Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fontsशून्य महाभारत मागे - 1 - पुढे
प्रकरण - ६

श्रीकृष्णाने जीवनभर आपली साथ दिली, परंतु नेमक्या अटी-तटीच्या क्षणाला त्याने बाजू बदलल्याने भीम कृद्ध झाला असला तरी आपल्या नितांत पराक्रमावर त्याचा विश्वास होता. कृष्णाला भेटून आल्यापासून द्रौपदीही अस्वस्थ होती. युधिष्ठिराने तर या स्थितीत आपण युद्ध न करता पुन्हा वनवासात निघून जावे असे विधान करून भीमाच्या क्रोधात अधिकच भर पाडली होती. अर्जुनाचे श्रीकृष्णावर नितांत प्रेम होते. श्रीकृष्णाच्या ऐवजी त्याची सेना आपल्या वाटयाला यावी याच्या दु:खात तो मग्न होता. नकुल आणि सहदेवाची अवस्था निराळी नव्हती. शांत होती ती माता कुंती.

कुंती आपल्या पुत्रांस भेटण्यासाठी शिबिरात आली तेव्हा द्रौपदी धर्मराज युधिष्ठिरासमवेत आणि अन्य पतींसमवेत एका आसनावर बसली होती. कुंतीस पाहताच उभयतांनी उठून धर्मनिष्ठ कुंतीस प्रणाम केला. पुत्रास अमरत्वाचा आशीर्वाद देऊन कुंती आसनावर बसली. मातेस खिन्न पाहून युधिष्ठिराने त्या खिन्न्तेचे कारण विचारले असता कुंती म्हणाली,

"पुत्रा, तुम्हा पाचही मुलांसाठी माझा आत्मा किती तिळ-तिळ तुटत असतो याची तुला जाणीव आहे. या सामराज्याची खरी समराज्ञी मी. मीच खरे तर तुला सोबत घेऊन राज्यशकट हाकावा अशी खरी राजनीती, परंतु पाहा,दुर्भाग्याने असे काही दान पदरात टाकले आहे की तुम्हा भावंडांना आपल्याच अधिकारांसाठी प्राणांना पणावर लावावे लागत आहे. कृष्ण खरे तर माझा निकट संबंधी, परंतु आज तोही विरुद्ध पक्षास जाऊन मिळाला आहे. गांधारीपुत्राने त्याच्यावर अशी कोणती माजेहनी टाकिली की ज्या योगे अर्जुनरूपी नराचा स्नेही कृष्णरूपी नारायणाने त्याग करावा?

"माझ्या धर्मनिष्ठ मुला, शेवटी मी आई आहे. माझा तुम्हा सर्वांच्या पराक्रमावर दृढ विश्वास आहे. देवेंद्र जरी युद्धास समोर ठाकला तरी त्याला पराजित करण्याचे सामर्थ्य तुम्हा पाच भावंडांत आहे. परंतु हे धार्तराष्ट्र महापातकी आणि दुष्ट आहेत. त्यांच्यासमोर युद्धात तुमचा निभाव कसा लागणार हे मला काही केल्या कळत नाही. त्याचमुळे मी खिन्न आहे. कृष्ण तुम्हासोबत असता तर त्या महाचतुर पुरुषाने अशक्यप्राय यशही तुम्हाला खेचून आणून दिले असते.

"हे माझ्या धर्मनिष्ठ यमपुत्रा, तू म्हणजे धर्म. धर्माने तुझ्या रूपाने अवतार घेतला असावा असे तुझे आचरण पाहून वाटते. धर्म आणि अधर्मातील हे युद्ध आहे असे माझे मातृहृदय मला कळवळून सांगते आहे आणि या युद्धात तुझा जय होईल असाच माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु माझे मातृहृदय मात्र अनामिक आशंकेने व्याप्त झाले आहे. हे युद्ध करावे काय? की काही काळ वाट पाहून आपली स्थिती अधिक सक्षम झाल्यानंतर युद्ध करावे याबद्दल माझ्या मनात द्वंद्व आहे."

