वप्ने धवलतेत परिवर्तित करण्याचा कसोशीने यत्न केला होता. पाचही भावांतील सुप्त असूया आणि जवळाराची तीच एकमेव साक्षीदार होती. कारण ती पाचही भावांची शय्यासोबतीण होती! आणि तरीही ती श्रेष्ठ पतिवरता होती. कारण तिने या पाचही बंधूंना एकाच व्यक्तीत रूपांतपरत करून टाकले होते. एकच व्यक्ती नाही हररात्री वेगवेगळा पुरुष भासत? वेगवेगळे वर्तन करत? वेगवेगळ्या मागण्या करत? मग येथे ते पाच बंधू असले म्हणून काय झाले होते बरे? नियतीने तिला या विलक्षण कगारावर आणून ठेवले होते आणि तिने तिचे हे भाग्य स्वीकारले होते.

तिचा चेहरा अविरत अश्रुपाताने भिऊनि गेला होता. तिने आपल्या वस्त्राच्या शेमल्याने स्वत:चा चेहरा पुसला. ंत:करणात जारवेदनेने दाटून आलेला हुंदका गिळण्याचा असमर्थ प्रयत्न करीत तिने कृष्णाकडे अनिवार आशेने पाहिले. जणू तिच्या सार्‍या समस्यांचा ंत करणारा देव-पुरुष तिच्यासमोर बसला होता आणि तो एका तेजाळ कटाक्षाने तिच्या अनंत समस्यांचा ंत करणार होता.

कृष्णाला जणू तिचे हृद्गत कळले. अपार करुणेने त्या दयाघनाचे ंत:करण व्याकुळ झाले. तो आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या अपार अलिप्ततेस क्षणभर तिलांली देऊनि त्याने द्रौपदीस जवळ घेतले आणि घनकाळोखाच्या लाटांप्रमाणे हेलकावे घेणार्‍या केशकलापावरून हात फिरवत तो म्हणाला,

"हे कृष्णे, हे सायंकाळची आभा शी, तिशी काया असलेल्या लाडया भगिनी, अशी व्यथित होऊ नकोस. या विश्वात पराकोटीचा अन्याय झाला अशी तू एकमेव स्त्री नाहीस. गोठलेले अनंत अश्रू आजही माझ्या काळजात एका कोपर्‍यात थिजलेले आहेत. अनंत वेडयापिशा वेदनांना मी अलिप्तपणे आपल्या ंगा-खांद्यावर वागवले आहे. हे लाडके, मुनष्यास जर कधी आपण मनुष्य असण्याचा अर्थ समजला असता तर कदाजात या वेदनांना कधीच विराम मिळाला असता. पण अद्यापही केवढा अज्ञात आहे हा गहन आणि तेवढाच सोपा अर्थ बरे? हे याज्ञसेनी, फक्त थोडी ऊनि साहसी हो. थोडे दूर कर गं भरमांचे पडदे आणि पाहा तू श्रेष्ठच आहेस. कारण तू पचवले आहेस मानवी दंभाचे विष. तू सहन केला आहेस पराकोटीचा अन्याय आणि प्रिय भगिनी, तू आहेस एखाद्या अनिवार जज्ञासेने जीविन जगणार्‍या तृणांकुराएवढीच जीवनोत्सुक!"

कृष्णलायचा थांबला. त्याचा वीणोत्सुक स्वर तरीही जणू चराचराच्या कणाकणांत ओथंबून साचून राहिला आणि स्तब्धपणे वातावरणात स्पंदित होत राहिला. द्रौपदीने मूकपणे आपले अश्रू पुसले. स्वत:तल्या विकराल खाईत ती एवढी खोल उतरली होती की वर्तमानाचा क्षण गाठण्यासाठी तिला अलांघ्य कडा चढावा लागणार होता. कृष्ण समंसिपणे स्तब्ध उभा होता. वाट पाहात होता. द्रौपदी अधोवदनाने बसली होती. जीवन एवढे करूर असते हे तिला माहीतच नव्हते. पुरुषांच्या विश्वात तिने पुरुषांचे द्वेष-मत्सर आपल्या हृदयात रुविले होते, पण स्वत: स्त्री असली तरीही स्त्रीच्या दृष्टीने तिने कधी विगताकडे पाहिलेच नव्हते. परंतु आता व्हायचे ते होऊन गेले होते. तिने कृष्णाकडे मान वर करून पाहिले. भावनांच्या मायावी हातात शब्द येता येत नव्हते. पण धीर वाढला तशी ती म्हणाली,

