Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fontsशून्य महाभारत मागे - 1 - पुढे
प्रकरण - ४

कृष्ण भीष्माचार्यांच्या शिबिरात आला तेव्हा स्वत: तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसणारे भीष्माचार्य श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. त्यांनी श्रीकृष्णाची पाद्यपूजा करून त्यास उच्चासनावर बसविले व स्वत: हात जोडून साध्या आसनावर बसले.

"हे देवकीनंदना, तुझे क्षेम तर आहे ना?"

"होय कुरुकुलश्रेष्ठा. माझे क्षेम आहे. परंतु आपण आज प्रसन्न्दिसत नाही."

प्रदीर्घ सुस्कारा सोडून भीष्म म्हणाले,

"हे कृष्णा, तू आमच्या बाजूला येऊन मिळाला आहेस याबद्दल आनंद व्यक्त करावा की खेद याबद्दल माझ्या मनाचा काही केल्या निश्चय होत नाही."

"का बरे असे?" कृष्णाने कोमल स्वरात विचारले.

"मी कौरव असलो, मला दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल हे खरे असले तरी पांडवांबद्दल माझ्या मनात किती अपार ममता आहे हे सारे जाणतात. यासाठी मी दुर्योधनाची बालबुद्धी, दुरुत्तरेही ऐकून घेत असतो. तू पांडवांचा नेहमीच सखा राहिला आहेस. असे असताना पापी दुर्योधनाच्या पक्षास, हे कृष्णा, तूही येऊन मिळालास याचे मला नवल वाटते आहे."

कृष्णाच्या श्यामल चेहर्‍यावर मंद हास्य पसरले. जणू काही महन्मंगल प्रभेने प्राचीवर आपले शुभचिन्ह अंकित केले असावे असे तेज कृष्णाच्या चेहर्‍यावर झळकले.

"हे कुरुकुलश्रेष्ठा, ज्याच्या ज्ञानाला अनंत आकाशही सीमा घालू शकत नाही अशा श्रेष्ठ तापसा आणि पराकरमात प्रत्यक्ष परशुरामही बरोबरी करू शकत नाही अशा श्रेष्ठ महावीरा, तुमच्या मनात संभरम निर्माण व्हावा हे खचितच आश्चर्यदायी आहे. असो.

"हे भीष्मा, आपणास दुर्योधनाच्याच बाजूने युद्ध करावे लागेल असे आपण आगरहाने म्हणत आहात. आपल्या अंत:करणात पांडवांबद्दल अपार ममता आहे हे सर्व आर्यावर्तात विख्यात आहे. असे असताना आणि आपल्यावर कुरूंचे कसलेही बंधन नसताना आपण दुर्योधनाचीच बाजू घ्यावी लागेल असे का म्हणत आहात? खरे तर आपण अवश्य पांडवांना जाऊन मिळायला हवे. पांडवांनाही यामुळे केवढा आधार मिळेल."

श्रीकृष्णाच्या तोंडून अनपजेक्षत वाय ऐकायला मिळाल्याने क्षणभर स्तंभित झालेले भीष्माचार्य स्वत:स सावरून म्हणाले,

"हे कृष्णा, प्रत्येक पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुला माहीत नाही असे दिसते. काहीही झाले तरी धृतराष्टाचे मीठ खाल्ले आहे मी. त्याच्याशी द्रोह करून पांडवांच्या बाजूने जाऊन युद्ध करू शकत नाही हे उघड आहे. पण जनार्दना, तुला तर माझ्यासारखे कसले बंधन नव्हते. का रे तू पांडवांचा त्याग केलास?"

श्रीकृष्णाने आर्द्र दृष्टीने त्या वयोवृद्ध तपस्व्याकडे पाहिले आणि तो मौन राहिला.

"हे कृष्णिकुलवंतस, मला पांडवाची काळजी वाटते. या युद्धात सर्वसंहार होणार हे निश्चितच आहे. पांडवांचा पराजय झाला तर मला यातना होतील."

श्रीकृष्ण तरीही मौन राहिला.

जरा शाने श्रीकृष्णाने विचारले,

"हे भीष्मा, युद्धात तुम्ही पांडवांना अभयदान दिले आहे, हे खरे काय?"

"होय. मी एकाही पांडवास रणात वधणार नाही पण आजच दशसहस्र पांडवसेना वधेन असे मी दुर्योधनास सांगितले आहे."

"असे का भीष्माचार्य?"

"असे का म्हणजे? पाचही पांडव मला प्रिय आहेत. धर्म, क्षात्रतेज आणि त्यांची विनम्रता विश्वप्रसिद्ध आहे. त्यांच्यावर पातकी दुर्योधनाने अनंत अत्याचार केले आहेत. पांडवांचा राज्याधिकार त्याने हिरावून घेतला आहे. मी कसा पांडवांना वधू?"

श्रीकृष्णाच्या श्यामल मुखावरील आभा अधिकच दीप्तिमान झाली.

"मग तुम्ही पांडवांच्या पक्षालाच जाऊन का मिळत नाही? तेच अधिक धर्मसंगत आणि न्याय्य ठरणार नाही का? तुमची पांडवांवर प्रीती आहे ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्यांना रणात वधणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग कौरवांच्या बाजूने युद्ध करण्यात लाभ तो कोणता? तुम्ही अर्थाचे दास आहात म्हणून कौरवांच्याच बाजूने राहावे लागेल असे म्हणता ते पूर्ण खरे नाही हे तुम्हासही माहीत आहे. तुम्ही स्वत: ज्येष्ठ कौरव आहात. या राज्याचे विभानि होऊ नये म्हणूनच तुम्ही आजन्म बरह्मचर्यवरताची शपथ घेतलीत हेही खरे आहे.