"तू अगदी माझ्या मनातीलच बोललीस." युधिष्ठिर म्हणाला, ""माते, युद्ध हे एक अनिष्ट कर्म आहे असे माझे मन मला नेहमीच सांगत आले आहे. ज्या युद्धात अनंत जीवांचा संहार होऊन पृथ्वी रतात भिते ते युद्धि अमानवीच होय. कृष्ण हा स्वत: नारायणाचा अवतार आहे, असे मलाही वाटत होते. माझी त्यावर पराकोटीची श्रद्धा होती. पण त्याने अजाणतेपणे का होईना अधर्माची बाजू घेतली आहे. धार्तराष्ट्रांनी आजतागायत आमच्या नाशासाठी एवढी पातके केली आहेत की नरकातच त्यांना स्थान मिळेल असे मला नि:श्चयाने वाटते. परंतु हा युद्धाचा प्रसंग समोर येऊन ठाकला आहे. माझी इच्छा नसतानाही हा प्रसंग यावा हे खजातच दुर्दैव. परंतु माते, हे माझे अन्य बंधूही मला सहमत नाहीत. भीम तर नेहमीच युद्धज्वराने पछाडलेला असतो."

भीमाने हे विधान ऐकताच विकट हास्य केले आणि म्हणाला,

"सबलांनी सबल नीतीचा आणि दुर्बलांनी दुर्बल नीतीचा स्वीकार करावा हे अटळच आहे. समरप्रसंग समोर ठाकता युद्ध करणे ही सबळ नीती तर तेयुद्ध टाळून कर्मसंन्याशाच्या गप्पा माराव्यात ही दुर्बल नीती. हे माते, युधिष्ठिर हा क्षात्रवेषातील बराह्मण आहे असे मी जे सदैव सांगत आलो आहे ते त्याचमुळे. आपण राज्याधिपती व्हावे असे जर या माझ्या धर्मज्ञ ज्येष्ठ बंधूस वाटत नाही तर त्याने इंद्रप्रस्थीचा राजमुकुट तरी का परिधान केला होता म्हणतो मी? या राज्यावर आम्हा पांडवांचा अधिकार आहे आणि ज्यावर आपला अधिकार आहे, त्यावर कोणी उपटसुंभ स्वत:ची सत्ता चालवत असेल तर ते स्वस्थ संन्यासीमनाने पाहात राहणे हे भेकडपणाचे नाही तर मग अन्य कशाचे लक्षण आहे?

"माते, युधिष्ठिर तेवढा धर्मज्ञ! मग आम्ही कोण आहोत? द्यूत टाळ असे यास वारंवार सांगूनही द्यूताचा हट्ट करणारा हा माझा ज्येष्ठ बंधू काय धार्तराष्ट्रांेवढाच दुष्ट नाही? द्रौपदी ही आम्हा पाचही बंधूंची पत्नी. तिला द्यूतात पणावर लावायचा स्वामित्व अधिकार कोणी या ज्येष्ठ बंधूस दिला होता? एकवस्त्रा असतानाही मानिनी याज्ञसेनीचा भीषण अपमान झाला. त्यांचा सूड घ्यायच्या गप्पा सोडून केवळ कृष्ण कौरवांच्या पक्षाला मिळाला म्हणून त्या आधी युद्धोत्सुक असलेला युधिष्ठिर आता संन्यासाच्या गप्पा मारू लागला आहे, हे अनिष्ट आहे. दुर्दैव आहे.

"माते, पण हे युद्ध होणारच. आणि मी तुला खरे सांगतो, कोणत्याही युद्धात आपल्या बाजूने कोण आहे आणि कोण नाही, आपली शती कमी आहे की अधिक, यास काही अर्थ नाही. माते, विजय फक्त मनात असतो आणि विजयाचा दृढ संकल्प असेल तर विपरीत स्थितीतही विजय मिळू शकतो. इतिहासातही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

" आणि मी म्हणतो, कोण हा श्रीकृष्ण, ज्याच्या सोबत असल्या-नसल्याने आम्हा पांडवांना फरक पडणार आहे? हे खरे की तो कालपर्यंत आम्हा पांडवांचा समर्थक होता. पण श्रीकृष्ण समर्थक होता म्हणून आम्ही यशस्वी झालो असे आजवर काय घडले आहे बरे? शेवटी त्याचाच कट्टर शत्रू, जो जरा संध, त्याचा काटा मीच काढला ना? श्रीकृष्णास ज्याने अनेक वेळा पराभूत केले त्याचा वध जर मला करावा लागला तर श्रीकृष्ण नारायणाचा अवतार असे आम्ही पांडव का म्हणतो बरे?

