Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fontsशून्य महाभारत मागे - 1 - पुढे
प्रकरण - ६

कमलनयन परमात्मस्वरूप भगवान श्रीकृष्णाने आपले नेत्र उघडले आणि या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या अद्भुत सृष्टीकडे अनिवार जिज्ञासेने पाहिले. द्रोणाचार्य श्रीकृष्णाच्या तेजोमय मुखाकडे भक्तिभावाने पाहात होते.

"श्रीकृष्णा, तुझी लीला अपार आहे, परंतु तरीही माझ्या मनातील शंका काही केल्या दूर झाली नाही. पांडवांची बाजू सत्य की कौरवांची, हे समज की विवाद्य आहे. परंतु हे नारायणस्वरूपा, तू कशी बाजू बदललीस? ज्या बाजूने तू सदैव राहिलास, ज्यांचे नेहमीच क्षेम चिंतिले, ज्यांच्या हितासाठी तू सदैव तत्पर राहिलास, ज्यांच्या हितासाठी तू नीतीलाही कधी-कधी दूर ठेवले आहेस, आता त्यांची बाजू सोडणे हे तुला शोभते काय? श्रीकृष्णा, जसे गंगेने उलटे वाहू लागावे, पृथ्वीने स्थानच्युत व्हावे असेच तुझे वर्तन नाही काय? धर्म खूप सूक्ष्म आहे आणि ज्ञानवंतांनाही अनेकदा धर्म समजत नाही असे म्हणतात. परंतु तू तर धर्माचा संस्थापक आहेस. तुझ्यातूनच, यज्ञातून ज्वाला उत्पन्न व्हाव्यात, तसा धर्म निघाला आहे. धर्म स्थिर, अविचल आणि निर्विकार असतो असे ज्ञानीनि म्हणतात. परंतु तुझ्या वर्तनाने धर्म हा अस्थिर, चंचल आणि कसाही वाकवता येईल असे सर्व जगतास वाटू लागेल आणि मग देवताही आपले वर्तनलतील. ब्रह्मदेवही स्थानच्युत होईल पण तुझ्या या वर्तनामागे काहीतरी गूढ असेल असे मला वाटते आणि ते समजावून घेण्याची अनावर जज्ञासा मिला झाली आहे.

"हे श्रीकृष्णा, कदाचित दुर्योधनाच्या पक्षास मिळाल्यासारखे दाखवून पांडवांचे अंती हित करावे असे तुझ्या मनात असेलर्‍आजनीतीशास्त्रातील भेदाची नीती पूर्वीच्या अनेक राजांनी अमलात आणली आहे, असे मी जाणतो. परंतु अशा राजांना इतिहासात नेहमीच अधम कोटीचे स्थान लाभले आहे. त्यांचा भेदनीतीने झालेला जय शुद्ध नाही, असे पूर्वाचार्यांचे मत आहे आणि तरीही असे कृत्य सामान्य व्यतीने केले तर ते क्षम्य आहे असे आपणास म्हणता येईल. परंतु ते स्वत: श्रीकृष्णाने केले तर मग श्रीकृष्णचारित्र्याबद्दल संदेह उत्पन्न होईल या विषयी माझ्या मनात शंका नाही.

"तेव्हा तूच माझ्या संशयाचे निराकरण करावे, असे मला वाटते."

एवढे वयोवृद्ध, तपस्वी शोभतील असे द्रोणाचार्य स्वस्थ उभे राहिले आणि अनिवार जज्ञासेने श्रीकृष्णाकिडे पाहू लागले. श्रीकृष्णाच्या मुखावर नेहमी असते तशी नीरव शांती होती आणि त्या शांतीचे तेज सर्व चराचरास गंभीर बनवत होते. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांकडे पाहिले आणि विचारले,

"आचार्य, हे युद्ध आता होणार हे निश्चितच आहे. तेव्हा या युद्धात कोणाचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते?"

आपल्या प्रश्नाचे उत्तर न देता श्रीकृष्णाने अन्य प्रश्न केला आहे हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आले. परंतु उत्तर देण्याच्या निश्चयाने ते म्हणाले,

"श्रीकृष्णा, हा फार मोठा अवघड प्रश्न तू विचारला आहेस यात संशय नाही. पाचही पांडव, द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, शिखंडीसह सारे कौरव माझे शिष्य आहेत. कर्ण आणि एकलव्यही माझे अप्रत्यक्ष शिष्य आहेत आणि तू हे जाणतोस.