"मग तुम्हीच या राज्याचे कौरव-पांडवांत विभानि व्हावे असेही म्हणत आहात. तुमची पांडवांवर प्रीती आहे आणि त्या प्रीतीस्तव युद्धात त्यांचा वध करणार नाही असेही म्हणता आहात. तुम्ही अर्थाचे दास आहात आणि म्हणून कौरवांच्या बाजूने युद्ध करावे लागेल असे आताच तुम्ही मला सांगितलेत.

"हे महावीरा, आपले भाषण असंबद्ध आहे असे आपणास वाटत नाही? या राज्यावर पांडवांचाच अधिकार आहे असे आपणास मनोमन वाटते. मग हे महाश्रेष्ठ, आपण मीठ खाल्लेत कोणाचे? पांडवांचेच ना? मग आपण अवश्य पांडवांकडे जायला हवे. त्यांच्या पक्षास मिळून सर्व सामर्थ्यानिशी तुम्हाला जे दुष्ट वाटतात त्यांच्याशी युद्ध करायला हवे. हाच धर्म आहे कुरुश्रेष्ठ!"

"कृष्णा, तूही असंबद्ध बोलतो आहेस असे नाही तुला वाटत? तू आता कौरवांचा पक्ष घेतला आहेस आणि माझ्यासारख्या वीराला शत्रुपक्षास जाऊन मिळायला सांगतो आहेस, काय हा धर्म आहे?"

"होय. हाच धर्म आहे." कृष्ण पूर्ववत शांत स्वरात म्हणाला, ""दिग्भरमित योद्धे कधीही विजयश्री खेचून आणत नाहीत. युद्ध सुरू व्हायच्या आधीच जे शत्रुपक्षाची भलावण करतात ते योद्धे मित्र नव्हे तर शत्रू आहेत असेच कोणीही समराटाने धरून चालायला हवे. हीच राजनीती आहे. हे कुरुकुलभूषणा आणि ती आपणास माहीत नाही असे मी तरी कसे म्हणू? आणि त्यात दुर्योधनाने तुम्हाला प्रथम सेनापती बनवण्याचा निर्धार केला आहे. मग या युद्धात कौरवांचा विजय कसा होईल?"

भीष्माचार्य काही क्षण अधोवदनाने मौन राहिले.

"हे कृष्णा, तू नारायण आहेस. आपल्या दिव्य दृष्टीने तू सारे काही जाणतोस. मग मला प्रश्न का विचारतो आहेस?"

कृष्णाच्या मुखावर कमलदले उमलावीत तसे प्रशांत हास्य उमलले.

"मला तुमच्याकडूनच ऐकायचे आहे." तो म्हणाला.

"दुर्योधन किंवा पांडव... हे खरे कारण नव्हेच. हे दयाघना, मी दुर्योधनाचा पक्ष घेतला तो त्याचे मीठ खातो म्हणून नाही हे सुद्धा सत्य आहे. मी पांडवांशी युद्ध करणार नाही ते सुद्धा खरे आहे. हे परमेश्वरा... हे युद्ध माझ्या नियतीशीअहे."

"कोणती नियती?"

"मी सांगायलाच हवे? हे नारायणा, तुला सर्व विदित आहेच."

"होय... तुम्हीच सांगायला हवे."

"पण का?"

"हे नरश्रेष्ठा, या भूतलावर प्रत्येक णि आपल्या नियतीशीच युद्ध करीत असतो. जन्मो-जन्मीची इष्ट-अनिष्ट कर्मे आपली नियती अधाजेलखित करीत असते. त्यातून कोणाचीही सुटका नाही. माझीसुद्धा नाही. तुमची नियती मला माहीत आहे. पण तुम्ही तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहात आहात हे जाणून घ्यायचे आहे मला."

आपल्या शोकात साकळून गेलेले भीष्माचार्य नेत्र मिटून आपल्याशीच काही क्षण द्वंद्व करीत राहिले.

"हे मधुसूदना, मला ंबेचा शाप आहे. ती या जन्मी शिखंडीच्या रूपाने द्रुपदाघरी अवतरली आहे. शिखंडी माझा मृत्यू आहे. त्याच्याकरवी माझा वध व्हावा ही माझी नियती आहे आणि द्रुपद पांडवांचा श्वशुर असल्यानेशिखंडी या युद्धात पांडवांच्याच बाजूने युद्ध करणार याबद्दल माझ्या मनात संशय नाही.

"मग मला काही झाले तरी कौरवांच्याच बाजूने लढावे लागेल. तरच शिखंडी मला रणात वधू शकेल. युद्धभूमीवर मृत्यू आला तर मला स्वर्ग मिळेल. एरवी शिखंडी मला वधू शकणार नाही, हे तर प्रसिद्ध आहे. हे युद्ध कौरव-पांडवांसाठी नाही, माझ्या वधासाठी आहे. आणि मी ंबेवर अन्याय केला याचा सल काही केल्या माझ्या ंत:करणातून जात नाही.

"याचसाठी मी कौरवांच्या बाजूने युद्ध करणार आहे. पांडवांना मी वधावे हा काही माझ्या या युद्धाचा हेतू नाही. आता माझे पुष्कळ आयुष्य झाले आहे आणि जगण्याची विजजगीषा कधीच मरून गेली आहे."