"केवळ तो चतुर आहे म्हणून? शिशुपालाने श्रीकृष्णाच्या अगरपूजेस विरोध केला ते योग्यच होते असे मी म्हणेन. ज्याला कोणतीही नीती नाही, सोयीप्रमाणे पक्ष घेतो तो परमात्म्याचा अवतार होऊ शकणार नाही, हे तर शाश्वत सत्य आहे.

"तेव्हा हे माते, तू संशयी होण्याचे काही कारण नाही. धर्मराजाचे मन नेहमीच अस्थिर असते आणि त्याला इतिहास साक्षी आहे. अधिक विचार करणार्‍या कोणत्याही पुरुषाला शेवटी कर्मनिश्चिती करता येत नाही, हे जेवढे शाश्वत सत्य आहे तेवढेच ते या माझ्या ज्येष्ठ बंधूस लागू पडते.

"हे माते, या युद्धात आमचा विजय होणार याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही आणि हा केवळ अंध आत्मविश्वास नाही. त्यासाठी अर्जुन, नकुल-सहदेव आणि ज्येष्ठ बंधो, जरा थोडा कौरवांच्या बाजूचा विचार करा.

"संख्येचा विचार केला तर आपल्या बाजूने आधी सात अक्षौहिणी सेना होती, तर आता श्रीकृष्णाची सेना येऊन मिळाल्याने आपली संख्या नऊ अक्षौहिणी एवढी झाली आहे आणि संख्येने जवळपास तेवढीच, म्हणजे नऊ अक्षौहिणी सेना कौरवांच्या बाजूने आहे म्हणजेच संख्येने दोघांचे बलाबल समान आहे.

"आपल्याकडे द्रुपद, धृष्टद्युम्नासारखे महावीर आहेत. तसेच सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुराज, कुंतिभोज आणि शौढ्यासारखे महारथी आहेत. कौरवांचा विचार करता भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कृप, विकर्ण, अश्वत्थामा, भूपरश्रवा आदी महारथी आहेत. आपले सारे महारथी, हे मनोदुर्बल धर्मराजा, तुझ्यावर सर्वस्वी निष्ठा ठेवून आहेत. परंतु सुदैवाने कौरवांचे तसे नाही.

"भीष्माचार्यांचेच म्हणशील तर त्यांनी आपणा सर्व भावांवरील प्रीतीमुळे युद्धात एकाही पांडवास वधणार नाही असा दृढनिश्चय केला आहे आणि भीष्माचार्य ही प्रतिज्ञा पाळणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्र संशय नाही, कारण ते सत्यवचनी आहेत. खरे तर त्यांनी अशी काही प्रतिज्ञा केली नसती तर आपण या युद्धाचा विचार करण्यातही अर्थ नव्हता, कारण जेथे त्यांना परशुराम पराजित करू शकले नाहीत, त्या इच्छामरणी महापुरुषास कोण वधणार? हेही खरे की शिखंडी आपल्याच बाजूने आहे आणि शिखंडीवर शस्त्र चालवणार नाही अशीही भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे; एरवी शिखंडी भीष्माचार्यांना ठार मारू शकणार नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण आता भीष्माचार्य पांडवांना वधणार नाहीत आणि ते शिखंडीवर शस्त्र चालवणार नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे भीष्माचार्यांच्या जविंत असेपर्यंत आम्ही सारेच पांडव सुरक्षित आहोत.

"तेव्हा अधिकात अधिक दिवस त्यांनीच सेनापती म्हणून राहावे आणि त्या काळात कौरवांचे अधिकाधिक रथी-महारथी यांचे आपण उच्चाटन करावे असे मला वाटते आणि महाबाहू अर्जुनास ते अशक्य नाही.