"हे करुणाकरा, जे घडले ते सत्य आहे. पण माझ्या जीवनाची ती एकच बाजू नव्हती. मी पतींशी नेहमीच प्रामाणिक राहिले. त्यांची सुख-दु:खे मी काळजाच्या कणगीघरात दडवून ठेवली आहेत. परंतु मी समराज्ञी होते. प्रजा माझी देवतेप्रमाणे पूजा बांधत होती. आणि माझी मानखंडना पापी दुर्योधनाने भरसभेत केली. हे देवा, जर तू धावला नसतास तर मला प्राणत्याग करावा लागला असता. अन्यायाने द्यूत खेळून आम्हांला वनवासात पाठवले त्या दुष्टांनी. आताचे होणारे युद्ध अपरिहार्य झाले ते केवळ दुर्योधनामुळेच. आमचा अधिकार आम्हास न देता आम्हांला लुबाडू पाहणार्‍या अधार्मिकांच्या संगतीत हे दयाघना, तू गेलासच कसा?

"हे न्यायी परोपकारी कृष्णा, तू सुद्धा कुरुसभेत स्वत: संधि-प्रस्ताव घेऊन गेला होतास. हे युद्ध टळावे यासाठी तू स्वत:चीही मानखंडना सहन केलीस. त्या घमेंडी दुर्योधनाने तुलासुद्धा बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. पाच गावेच काय पण सुईच्या अगरावर बसेल एवढीही मीनि देणार नाही अशी दर्पोक्ती त्याने केली. आणि त्याचा तुला जरा देखील करोध येत नाही की अपमान वाटत नाही? खुशाल त्याच्या बाजूस जाऊन मिळाला आहेस? आमचा असा त्याग करताना तुला थोडेही वाईट वाटले नाही?

"हे पुरुषोत्तमा, हे बघ, माझी व्यथा उकरून अखेर साध्य काय होणार आहे? आम्ही बेवारस झालो आहोत. आम्हांला तुझ्याखेरी कोणाचा आधारि नाही. आम्ही वारंवार अपमानित झालो आहोत. दु:ख आणि वेदनांच्या अपार राशी आम्ही पचवल्या आहेत ही वस्तुस्थिती तर बदलत नाही? हे दयाघना, किमान तू एक गोष्ट तर निश्चयाने करू शकतोस आणि ती म्हणजे आम्हांला आमचे राज्य मिळवून दे. आम्हांला युद्ध नको. नरसंहार नको. आता तू कौरवांच्या बाजूने आहेस आणि कौरव तुझे ऐकतील."

कृष्ण मानवाच्या आवर्तनी स्वभावाकडे दिग्मूढ होऊन पाहात राहिला.

पण क्षणभरातच, हेही एक अपजेक्षत आहे, ते लक्षात येऊन म्हणाला,

"हे कृष्णे, युद्ध करणे वा टाळणे माझ्या हाती नाही. मी माझी संपूर्ण सेना पांडवांच्या हवाली केली आहे आणि मी कौरवांच्या हवाली आहे. मी स्वत: युद्धात भाग घेणार नाही हेही प्रसिद्धच आहे. कौरव आणि पांडव उभयता माझे नातेवाईक आहेत. मी कोणताही पक्षपात करू शकत नाही."

"पण हे कृष्णा, न्यायाची बाजू घेणे यात कोणता पक्षपात आला?"

"हे कृष्णे, मुळातच न्याय आणि अन्याय यातील सीमारेषा संदिग्ध आहे. मी पांडवाची बाजू संपूर्णपणे घेतली म्हणून पांडव न्यायी ठरत नाहीत. खरे तर न्यायाची बाजू कोणाचीही कधीही असू शकत नाही. हे सुभगे, ही पृथ्वी परमात्मतत्त्वाने ओथंबून ओसंडते आहे. या भूमीवर मानवापेक्षा प्राचीन आणि मानवापेक्षा संख्येने अधिक असणारे प्राणी जर मालकी सांगत नाहीत तर मानवासारख्या क्षुद्र भावनाशील प्राण्यास हा अधिकार कोणी दिला? हे सुलक्षणे, यच्चयावत बरह्मांडातील एका कणावरही कोणाचीही सत्ता नाही तरीही त्यावर सत्ता सांगत न्याय-अन्यायाच्या रीती-भाती आपण ठरविण्याचा प्रयत्न करतो यापेक्षा मोठा विनोद कोणता असेल हे सांग बरे मला? तेव्हा तुमची बाजू न्यायाची आणि कौरवांची अन्यायाची असे काही तुला म्हणता येणार नाही. कारण हा झगडाच-जो कोणाचेही असूच शकत नाही अशा-क्षुद्र कारणांकपरता आहे. परंतु, ही मानवाची सवयच आहे त्याला तुम्ही पांडव किंवा हे कौरव तरी काय करणार बरे? आणि जर अखेर मानवाच्याच नियमाने जायचे तर मग युद्धास पर्याय तरी काय आहे? जे ठरायचे ते रणभूमीवरच ठरेल. जर पांडव न्यायी आहेत तर मी त्यांच्याबरोबर आहे की नाही याने कोणता फरक पडणार आहे? कारण मी तर हाती शस्त्र घेणार नाही. मी कोणाचा वध करणार नाही. माझ्यामुळे कोणाच्याही जयापराजयात काही फरक पडणार नाही ही तर वस्तुस्थिती आहे! हे सुभगे, तुझे पती बलशाली आहेत. शस्त्रास्त्रविद्या पारंगत आहेत, तेव्हा तुला चिंता तरी कसली?"