श्रीकृष्णाच्या चेहर्‍यावरील हास्य अधिकच रुंदावले. तो वीणेने रुणझुणावे तशा ंत:करणास वेड लावणार्‍या स्वरात म्हणाला,

"कुरुपुंगवा, मला तुमचे उत्तर मिळाले. पण तुम्ही अद्यापही दिग्मूढ आहात हे सत्य आपण जाणून घ्यायला हवे. तुम्ही हे युद्ध स्वत:च्या नियतीसाठी करीत आहात असे तुम्ही म्हणता. तुमची नियती खरीही आहे. पण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही आहे. हे सनातन सत्य आहे. त्याला तुम्हीही अपवाद नाही. मग मृत्यू कोणाच्या हस्ते येतो की आपसूक यालाही काही महत्त्व नाही. "मृत्यू' हा फक्त "मृत्यू' आहे, जो जीवनाचा प्रकाशमान मार्ग बंद करून ंधारकडयावरून मनुष्यास फेकून देतो. मृत्यूनंतर स्वर्ग मिळणार की नरक याची चिंता जविंत असताना केल्याने फार मोठे पुण्य लाभणार आहे, असा भरम कोणी करून घेऊनये.

"समजा हे युद्ध घडणारच नसते, तर शिखंडीने आपली प्रतिज्ञा कोणत्या तरी मार्गाने पूर्ण केली असतीच ना! तुमचा नियत मृत्यू झाला असताच ना! पण त्यासाठी पांडवांना वधायचे नाही किंवा कौरवांचीही बाजू सोडायची नाही, असा अट्टागरह का? पांडवांना वधणार नाही पण पांडवांची दशसहस्र सेना आजच वधेन असे विधान तरी मग तुम्ही का केलेत? केवळ पांडव तुमचे आप्त आणि इष्ट आहेत म्हणून? त्या निष्पाप-पोटार्थीसाठी युद्ध करणार्‍या सैनिकांशी तरी मग तुमचे काय वैर आहे? आणि तुम्हाला वाटते, दुर्योधनाची बाजू अन्याय्य आहे. ती न्याय्य आहे की अन्याय्य असा निरपेक्ष निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. कारण तुम्ही भावनाशील पुरुष आहात. भावनाशील पुरुष निरपेक्ष न्याय-अन्याय ठरवू शकणार नाही हे उघड आहे. पण प्रत्येक पुरुष आपल्या सद-सद्विवेक बुद्धीच्या जोरावर न्याय आणि अन्यायाच्या चर्चा करतो. आणि ंबेशी नेमका न्याय झाला की अन्याय हे तरीही तुम्ही ठरवू शकत नाही, पण तिच्या हातून, या जन्मी वध होणार हे मात्र तुम्ही निश्चयाने समजून चालला आहात. या भूमीचे नेमके शासक कौरव असावेत की पांडव याबद्दलही तुमचा निर्णय निश्चयाने झालेला नाही, अन्यथा पुरुष अर्थाचा दास असतो ही लोकोक्ती तुम्ही मला सांगितली नसती.

" आणि कौरवांच्या बाजूने लढेन परंतु पांडवांना युद्धात ठार मारणार नाही असे विधानही तुम्ही केले नसते.

"हे नरपुंगवा, मग तुम्ही युद्धात भागच का घ्यावा? बलराम ज्याप्रमाणे कौरव-पांडवांना समान मानून युद्धात भाग न घेता तीर्थयात्रेस निघून गेला त्याप्रमाणे तुम्हीही का शस्त्रसंन्यास घेत नाही? तुमच्यामुळे कौरवांचा विजय होणार नाही की तुम्ही जोवर सेनापती राहाणार आहात तोवर पांडवांचाही विजय होणार नाही. मग ज्यामुळे कोणाचाही जय-पराजय अधोरएखित होणार नाही, अशा युद्धाचे सेनापत्य आपण का स्वीकारीत आहात? केवळ शिखंडीला तुम्हाला युद्धात ठार मारण्याची संधी मिळावी म्हणून? पण तरीही शिखंडीसारखी कापुरुष तुम्हाला युद्धात मारू शकत नाही... त्यासाठी तुम्हाला शस्त्र खाली ठेवण्याचाच पर्याय निवडावा लागेल, हे काय तुम्हाला माहीत नाही?

" आणि हे नरश्रेष्ठा, पांडवांचे जेवढे हित तुम्ही पाहता तेवढेच जर पांडव तुमचेही हित पाहात असतील तर सा तुम्ही पांडिवांना युद्धात न वधण्याचा निर्णय घेतला आहे तसा पांडवांनी घेतला आहे का? जर तुम्ही एकमेकांचे आप्त आहात तर मग ही निष्ठा एकेरी कशी? ती दुहेरी का नाही? आणि खरे तर युद्धात कोणी आप्त नसतो की इष्ट नसतो. समोर फक्त शत्रू असतो आणि युद्ध फक्त शत्रूंशी होऊ शकते, आप्तांशी नाही.

" आणि आपण सारे मेलेलेच आहोत. आज आपण जिवंत दिसतो आहोत ते काळाच्या अनंत धाग्यावर आपण थोडे अलीकडे आहोत म्हणून. क्षणाक्षणाने मृत्यू आपल्या दिशेने चालत येतोच आहे. हे पुन: पुन्हा जन्मणे आणि मरणे अहोरात्रीच्या नियत कृत्यासारखे आहे.

"पण मग त्यासाठी असा सर्वविनाशी संकल्प का करावा?

"नियती आपण घडवतो. आपल्या कर्मानी घडवतो. जेव्हा आपली विवेक बुद्धी स्थिर असते, शाश्वत असते तेव्हा नियतीसुद्धा तेवढीच उज्ज्वल धवल असते. जेव्हा आपली कर्मे आपला विवेक सोडून होतात तेव्हा नियतीही तेवढीच करूर फळे आपल्या ओटीत टाकते.

"नियती अजरा मर नाही. ती नियती मनुष्य घडवतो. नियती मनुष्य घडवत नाही..."