"द्रोणाचार्यांचेच म्हणशील माते, तर त्यांचेही आमच्यावर पुत्रवत प्रेम आहे. जेवढे त्यांचे प्रेम या सव्यसाचीवर आहे, तेवढे स्वत:चा पुत्र, जो अश्वत्थामा त्याच्यावरही नाही, त्यामुळे तेसुद्धा कोणाही पांडवांस वधणार नाहीत; पण ते तरीही आपल्या अनंत बाहूबलाने आमचा नाश करू शकतात हे वास्तव आहे, कारण ते अखेर आमचे गुरू आहेत आणि आम्हापेक्षा ते युद्धशास्त्रात अधिक प्रवीण आहेत हे तर सत्य आहे. परंतु हे माते, तरीही पांडवांची बाजू वरचढ आहे. कारण ज्या द्रुपदाने त्यांचा वारंवार अपमान केला आणि ज्याचा सूड या महागुरूने आमच्याच करवी उगविला तो द्रुपद आमच्याकडे आहे आणि त्याच द्रुपदाने याच द्रोणाचार्यांच्या नाशासाठी भयंकर यज्ञ रजाला. त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांची उत्पत्ती झाली. ज्या द्रोणाच्या नाशासाठी यज्ञ झाला, त्या यज्ञातून उत्पन्न झालेला धृष्टद्युम्न आमचा आहे आणि त्याच यज्ञातून उत्पन्न झालेली द्रौपदीही आम्हां बंधूची पत्नी आहे. तेव्हा या युद्धात द्रोणाचार्यांचा वध नियत नियतीमुळे महारथी धृष्टद्युम्न करणार हे सुद्धा निश्चित.

" आणि माते, कृपाचार्यांची तर गोष्टच वेगळी आहे. ते आमचे सर्वप्रथम गुरू होते आणि ते अमर आहेत. त्यांना कोण वधू शकणार? कळीकाळातही ते सामर्थ्य नाही; पण ना ते आमचे द्वेष्टे आहेत ना मित्र आहेत. द्रोणाचार्यांच्या वधानंतर, द्रोणाचार्य त्यांचे मेहुणे असल्याने कदाजात ते काजेपष्ट होतील हे खरे; पण दुर्योधनाची त्यांच्यावरही प्रीत नाही. त्यामुळे मला कृपाचार्यांची काळजी करावी वाटली तरी ती एवढी गंभीर नाही.

"विकर्ण हा धार्तराष्ट्र महारथी खरा; पण खुद्द कौरवांत तो दुय्यम समजला जातो. त्यामुळे या महापुरुषाचा अहंकार अगदीच दुखावला गेला आहे आणि मी असे ऐकतो की तो दुर्योधनासही दुरुत्तरे करतो. हा महारथी विकर्ण दुर्योधनाच्या विजयौवजी पराजयासाठीच अधिक प्रयत्न करेल असा माझा दृढ विश्वास आहे आणि तेही आमच्याच फायद्याचे आहे.

"अश्वत्थामा मात्र सर्वांत अधिक घातकी आहे. तो अखेर द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि कर्णाप्रमाणे किंवा अन्य कोणाही कुरू महायोद्धयांप्रमाणे शापित नाही. मी असे ऐकतो की तो दुर्योधनावर जीवापाड प्रेम करतो आणि त्याच्याच यशासाठी झटतो. परंतु खुद्द त्याचा पिता त्याच्यावर प्रेम करीत नाही. अश्वत्थामा शीघरकोपी आणि अविचारी आहे, असे सारे म्हणतात. त्यामुळे आपण त्याच्याबद्दलच फक्त सावध राहिले पाहिजे.

"फक्त कर्ण तेवढा महत्त्वाचा कारण तो आम्हा पांडवांचा पुरेपूर द्वेष करतो. तो शापित आहे हे खरे. पर तरीही त्याला आपण गांभीर्याने घ्यायला हवे. भीष्माचार्यांनी त्याला अर्धरथी म्हटल्याने आपला तात्पुरता फायदा झाला असला तरी तो कायम टिकणार नाही. अर्जुनास तर तो वधण्यास आतुर झाला आहे. सर्व शस्त्रे आणि अस्त्रांचे ज्ञान असणारा आणि पांडवांच्या नाशासाठी टपलेला तोच एक महाधनुर्धर कौरवांच्या बाजूने आहे आणि मला फक्त त्याचीच काळजी वाटते. परंतु जर भीष्माचार्य अधिक काळ जविंत राहून सेनापती राहिले तर तोवर कर्ण हाती शस्त्र घेणार नाही, ही आपल्याच लाभाची गोष्ट आहे.