"म्हणजे, तू आम्हास कसलीही मदत करणार नाहीस तर!"

"हे द्रौपदी, मी आता कौरव आहे असे समज. मी तुला मदत तरी काय करणार! आणि ती अपेक्षा तू ठेवूही नकोस. पांडवांनी तरी तुला माझ्याकडे का बरे पाठवावे? स्वत: अर्जुन काय माझ्याकडे येऊ शकत नव्हता? किंवा स्वत: धर्मराज तरी? पण तू आलीस. कारण हे लाडके, तू आता राजकारणात पडली आहेस. तू नेहमीच पांडवांचे शस्त्र होतीस. आजही आहेस. पण, त्यापेक्षा तू त्यांचे ंत:करण चेतवशील तर कदाजात ते त्यांच्यात आहे त्यापेक्षा अधिक पराकरम गाजवू शकतील!"

द्रौपदीने असहायपणे कृष्णाकडे अखेरचे पाहिले.

अखेर ती मानी स्त्री होती. कोठपर्यंत झुकायचे ते तिला चांगले माहीत होते. आणि ती पुरेशी झुकली होती. आता आपल्या हाती मातीखेरीज काही लागणार नाही याची जाणीव तिला झाली. ती म्हणाली,

"रि तसेच होणार असेल तर त्याला इला तिरी काय आहे? माझे पती पराकरमी आहेत. ते समरांगणावर निश्चयाने पराकरम गावितील आणि यशश्री प्राप्त करतील. हे कृष्णा, तो तुझा पराभव असेल याच्याच मला अधिक यातना होत आहेत."

"हरकत नाही द्रौपदी. मलाही तोच तर अनुभव घ्यायचा आहे. जय किंवा पराजय, जीवन किंवा मृत्यू, लाभ किंवा तोटा, कीर्ती किंवा अपकीर्ती याने जो संतुष्ट किंवा असंतुष्ट होतो त्यासारखा अज्ञानी जीव या विश्वात असू शकत नाही. अपकीर्ती किंवा पराजयाने मला असा कोणता फरक पडणार आहे बरे? मी अलिप्तपणे या खेळाकडे पाहतो आहे. या खेळात मी आहेही आणि नाहीही. खरे तर जे काही ठरणार आहे ते तुम्हा कौरव-पांडवांत ठरणार आहे. माझा मुळी त्याच्याशी संबंधच काय!

" आणि द्रौपदी, जर पराजयच झाला तर पराजित होणारे पहिले कौरवच नसतील. माझी बाजू न्यायाची असूनही जरा संधाने मला पराजित केलेच नव्हते की काय? म्हणून मी काय अपकीर्त झालो? मी नाही द्वारका वसवली? मग पांडव का नाही मग स्वत:चे राज्य निर्मऊ शकत? जे गमावले त्याची खंत करीत सूडाने प्रज्वलित राहणारे मानव कधीही श्रेष्ठ श्रेय प्राप्त करू शकत नाहीत, हे काय पाडवांना, माझा एवढा सन्मान करूनही कळत नाही? जर अन्यायच घडला तर अन्याय होणारे पांडवच पहिले नसतील. काय यापूर्वी कधी कोणावर अन्यायच झालेला नाही? म्हणून काय प्रत्येकाने शस्त्र उभारून एकमेकांवर तुटून पडायचे? आणि त्यातही जो जिंकतो तो काय न्यायीच असतो? आणि मृत्यू-हे याज्ञसेनी, जन्माला जो आला त्याला मृत्यू अटळ आहे. जर या युद्धात माझा मृत्यू झाला तर कदाजात मी प्रसिद्ध होईन; पण जर हाच मृत्यू अन्य कोठेतरी एखाद्या य:कश्चित मनुष्याच्या हातून झाला तर? अपघाताने झाला तर? वृद्धापकाळाने मी मेलो तर? नाही, कृष्णे, जे अटळच आहे त्याची चिंता क्षुद्र मुनष्य करतात आणि जे टाळता येते ते टाळण्यासाठी मात्र कोणीच प्रयत्न करीत नाही. पांडवांनी युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केला पण कौरवांना हे खरे, आता युद्धच हवे आहे. कारण हे याज्ञसेनी, संपूर्ण विनाश एकवेळ परवडला, पण चिंतित, भयभीत जीवन नको असे कोणा मनुष्यप्राण्याला आज वाटत नाही बरे? कौरवांनाही तीच भीती वाटते. जोवर पांडव आहेत तोवर कौरव चिंतेतून मुक्त नाहीत आणि जोवर कौरव आहेत तोवर पांडवही चिंतेतून मुक्त नाहीत. त्यामुळे आता भूतलावरहोंपैकी कोणीतरी एकच राहणार हे निश्चित आहे. यातून केवढाही भीषण विनाश घडू दे! सारा समा उद्धवस्त होऊ दे! संस्कृती नष्ट होऊ दे! पण किमान जो कोणी उरेल तो स्वत:ला यशस्वी नाही तर स्वत:स धर्मज्ञ तर म्हणवून घेईल?