"हे करुणाकरा, शिष्य हा गुरूस पुत्रासमान असतो हे शास्त्रवचन तू जाणतोसच. त्यामुळे धृतराष्टाचे जसे कौरवांवरच प्रेम आहे किंवा प्रिय म्हणून भीष्माचार्यांचे आणि पुत्र म्हणून कुंतीचे पांडवांवरच प्रेम आहे तसे काही माझे नाही. कौरव आणि पांडव हे एका अर्थाने माझे पुत्रच होत आणि उभयतांवर मी प्रेम करतो ही वस्तुस्थिती आहे आणि माझे शिष्य आपापसात युद्ध करायला निघाले असता गुरूचे मन भावनाकल्लोळाने गबिलेले असिणार हेही निश्चित.

"हे द्वारकाधीशा, पुत्राने आशीर्वाद मागितला तर "विजयी भव' असे म्हणणे शास्त्रसंमत आहे, हे तूही जाणतोसच. परंतु येथे शिष्यरूपी पुत्रांतच संघर्ष असल्याने आणि युद्धात कोणा एकाचाच जय संभव असल्याने उभयतांना "विजयी भव' असा आशीर्वाद दिला तर एकाला तरी दिलेला आशीर्वाद असत्य ठरणार आहे हेही निश्चित. अशा अवस्थेत आशीर्वाद खोटा ठरणे हेही गुरूस अहितकारी आणि कीर्ती कलंकित करणारे ठरेल हेही तेवढेच सत्य वचन.

"म्हणूनच या युद्धात कोणाचा जय व्हावा असे मला वाटते, हा जो प्रश्न तू मला विचारला आहेस, त्याचे उत्तर निश्चितच अवघड आहे आणि हे सुद्धा तू जाणतोसच.

"बरे मी सा सिर्व शिष्यांवर प्रीत करतो तेवढीच प्रीत माझे शिष्य माझ्यावर करतात की काय हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण जर एखादा शिष्य माझ्यावर प्रीत करीत नसतानाही माझा आशीर्वाद मागत असेल आणि मी फक्त द्यायचा म्हणून "विजयी भव' आशीर्वाद देऊनही तो शिष्य पराजित झाला तर माझ्याकडे खोटा आशीर्वाद दिल्याचे पातक येणार नाही.

"आता हे पाहा करुणाकरा, दुर्योधन माझा द्वेष्टा असता तर त्याने मला या युद्धात, पांडव माझेही प्रिय शिष्य आहेत हे ज्ञात असतानाही, सहभागी करून घेण्याचे ठरविले नसते. कारण हे दयामय प्रभू, जी व्यती आपले अहित चिंतिते, शत्रुपक्षाचे यश अपजेक्षते अशा व्यक्तीने आपल्या पक्षाने लढावे असे अपजेक्षणारा एकतर मूर्ख तरी असला पाहिजे किंवा स्वत:च्या नाशास तो निमंत्रण देतो आहे, असे तरी म्हणावयास हवे. किंवा याहीपुढे जाऊन त्या व्यक्तीवर राजाचे निरातिशय प्रेम तरी असले पाहिजे, असे मला वाटते.

"दुर्योधन मूर्ख नाही हे तू जाणतोसच. कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही ज्याने सूतपुत्र कर्णास राजा बनवले, आपल्या धाकटया भावांना एका मुठीत ठेवले, राजा धृतराष्ट्रावर प्रभाव कायम ठजेवण्यात यश मिळवले त्याला मूर्ख कसे म्हणता येईल? बरे त्याला आत्मनाशाची आस आहे, असेही मला म्हणता येत नाही. कारण उलटपक्षी दुर्योधन लोभी आहे असाच प्रचार आजवर झाला आहे, हेही तू जाणतोसच. आणि सारे कळूनही आत्मनाशाची आस बाळगणारा मग अति-ज्ञानीच म्हणायला हवा, आणि दुर्योधन तर तसाही नाही, अन्यथा पांडवांना राज्याचा हिस्सा मिळू नये यासाठी त्याने आजवर एवढ्या कलृप्त्या का लढविल्या असत्या? तेव्हा तो सुज्ञ आहे आणि असे असूनही जर मी पांडवांचे हित चिंतित आलो आहे हे ज्ञात असतानाही जर तो स्वत:च्याच पक्षात राहून मी युद्ध करावे हे जर अपजेक्षत असेल तर त्याचेही माझ्यावर प्रेम असायला हवे आणि मी त्याच्या पक्षाने जर युद्ध करणार असेल तर मी त्याला जय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करीन हा विश्वास त्याच्यात असला पाहिजे, हेही तेवढेच खरे.