"हे महाबाहो, युद्धाने आपण कोणती नियती घडवत आहोत याची थोडीतरी कल्पना कधी करून पाहिली आहे काय? युद्धात जय मिळाला किंवा पराजय जरी झाला, तो कर्मफल लाभाची आशा ठेवल्याने लाभला की कर्मफल अपेक्षा न ठेवता लाभला यामुळे युद्धाचा परिणामलणार आहे काय?

"ज्या शाश्वत धर्माची आपण कामना करतो, जो धर्म हा या धपरत्रीवरील सर्व सजीवसृष्टीस आपल्या हातात-हात घालून चालायला सांगून सर्व मंगलदायी मोक्षाची आपण कामना करतो तो धर्म या जया-पराजयाने मलिन होईल हे आपणास का वाटत नाही?

"प्रत्येक कर्मास फल अटळपणे जाकटलेले असते. मग त्याची कामना असो की नसो, धुळीतून चाललो की धुळीवर पदजान्हे आपसूक बनतात. युद्ध केले की निसंहार होणार, मग स्वत: मेलो की अन्य मेलेत याची अपेक्षा असो किंवा नसो.

"हे ज्ञानवंता, तुझी नियती तू स्वत: घडवली आहेस आणि आता युद्ध हे कर्म आहे. त्यामध्ये तुझा वध होणे ही तुझी नियती आहे, पण हा वध युद्धातच व्हावा ही काही तुझी नियती नाही. म्हणजेच युद्धाचे हे कर्म करावयाचे की टाळायचे हे सर्वस्वी तुझ्या विवेकावर अवलंबून आहे. कौरवांचा द्वेष वाटतो, पांडवांबद्दल प्रीती वाटते, जरा या भावनांच्याही पार जाण्याचा प्रयत्न करून पाहा. कौरव व पांडव आपापल्या व्यतिगत पातळीवर आपापली कर्मे करीत आहेत. पण तुम्ही ज्ञानी आहात. कर्माची निवड डोळसपणाने करणे हे ज्ञानवंताचे इष्ट कर्तव्य नाही काय?

"परंतु हे महाबाहो, तुम्ही पूर्वी विजात्रवीर्यांच्या पत्नीस अपत्यदान देण्याची सत्यवर्तीदेवींची आज्ञा अव्हेरली होती. सत्यवतीदेवींनी तुम्हाला राज्यासनावर बसून कुरुकुलाची वंशवृद्धी करण्याविषयी सांगूनही आपण आपल्या दृढप्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहायचे ठरवून मातेचीच समकालीन धर्मसंगत आज्ञा पाळली नाही. जेव्हा इष्टानिष्टतेच्या निर्णयाचा क्षण येतो तेव्हा विगत काळात विशिष्ट परिस्थितीत केलेली प्रतिज्ञा याही विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात कायम ठेवायची की नूतन परिस्थिती पाहून विवेकाने निर्णय घ्यायचा याचे स्वातंत्र्य मानवास आहे, असे असूनही कुरुवंशाचे वर्धन अन्य बरह्मर्षीकरवी करावे, असा सल्ला आपण सत्यवतीदेवीस दिला आणि आपला प्रतिज्ञेचा निर्णय कायम ठेवला. कदाजात आपण प्रतिज्ञाभंगाचा दोष घेऊन का होईना पण धर्माज्ञा पाळली असती तर इतिहास काही वेगळा घडला असता. असो.

"नियती स्वत: मनुष्य घडवतो ती अशी. प्रत्येक कर्मास अटळपणे फळ जाकटलेले असते ते असे. ंबेच्या संदर्भातही तुम्ही अन्याय केला हे सांगणे आवश्यक आहे. विजात्रवीर्य युवा व विवाहयोग्य असतानाही काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरास तुम्ही विजात्रवीर्यास समवेत न नेता स्वत: स्वयंवरास गेलात. आपण या तीनही कन्यांचे अपहरण करताना आर्यविवाहांचे आठ प्रकार सभेस सांगितले. त्यानुसार स्वयंवरास आलेल्या सर्व क्षत्रियांचा व लोकांचा पराभव करून हरण करून आणलेल्या कन्येबरोबर विवाह करणे हे क्षत्रियास सर्वश्रेष्ठ आहे, असे आपण स्वत:च म्हणालात. म्हणजे ंबा, ंबिका आणि ंबालिका या तीनही, तुम्ही सर्व क्षत्रियांचा पराजय करून त्यांचे हरण केले असल्याने, विधिवत तुमच्या ंगना होत्या. परंतु तुम्ही त्यांना तुमच्या धाकटया भावास अर्पण केले. परंतु ंबेने शाल्वास मनाने वरले होते! हे खरे की ते तुम्हास माहीत नव्हते व जेव्हा माहीत झाले तेव्हा तुम्ही तिला शाल्वाकडे परतही पाठवले,पण शाल्वाने तिचे पाणिगरहण केले नाही. शाल्वाने तिचे पाणिगरहण करावे यासाठी तुम्हीही कोणता प्रयत्न केला नाही. उलट तुम्ही आपले गुरू परशुरामांशी युद्धाचा पवित्रा घेतलात. म्हणजे तुम्ही गुरूची आज्ञाही पाळली नाहीत. ंबेला शेवटी अग्निकाष्ठे भक्षण करावी लागली.