"हे सुभगे, युद्ध अटळ आहे हे तू समजून चल. मी तुमच्या बाजूने असतो तर युद्ध अधिकच निश्चित होते. विनाश निश्चित होता. आताही असे समज की विनाश निश्चित आहे.

"मग जर विनाशच होणार आहे तर उरणार तरी कोण शेवटी? कौरव किंवा पांडव. परंतु हे याज्ञसेनी, जर राज्य करायला प्रजाच उरली नाही तर? फक्त वृद्ध स्त्रिया आणि बालकेच या पृथ्वीतलावर उरली तर? कोणत्या श्रेयाच्या प्राप्तीची महती तुम्ही गाल? किंवा कौरव गातील?

"हे प्रिय भगिनी, प्रजा असेल तर राज्य करण्यात मौ आहे, काही अर्थि आहे. प्रजेएशवाय राज्य कधी अस्तित्वात येऊ तरी शकते काय? आणि समजा कौरव न्यायी तर कौरव जिंकणार, पांडव न्यायी तर पांडव जिंकणार हे मान्य केले तरी सुलक्षणे, सांग मला एक, या युद्धात जे सैनिक मरणार आहेत, त्यांच्या आत्म्यांवर, प्राणांवर तुझा किंवा कौरवांचा काय अधिकार आहे बरे?

"कारण या युध्दात जे सामान्य सैनिक सामील आहेत ते काही आत्म्याशी चर्चा करून नव्हे की, कोण प्रामाणिक, कोण न्यायी आणि कोण अप्रमाणिक आणि कोण अन्यायी आहेत ते त्यांनी ठरवावे! ते तर पोटार्थी सैनिक. फक्त पोट भरले की संपले. पण हे सुभगे, ते अखेर तुझ्यासारखेच हाडा-मांसाचे मुनष्य-जीव आहेत. हे खरे, की कदाजात त्यांना तुझ्याएवढी बुद्धी नसेल. ते भीम-अर्जुनाएवढे पराकरमी नसतील. पण शेवटी भीमार्जुनही अशाच सैनिकांच्या जीवांवर प्रबळ होतात. पण जेवढा भीमात प्राण आहे, जेवढा अर्जुनात प्राण आहे, तेवढाच प्राण काय सामान्य सैनिकात नाही? त्यांच्या निष्ठा काही नाण्यांच्या मोबदल्यात खरीदल्या म्हणजे त्यांचे प्राण काय तुमचे झाले?

"नाही द्रौपदी. हा अन्याय शतकानुशतके झाला आहे. पुढेही होईल. मनुष्य निर्बउद्ध असला म्हणून काय त्याच्या प्राणांचे मूल्य संपले? हे द्रौपदी, त्यांच्या प्राणांचे तेवढेच मूल्य आहे जेवढे तुझे आहे, माझे आहे. हे आकरंदणार्‍या हृदया, का आकरंदन करते आहेस बरे? का तुझ्या नेत्रांतून सतत अश्रुधार वाहते आहे बरे?

"रडू नकोस. हे पांचाली आकरंदू नकोस."

द्रौपदी अनंत काळ आपल्या हृदयावर साकळून आलेल्या शोकाच्या समुद्रास दूर हटवण्याचा प्रत्यन करीत वर पाहात अश्रुथिजल्या स्वरात म्हणाली,

"ठीक आहे कृष्णा, जसे तुझ्या मनात असेल तसे होईल. मी अज्ञ आहे. मला काही केल्या काही कळत नाही. सारे जीवनच शेणामातीचे झाल्यासारखे वाटते आहे.

"हे करुणाकरा, मी परत जाते आता. माझे पती माझी वाट पाहात असतील."

द्रौपदी उठून उभी राहिली. कृष्णास नमरपणे प्रणिपात केला आणि शिबिरातून बाहेर पडली.

सर्वज्ञ श्रीकृष्णाच्या शांत मुखावरील वेदना अधिकच गहिरी झाली.

 

मागे

पुढे

 
Home Help Desk FAQ Your Comments
 

1998 - Rasik Enterprises.