"पांडवांचे मविर प्रेम आहे, हे तर सर्वविख्यात आहे. अर्जुनानेच माझा वैरी जो द्रुपद, यास बंदी बनवून माझ्यासमोर आणून माझ्या वैराग्नीचे शमन केले आणि या य:कश्चित द्रोणास पांचालाधिपती बनवून द्रुपदाच्या बरोबरीस आणून बसविले, हेही सारे जाणतात. शिवाय अर्जुन हा माझा सर्वात प्रिय शिष्य आहे, कारण धनुर्वेदातील सार्‍या कला तो माझ्याकडून शिकला आणि त्यात निष्णात बनला. त्यामुळे गुरू म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो, हेही खरे.

"धर्म, भीम, नकुल आणि सहदेवही माझे तेवढेच प्रिय शिष्य आहेत. आणि त्यांना ज्ञानदान करण्यात मी कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.

"शिष्य म्हणून मला जेवढा अRउनाचा अभिमान आहे, तेवढाच सूतपुत्र कर्णाचा सुद्धा आहे. जेवढा अभिमान मला गदायुद्धात प्रवीण असल्याबद्दल भीमाचा आहे तेवढाच दुर्योधनाचाही आहे. त्यामुळे हे युद्ध यान पक्षात होत असल्याने विजयी कोण झाला यास महत्त्व नाही. हे दयाघना, जो हरेल, तोही माझाच शिष्य असल्याने कारण अंतत: माझ्या गुरुपदास काळिमा लागणार आहे, हे

निश्चित!

" आणि या युद्धात कोणा एका पक्षाकडून तरी माझाही सहभाग असल्याने मी ज्या पक्षाकडून युद्ध करेन त्या पक्षाचा जर पराजय झाला तर माझे गुरुत्व अपयशी होईल हेही तेवढेच खरे नाही काय?

" आणि हे गोपाला, माझी समस्या याहूनही अधिकच गहन आहे. द्रुपदाने माझ्या संहारासाठी यज्ञ मांडिला होता हे तू जाणतोसच. त्यातून धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला आहे, हे सर्वविख्यात आहे. धृष्टद्युम्न माझ्या मृत्यूसाठीच यज्ञातून अवतरला आहे आणि नियतीची शोकांतिका म्हण किंवा माझा नियतीवरील अटळ विश्वास म्हण, जो माझ्याच मृत्यूसाठी जन्मास आला आहे त्याच धृष्टद्युम्नास मीच सारे शस्त्रास्त्र विद्येचे ज्ञान दिले आहे. धृष्टद्युम्नही, जो माझा मृत्यू आहे तो माझा शिष्यच आहे आणि त्याच यज्ञातून निर्माण झालेली याज्ञसेनी द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी आहे. द्रुपदाने आपले सामर्थ्य पांडवांच्या मागे उभे केले आहे हे तू जाणतोसच. या सार्‍यामुळे माझ्यापुढची समस्या अधिकच जटिल झालीअहे!

"धृष्टद्युम्न माझा शिष्य आहे आणि त्याला वधण्यास मी समर्थ असलो तरी त्याच्या हातून म मृत्यू यावा ही माझी नियती असल्याने मी त्यास कसा वधू? आणि शिष्यास वधणे हे पुत्रहत्येएवढेच पातकी कर्म असल्याने मी ते कसे करू? आणि जोवर माझ्या हाती शस्त्र आहे, तोवर मला वधण्यास या यच्चयावत विश्वात कोणी समर्थ नाही, हेही वास्तव आहे, हे तू जाणतोसच.