"हे नीतिशास्त्रविदा, तुमच्या ज्ञानाबद्दल आणि पराकरमाबद्दल आकाशातील देवताही गुणगान गातात. परंतु आपल्या भरात्यासाठी धर्माज्ञा अव्हेरून कन्यांचे अपहरण करणे धर्मसंगत होते काय या प्रश्नाचा विचार तुमच्या मनी कधी आला नाही. तुम्ही धर्मज्ञ आहात आणि सारे विश्व तुमच्या धार्मिक आचरणाची प्रशंसा करते. तुमचे अनुकरण करते. एक आजन्म बरह्मचर्यवरताची प्रतिज्ञा तुमच्या किती धार्मिक निर्णयांच्या आड आली आहे, याचाही विचार, हे नरवृषभा, तुम्ही करायला हवा होतात.

" आणि ही प्रतिज्ञा आपण का केली होती बरे? असे काय घडले होते की ज्यामुळे तुम्हाला एवढी कठोर प्रतिज्ञा करावी लागली? कारण तुम्ही विवाह केल्याने पुत्रोत्पत्ती झाली तर तुम्ही ज्येष्ठ राजपुत्र असल्याने तुमच्या संततीस राज्याधिकार मिळेल अशी आशंका धीवरकन्या सत्यवतीस होती. सत्यवतीस ते भय वाटू नये म्हणून तुम्ही बरह्मचर्यवरताची प्रतिज्ञा केली आणि "भीष्म' हे नामाभिधान प्राप्त केले आणि ज्या राज्याच्या अखंड अस्तित्वासाठी आपण ही प्रतिज्ञा केली त्याच राज्याचे कौरव आणि पांडवांत विभानि व्हावे असा अधार्मिक सल्ला आपण धृतराष्ट्रास का दिलात? जर धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ असल्याने त्याचाच राज्यावर अधिकार आहे, असे आपणास वाटत होते व ते सिद्धही होते तर सर्वच राज्य, युधिष्ठिरास राज्याभिषेक करून, त्याच्या स्वाधीन करावे असा निर्णय आपण का दिला नाही? की राज्याचे खरे वारस कोण यासंबंधी तुमच्या मनात संभरम होता?

"हे उदारहृदया, सत्य आणि असत्य अशा दोनच बाजू सत्य असतात. अर्धे असत्य आणि अर्धे सत्य मिळून ना असत्य बनते ना सत्य बनते.

"हे धर्मश्रेष्ठा एकतर पांडवांचा या राज्यावर अधिकार आहे किंवा फक्त कौरवांचा आहे. अर्धा पांडवांचाही अधिकार आहे आणि अर्धा कौरवांचाही अधिकार आहे म्हणून राज्याचे विभानि करा ही कोणती राजनीती? याचे उत्तर गतकालाचे परिशीलन करूनही मला काही केल्या मिळत नाही. तुम्ही ज्येष्ठ कौरव आहात आणि कितीही त्याग केला असला तरीही त्याच राज्याच्या हिताची बाबिदारीही तुम्हीच घेतली आहे आणि म्हणूनच संन्यास न घेता तुम्ही कर्मशील आहात. तुमच्या पराकरमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हीच पुरुष अर्थाचे दास असतात असे तुम्हालाच न शोभणारे उद्गार कसे काढता?

"कारण हे ज्ञानवंता, पुरुष अर्थाचा नव्हे तर धर्माचा दास असतो आणि धर्म सूक्ष्म आहे. अतींद्रिय आहे. त्याचे अस्तित्व अर्थाएवढे स्पष्ट आणि ढोबळ नाही. अर्थ हा धर्माचा भाग आहे. धर्म हा अर्थाचा भाग नाही, हे सर्वविदित आहे. अर्थ शोक देतो तर धर्म स्वानंद देतो, कारण धर्म काळ घडवतो. अर्थ काळ घडवत नाही. हे पुरुषश्रेष्ठा, मनुष्य जन्माने, कर्माने आणि मृत्यूने धर्माचा दास असतो, कारण हाच धर्म मनुष्याच्या मोक्षाचे कारण बनतो. ज्याचे जीवन अर्थाच्या दास्यत्वात आहे त्याला निर्णयस्वातंत्र्य नाही की मोक्षही नाही.

"तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, खरे तर ज्येष्ठ कुरू या नात्याने तुम्ही आजच्या या समरप्रसंगास जबाबदार आहात आणि ही बाबिदारी आल्यानंतरही "मी अमुक एक कृत्य करीन, तमूक करणार नाही.' अशी निर्णायकता दाखवण्याचेही साहस करत आहात. आणि शिखंडीच्या हस्ते तुमचा मृत्यू व्हावा ही नियती सत्य व्हावी, यासाठी एवढा निसंहार तरी का? जर ती नियती आहे, तर हे महायुद्ध न होताही सत्य होईल."

श्रीकृष्णांचे भाषण ऐकून भीष्माचार्य सद्गदित झाले होते. त्यांच्या नेत्रांतून अविरत अश्रुपात होत होता. जणू काही त्यांच्या छातीवर कोटयवधी नाराच बाणांचा वर्षाव झाला होता. ते म्हणाले,

"हे परमेश्वरा, विगत कोणालाही शेवटपर्यंत सोडीत नाही. काल हा सर्वांना आपल्या मायावी पाशात घेऊन चाललेला असतो. मी अर्थाचा दास आहे की नाही याविषयी माझ्या मनात संभरम असला तरी मृत्यू माझ्या निकट आला आहे याचे ज्ञान मला झाले आहे आणि मृत्यू समरांगणावर आला तरच स्वर्गाची महाद्वारे माझ्यासाठी उघडतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंकानाही.