" आणि कर्णाच्या काही अहंगंडाच्या समस्या आहेत. तो क्षत्रिय नाही. सामान्य सूतपुत्र आहे. द्रोणाचार्यांनीही त्याला अव्हेरले आणि महागुरू परशुरामांनी तर त्यास शापिले आहे. कर्ण अर्जुनासही जड जाईल हे खरे. कदाजात दोघांचे युद्ध या दोघांसाठीही अखेरचे असेल. परंतु कर्ण शापित आहे आणि जरी त्याच्या निष्ठा सर्वस्वाने दुर्योधनाच्या चरणी असल्या तरीही कदाजात आपण त्यालाही दूर करू शकतो. तेव्हा कर्ण आणि अश्वत्थाम्याचीच आपण काळजी करायला हवी.

"स्वत: दुर्योधन रणात महापराक्रमी आहे, हे कालत्रयी सत्य आहे; पण तो गदाधर आणि मीही गदाधर. जे काही अंती होईल ते त्याच्यात आणि माझ्यात आणि त्याची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा मी केली आहेच, त्याने नाही. मी अवश्य दुर्योधनाची मांडी फोडेन... कारण त्याच मांडीवर थाप मारून त्याने माझ्या लाडया पत्नीस,... द्रौपदीस दुष्ट खुणा केल्या होत्या! युद्धात हे पातक आहे हे खरे; पण मी माझी प्रतिज्ञा नक्की पार पाडणार हेच अटळ विधिलिखित आहे आणि त्या योगेच माझा विजयही सुकर होणार आहे.

" आणि हे माते, मी जे सांगितले त्यावरून एक गोष्ट ध्यानी घे. आमच्या बाजूचे वीर अभंग आहेत. त्यांच्या या माझ्या ज्येष्ठ भरात्यावरील निष्ठा अटळ आहेत आणि ते किंचितही शापित नाहीत. माझ्याकडे असा एकही वीर नाही ज्याने "एकाही कौरवाला ठार मारणार नाही.' अशी प्रतिज्ञा केली असेल!

"दुर्योधनाचा पक्ष दुभंगलेला आहे. खुद्द त्याच्या पित्यास, महाराज धृतराष्ट्रास, या युद्धाबद्दल ममत्व नाही. त्याचे मनही दुंभगलेले आहे आणि हे प्रिय ज्येष्ठ भरात्या, ज्यांचे नेते दुंभगलेले असतात अशा नेत्यांच्या प्रजेस कधीही यश मिळत नाही, हे समजावून घे. आपल्याला, कृष्ण आपल्या बाजूने नसतानाही, जय मिळणार हे निश्चित आहे. कारण आपल्या बाजूने कोणीही दुभंग मनाचा नाही,

"फक्त तू सोडून.

" आणि हे ज्येष्ठ पांडवा, मन स्थिर ठेव, संतुलित ठेव. कारण पुन्हा लक्षात घे, विजय मनात असतो. रणभूमीवर नसतो. युद्धात मृत्यू पावूनही अजरा मर झालेले कितीतरी योद्धे आहेत; पण त्या वीरांच्या मृत्यूने राजास यश दिले आहे. तू आमचा ज्येष्ठ भराता या नात्याने आमचा राजा आहेस आणि हे पृथ्वीपालका, या रणात तुला किंचितही क्षती होणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे.

"हे माते, कृष्णास विस्मरूयात आपण, कारण तो हाती शस्त्र घेणार नाही. तो बोलतो खूप चतुर आणि कधी असेही वाटते की त्याच्या ओठांवर देवी सरस्वतीचे अधिष्ठान आहे. होताही तो आमचा सखा कधीतरी, परंतु शत्रूचे मित्रत्व होणे आणि मित्रांशीही शत्रुत्व होणे ही निरीत आहे. अन्यथा ज्या द्रुपदास बांधून अर्जुनाने गुरू द्रोणांसमोर उपस्थित केले, तोच द्रुपद आज आपल्या पुत्रांसह आमच्याबरोबर या संगरात सारी सेना घेऊन का आला असता?

"का द्रौपदी आमची भार्या झाली असती?

"नियती आमच्या बाजूने आहे. कौरवांच्या नव्हे आणि म्हणूनच हे युद्ध केलेच पाहिजे. आपला जय निश्चित आहे."

यावर पंडुपत्नी कुंतीने समाधान व्यत करीत धर्मराज युधिष्ठिराकडे पाहिले आणि म्हणाली...

"तुम्हाला कर्णाचेही भय बाळगण्याचे कारण नाही."

द्रौपदीने चमकून माता कुंतीकडे पाहिले.
 

मागे

पुढे

 
Home Help Desk FAQ Your Comments
 

1998 - Rasik Enterprises.