"परंतु अखेर धृष्टद्युम्न आणि माझ्यातील ही व्यतिगत गोष्ट आहे. युद्ध हे कोणा एका व्यक्तीसाठी नसते. ते राजाच्या हेतूच्या यशासाठी असते हे शास्त्राचे गुह्य आहे आणि जर मला दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करायचे असेल तर ते माझ्या व्यतिगत यशापयशासाठी किंवा भाग्याने लिहिलेल्या नियतीसाठी नसून दुर्योधनाच्या हितासाठी करावे लागेल हेही तेवढेच शास्त्रमान्य सत्य. आणि समज मी पांडवांच्या पक्षास जाऊन मिळालो तर मला पांडवांच्याच यशासाठी प्रयत्न करावा लागेल तेही निश्चित. परंतु त्यामुळे ऊनि एक विजात्र परिस्थिती निर्माण होईल आणि ती मला विषद करायलाच हवी.

"मी पांडवांच्या पक्षास का मिळावे हा प्रथम प्रश्न आहे. पांडव माझे प्रिय शिष्य आहेत आणि ते नेहमीच माझे इष्ट चिंतितात, हे सत्य आहे. परंतु कोणत्याही पक्षास मिळताना, जर मी उभय पक्षांचा गुरू असेन तर, माझ्याकडे तेवढेच समर्थनीय कारण हवे. एकतर मला कौरवांचा पक्ष सत्य वाटायला हवा किंवा पांडवांचा पक्ष सत्य वाटायला हवा. आणि सत्य एकाच बाजूने असू शकत नाही, ते कधी-कधी दोन्ही बाजूंनी असू शकते. परंतु आपण मनुष्यांच्या जगात जगत असल्याने सत्य हे पूर्ण सत्य असू शकत नाही. माणसाचे सत्य हे नेहमीच थोडयातरी असत्याने परिष्कृत असते. तेव्हा अधिक सत्य की कमी सत्य एवढाच फरक मानवासंदर्भात करता येतो. तेव्हा अधिक सत्य कौरवांच्या बाजूने आहे की अधिक सत्य पांडवांच्या बाजूने आहे, याचा निर्णय एका मनुष्यानेच घेणेसुद्धा त्यामुळे तेवढेच अनिर्णायक असू शकेल.

" आणि मी सुद्धा मनुष्य आहे. तेव्हा माझा विवेक, तो मला कितीही योग्य सल्ला देत असला तरी, शास्त्रार्थाने योग्य असेलच असे काही मी निश्चयाने सांगू शकत नाही. हे युद्ध सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे, असेही मला निश्चयाने म्हणता येत नाही, कारण जर या युद्धात जय मिळावा म्हणूनन अक्षौहिणी सेना तू पांडवांच्या साहाय्यार्थ दिली असेल आणि फक्त तू एकटा कौरवांच्या बाजूने असशील, तर तुलाही नेमकी कोणती बाजू सत्य वाटत आहे हे नक्की करता आलेले नाही हे निश्चित.

"रि कौरव असत्य आहेत आणि जर हे युद्ध फक्त सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी असेल तर कौरवांच्या बाजूने मग एकाही सैनिकाने युद्ध करता कामा नये, नाही तर नऊ अक्षौहिणी सैन्य आणि त्यांच्या बाजूने युद्ध करू इच्छिणारे एवढे रथी-महारथी असत्य आहेत हे सिद्ध होईल. किंवा सत्यासंदर्भात त्यांचा काहीतरी भरम झाला आहे, असे म्हणावे लागेल! त्यांची कीर्तीही यामुळे कलंकित होईल. त्यांची संपूर्ण आयुष्याची तपश्चर्या असार्थकी होईल.

"तेव्हा या युद्धाचा आणि शाश्वत सत्याचा संबंध नाही असे मला निश्चयाने वाटते. धर्म हा सत्य असतो आणि जेथे सत्य नाही तेथे धर्म नाही आणि येथे तर धर्म निश्चयानेन्ही पक्षांच्या बाजूने नाही, असे मला म्हणावेसे वाटते.