"हे मधुसूदना, मी बरह्मचर्याची प्रतिज्ञा केली तेव्हा मी तरुण होतो आणि मला त्यावेळीस वाटले तेवढे काही माझे धर्मज्ञान नव्हते हे सत्य आहे. कारण धर्म कणाकणाने आपले शाश्वत स्वरूप मनुष्यास दाखवीत जातो. काही लोकांपेक्षा मी अधिक बुद्धिमान होतो आणि तातांची इच्छा पूर्ण करणे व त्यासाठी काय वाटेल ते बलिदान देणे हा मी माझा त्याक्षणीचा धर्म मानला. मी त्याक्षणी कळालेल्या धर्माप्रमाणे वागलो. परंतु माझे बलिदान पाहून ना तातमहाराजांनी द्रवून सत्यवतीमातेचा त्याग केला ना सत्यवतीमातेने मला या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी स्वत: काही त्याग केला. कारण तिच्या दृष्टीने राज्यभोग महत्त्वाचे होते. तिची आणि तिच्या होणार्‍या पुत्रांची सुरक्षितता महत्त्वाची होती. हे दयाघना, मी विजात्रवीर्यासाठी कन्या आणल्या कारण ती माझ्याच मातेची आज्ञा होती. अन्यथा विजात्रवीर्य स्वयंवरात उभा राहता तर त्याच्या गळ्यात शूद्र स्त्रीसुद्धा वरमाला घालती ना! पण कुरुवंश चालायला तर हवा होता. विजात्रवीर्याचा विवाह आवश्यक तर होता. त्याचसाठी तर मी स्वयंवरात गेलो. विजात्रवीर्यासाठी तीन कन्या तर घेऊन आलो, पण हे पुरुषोत्तमा, ंबेने जेव्हा शाल्वाविषयीची तिची भावना प्रकट केली तेव्हा मीच तर तिला कुरुकुलाच्या बंधनातून मुत केले!

"मी.... तिचा स्वीकार कसा करू शकत होतो? मी तिला माझ्यासाठी नव्हते हरण करून आणलेले. मी शाश्वत निर्विकार होतो. ंबाच काय, या विश्वातील कोणतीही रमणी माझ्या हृदयावर अधिराज्य करू शकत नव्हती. माझी प्रतिज्ञा हीच माझी प्रिय पत्नी होती.

" आणि गुरू परशुरामांची आज्ञा तरी मी का ऐकावी? शाल्वाने तिचा पुन्हा स्वीकार केला नाही यात माझा कायष होता? ती अभुता होती. मनाने वरलेल्या पतीशी प्रामाणिक होती. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही, मग परशुरामांनी मलाच तिचा स्वीकार करण्याची आज्ञा का करावी? ती आज्ञा त्यांनी शाल्वाला का केली नाही. ंबेचे माझ्यावर प्रेम असते आणि तिने मलाच पती म्हणून वरले असते आणि माझी प्रतिज्ञा तळपत्या सूर्याएवढी सत्य असतानाही गुरूंनी आज्ञा केली असती तर कदाजात मी माझी प्रतिज्ञा विसरूनही गेलो असतो.

"पण ंबेला माझा सूड हवा होता. तिला शाल्व हवा होता. पण शाल्वाने तिला अव्हेरले. तिला मी नकोच होतो आणि गुरूंची आज्ञा मानून मी तिला आपली अर्धांगी बनवली असती तरी ती माझी नाही हे वास्तव काय मला विसरता आले असते?

"नाही, वृष्णिकुलवंतस, नाही. पण अजाणतेपणे का होईना मी ंबेचा वध करणारा बनलो. तिला शाल्व मिळाला नाही. तिला विजात्रवीर्य नको होता आणि मी गुरूंची आज्ञा जाणतेपणे अव्हेरली.

"सारीच पातके मनुष्याच्याच स्वेच्छेने होत नाहीत. हे यादवा, अगदी धर्मानेच वागत असतानाही मनुष्याच्या हातून पातके होतात. धर्म अतिसूक्ष्म आहे, असे ज्ञानीनि म्हणतात ते याचमुळे. कारण काळ हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आज जी गोष्ट धर्मनियत वाटते ती उद्या तशी असेलच याची खात्री कोण देणार? आज जे कर्म शुभ वाटते ते उद्या अशुभ ठरणार नाही याचा कोणाला विश्वास आहे? त्यामुळे मी गतकाळात केलेली कर्मे शुभ होती की अशुभ हे आजच्या काळासंदर्भात ठरण्यात काय अर्थ आहे? परंतु हे धर्मश्रेष्ठा, तू म्हणालास त्याप्रमाणे कर्मे शुभ ठरोत की अशुभ, मनुष्य आपल्या कर्मांनीच नियती घडवीत असतो आणि मी ंबेचा वधकर्ता ठरल्याने तिच्या हातून माझा या जन्मी का होईना वध व्हावा ही माझी नियती आहे आणि ही नियती मी स्वत:च घडवली आहे.

"हे सव्यसाची, सर्व भूते आपल्या ठायी आणि आपण सर्व भूतांठायी असतो हा बरह्मभाव तर तू जाणतोसच आणि हे जाणूनही संपूर्ण बरह्माचे ज्ञान मानवास कधीच होत नाही. कारण मनुष्यास जोवर तो स्वत:च अज्ञात आहे तोवर त्याला इतर चराचर कसे ज्ञात होणार आहे? माझी पांडवांवर प्रीती आहे हे सत्य आहे. राज्याधिकार त्यांनाच मिळायला हवा असे मला वाटते तेही सत्य आहे. राज्य ही कोणाची व्यतिगत मालमत्ता नसून जो प्रजेचे धर्माने प्रतिपालन करू शकतो त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे असेच शास्त्रे सांगत नाहीत का? जन्माने नियुत झालेला राजा दुष्ट असेल तर प्रजेने खुशाल त्याला हटवून योग्य व्यतीस राजा म्हणून नेमावे असे शास्त्र सांगत नाही काय? मग दुर्योधनाचा पराजय व्हावा आणि पांडवांना यशश्री मिळून त्यांना हे कुरूंचे पवित्र राज्य मिळावे असे मला वाटणे स्वाभाविकच आहे. त्यासाठीच मी युद्धात पांडवांना वधणार नाही असा निर्णय घेतला आहे आणि मला तो योग्य वाटतो.

"तरीही हे करुणाघना, मला तुझ्याही वर्तनाचे नवल वाटते आहे. तू सुद्धा आयुष्यभर पांडवांना साह्य केले आहेस. पांडवांविषयी तुला प्रीती आहे, हे सारे आर्यावर्त जाणते. तू आणि अर्जुनाची जोडी म्हणजे नर-नारायणाची जोडी आणि तू त्याचा त्याग करून दुष्टांशी गाठ बांधलीस हे काही केल्या माझ्या मनाला पटत नाही."

एवढे बोलून भीष्माचार्य दीर्घ सुस्कारे सोडीत अर्धोन्मीलित नेत्रांनी स्वस्थ बसले. गोपालाने आपल्या स्निग्ध दृष्टीने थकलेल्या भीष्माचार्यांचे अवलोकन केले आणि म्हणाला,

"भावना जेव्हा मनुष्याच्या विवेकावर अधिष्ठान गावू लागिते तेव्हा प्रत्येक मनुष्य धर्माचाच आधार घेत आपल्या चुकीचे समर्थन करू लागतो हे अजरा मर शास्त्र आहे, सत्य आहे! तुम्ही आता वृद्ध झाला आहात आणि विवेकाची जागा भावनांनी घेतली आहे. भावनांच्या आवेगात घेतला जाणारा निर्णय कितीही धर्मसंगत वाटला तरी तो अधर्मीच मानला जायला हवा, असे माझे नित्य सांगणे आहे.

"कारण विवेक शाश्वत आहे तर भावना क्षणिक आहेत. विवेक मनुष्यास परमात्मतत्त्वाच्या निकट नेतो तर भावना मनुष्यास त्याच्या कर्मात कायमच्या खिडून टाकतात. तुमचे पांडवांवर प्रेम आहे व त्यासाठीच राज्यावर त्यांचा अधिकार आहे असे तुमचे कथन आहे. आणि तरीही तुम्ही द्रोण, विदुरादि धर्मश्रेष्ठ पांडवांचे हितचिंतक असूनही आजवर राज्याधिकार धृतराष्ट्राकडून काढून पांडवांच्या हाती देण्यात असमर्थ ठरला आहात. जे खांडव प्रस्थाचे राज्य पांडवांना मिळाले तेच राज्य, खरे असो की खोटे, पण जुगारात हरून आपले स्वातंत्र्यही पांडवांनी गमावले याकडे कोणीही धर्मज्ञ डोळसपणे पाहात नाही ही विसंगती नाही काय? आणि प्रत्येक वेळी युद्धाचा विकल्प उपलब्ध असूनही पांडवांनी युद्धाचा ंगीकार केला नाही कारण त्यांना भावंडांशी युद्ध नको होते, हा सत्याचा अपमान नाही काय? अन्यथा आज तरी पांडव युद्धाच्या तयारीत का आलेअसते?

"हे तुम्हासही माहीत आहे कुरुकुलभूषणा, की या क्षणी या राज्याचे अधिपती महाराज धृतराष्ट्र आहेत, दुर्योधनादी कौरव नव्हेत. युधिष्ठिरास तरी राजा होण्याचे समाधान मिळाले, दुर्योधनास यौवराज्याभिषेकही कधी झाला नाही हे वास्तव तरी आहे की नाही? म्हणजे फक्त दुर्योधनास राज्यलोभ आहे हे विधान करण्यासाठी कोणता सबळ पुरावा आपल्याकडे आहे? दुसरे असे की, दुर्योधन दुष्ट आहे, हे विधान करताना प्रजेवर अत्याचार करण्यासाठी त्याच्याकडे काही राज्याधिकार तरी हवेत की नकोत? खरे तर पांडवांचे आव्हान दुर्योधनास नसून महा राज धृतराष्ट्रांना आहे, असाच या घटनांचा अर्थ होत नाही काय? कारण दुर्योधन ना राजा आहे ना युवराज आहे. तो धृतराष्ट्राचा पुत्र आहे, एवढीच काय ती वस्तुस्थिती.

"पण हे महाबाहो, या धरत्रीचे समराट धृतराष्ट्र आहेत. ते ंध आहेत आणि ते पुत्रप्रेमाने गरस्त आहेत. त्यामुळेच तर या युद्धास त्यांनी संमती दिली आहे. पण दुर्योधनावर आगपाखड करीत असताना आपण धृतराष्ट्रांना का बरे सोडतो आहोत? कारण ते ंध आहेत आणि ंधास राज्य करण्याचा अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे आणि म्हणूनच धृतराष्ट्र ज्येष्ठ असतानाही ते ंध आहेत म्हणून पांडूस राज्याधिकार दिला गेला. तो कनिष्ठ असतानाही.

"मग ज्येष्ठ धृतराष्ट्राला पांडूच्या निधनानंतर राज्याधिकार न देता,ज्याप्रमाणे इतिहासात घडले आहे की विजात्रवीर्य जात्रांगदाच्या मृत्यूनंतर लहान असल्याने तुम्ही स्वत:च माता सत्यवतीच्या आदेशाने कारभार चालवायला सुरुवात केली तशी पांडूच्या मृत्यूनंतर त्याचे ज्येष्ठ पुत्र हस्तिनापुरी आल्यानंतर,तुम्ही किंवा अन्य कोणी युधिष्ठिरास राजा बनवून तो मोठा होईपर्यंत राज्यकारभार का हाकला नाही? धृतराष्ट्रास तो ंध आहे म्हणून पुन्हा पदच्युत करणे तुम्हाला सहशिय होते. कारण एकदा ज्या नियमाने एखाद्याला अपात्र ठरवले त्यालाच दुसर्‍या नियमाने जर पात्र ठरवता येते तर त्यालाच मूळ नियमाने पुन्हा अपात्र ठरवणे तुम्हाला कोठे अशक्य होते?

" आणि तरीही जर पांडवांचाच राज्यावर खरा अधिकार आहे या धर्मवंतां-वर तुमचा विश्वास होता आणि आजही आहे, तर कौरवांचे, धृतराष्ट्राचे तुम्ही मीठ खाल्ले नाही हे उघड आहे. जर तुम्ही अर्थाचे दास असाल तर पांडूच्या अर्थाचे दास आहात आणि म्हणूनच पांडवांना युद्धात जिंकण्याचा मार्ग सहसाध्यि करण्यासाठीच तुम्ही कौरवांची बाजू सोडायला तयार नाही आहात.

"हे कुरुकुलश्रेष्ठा, तुमचे हे वर्तन अधर्माचे आहे. शास्त्राने सांगितले आहे की, आपल्या विवेकबुद्धीस जी गोष्ट श्रेष्ठ वाटते ती प्राप्त करण्यासाठी धर्मसंगत मार्गाने प्रयत्न करायला हवा. तुम्ही कौरवांच्या बाजूने युद्ध करून एकाही पांडवास न वधता त्यांची दशसहस्र सेना वधेन अशी अट घालून सेनापतिपदाची वस्त्रे नेसण्यापेक्षा, पांडवांच्या पक्षास मिळून, त्यांच्या बाजूने युद्ध करून, प्रसंगी धार्तराष्ट्रांना वधूनही तुमचा धर्म जास्त उज्ज्वल-धवल व सयुतिक होईल. कारण तुम्ही तुमच्या विवेकाने वागला असाल! परंतु ज्याच्यावर विश्वास नाही अशा पक्षाचे सेनापत्य स्वीकारणे हे निश्चयाने अधर्माचे होईल.

" आणि हे उदारहृदया, हे लक्षात घ्या की या युद्धात जर तुमचा मृत्यू यावा असे तुम्हाला वाटत असेल तर ते जे तुमच्यावर प्रीती करतात असे तुम्हाला वाटते त्यांचे हित करीत असताना जर असा मृत्यू आला तर, तुम्ही इच्छामरणी असलात आणि स्वर्गाचे द्वार उघडेपर्यंत जरी आपले प्राण स्तंभन करून थांबलात, तरीही स्वर्गाची द्वारे निमिषार्धात बंद होतील. तुम्हाल अनंतकाळ आकरोश करीत त्या द्वाराबाहेर थांबावे लागेल हे निश्चित.

"तेव्हा हे पुरुषश्रेष्ठा, अद्यापही वेळ गेली नाही. कौरव या युद्धात जिंकोत की पांडव, तुम्ही नि:संशयपणे ज्या पक्षास मिळायला हवे त्या पक्षास समर्पण हृदयाने मिळा. कारण हे आत्मस्वरूप बरह्म अविनाशी आहे. या अव्यय तत्त्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. हे श्रेष्ठपुरुषा, नित्य अविनाशी व अचिंत्य असा शरीराचा मालक, तो आत्मा, त्याला प्राप्त होणारे हे देह नाशवंत व अनित्य होत. सत्य हे आत्म्याएवढेच नित्य आणि सर्वव्यापक आहे. तुला जे सत्य पटले आहे, त्या सत्यासाठी तू यज्ञ कर. तुझा कोणी नाश करू शकत नाही, की ज्यांनी तुझा नाश करावा अशी तुझ्या कर्मांची नियती आहे, तेही तुझा नाश करू शकत नाहीत.

"हे महाभागा, मनुष्य नेहमीच युद्धरत असतो आणि प्रत्येक युद्धरत जीव हा क्षत्रिय असतो. कारण आल्या प्रसंगी युद्ध करणे हे प्रत्येक जन्म घेणार्‍या जीवास करमप्राप्त असते. विजय-पराजय हे प्रत्येक क्षणाच्या युद्धाशी निगडित असतो आणि जो तटस्थ बुद्धीने या विजय-पराजयाकडे पाहतो त्याच्यासाठी स्वर्गाचे द्वार हे नेहमीच उघडे असते.

"तेव्हा हे भरतवंशश्रेष्ठा, दु:खी होऊ नकोस, असे अश्रू वाहवू नकोस. मी कौरवांचा पक्ष घेतला आहे म्हणजे मी कौरवांचा असा भरम तू बाळगू नकोस. मी तटस्थ आहे. मी कोणाचाही नाही. मला कोणतीही कर्मे जाकटत नाहीत. मी याक्षणी कोणाच्याही बाजूने नाही. कारण जेव्हा मनुष्य बाजू घेतो तेव्हा त्या बाजूनेच घटनांकडे पाहातो. त्यातून शाश्वत सत्य हाती लागत नाही. तुम्हाला पांडवांबद्दल प्रीती आहे, तर त्या प्रीतीस्तव अवश्य तुम्ही पांडवांच्याच पक्षाला जाऊन मिळायला हवे आणि तेच शास्त्र सांगते."

यावर वयोवृद्ध तापस भीष्माचार्य काहीहीलले नाहीत. ते मौन राहिले.

अश्रू ढाळीत राहिले.
 

मागे

पुढे

 
Home Help Desk FAQ Your Comments
 

1998 - Rasik Enterprises.