"मग हे युद्ध कशासाठी आहे? राज्यलक्ष्मीसाठी! कौरवांकडून राज्य कूनिं घ्यावे या अनिवार आकांक्षेने पांडव युद्धास सज्जा आहेत तर पांडवांस आपल्या राज्याचा कणमात्र हिस्सा द्यायचा नाही या निश्चयाने कौरव युद्धास सज्जा आहेत. हे युद्ध राज्यासाठी आहे. भूमीसाठी आहे आणि या भूमीवर आपलाच अधिकार आहे हे उभयपक्षास वाटते आहे.

" आणि एखाद्या सीमित वस्तूवरन किंवा अधिक पक्ष अधिकार सांगू लागतात तेव्हा त्याचा निर्णय संहारक युद्धानेच होणार हेही तेवढेच सत्य. आणि "अधिकार' ही मानवी संकल्पना आहे असे मला वाटते. कारण सत्य धर्म पाहिला तर या यच्चयावत विश्वात कोणाचाही अगदी तृणपात्यावरही अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे.

"तेव्हा हे युद्ध धर्म किंवा सत्यासाठी नसून अधिकारासाठी आहे आणि राज्यावर, अगदीच राजनीतिशास्त्राने पाहिले तर, कौरवांचा अधिकार आहे की पांडवांचा हे सुद्धा सांगता येणे अनिश्चित आहे. कारण हे ज्ञानवंता, हे तू सुद्धा जाणतोसच की जो ज्येष्ठ त्याला राज्याधिकार मिळायला हवा.

"त्या अर्थाने पाहिले तर युधिष्ठिराचा जन्म आधी झाला. म्हणून त्याचा या राज्यावर अधिकार आहे. परंतु धर्म सूक्ष्म आहे. आधी संकल्प होतो, मग सिद्धी. संकल्प आणि सिद्धीत केवढेही अंतर असले तरी संकल्प आधी होणे ही खरी निर्णायक स्थिती असेही पूर्वाचार्य म्हणतात. जन्म केव्हा झाला अथवा गर्भधारणा केव्हा झाली यावर ज्येष्ठत्व माजेअयचे ठरविले तर या प्राप्त प्रश्नात गंभीर समस्या निर्माण होते. गांधारीची गर्भधारणा कुंतीअधी झाली होती हे तर सर्व जाणतात. म्हणजे संकल्प आधी झाला होता पण कौरवांचा जन्म पांडवांनंतर झाला. या दृष्टीने पाहायला गेले तर जन्म उशिरा होऊनही कौरव ज्येष्ठ ठरतात.

" आणि नीतिशास्त्रातील दुसरी समस्या अशी, की केवळ ज्येष्ठ आणि कनिष्ठ या भेदावर अवलंबून राहून अधिकार फक्त ज्येष्ठांच्या हाती द्यावा हे कसे ठरवणार? भीष्म ज्येष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार मिळाला नाही हे तर खरे आहे ना? आणि बलराम ज्येष्ठ असतानाही द्वारकाधीश तू आहेस हे सुद्धा तेवढेच सत्य ना? माझ्या मते ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा भेद या प्रसंगी लावता कामा नये. कोण योग्य आणि कोण अयोग्य एवढाच माझ्या मते खरा प्रश्न असला पाहिजे.

"आता हा प्रश्न कोणामागे किती समर्थक आहे या न्यायाने सोडवायला गेल्यास, उभय पक्षांमागे समान बलाबल असल्याने निश्चित निर्णय अशक्य आहे. समजा एखाद्या पक्षामागे कमी बल असले म्हणून तो पक्ष अयोग्य आहे असेही काही केल्या म्हणता आले नसते. कारण संख्येच्या बलावर जर योग्यायोग्य निर्णय होऊ लागला तर खंडीभर अज्ञ लोक मूठभर सुज्ञ लोकांस सह पिराजित करू शकतील आणि मग योग्यायोग्यतेच्या व्याख्याच बदलून जातील.

"म्हणजेच, कौरव योग्य आहेत की पांडव याचा निर्णय शास्त्रांच्या अर्थाने लागणे शक्य नाही. कोण नेमका योग्य आहे, हे काही केल्या आपल्याला ठरविता येणार नाही.

"तेव्हा या दोन पक्षांमध्ये युद्ध होणे आणि या युद्धात कोणाचा तरी पराजय होणे अपरिहार्य आहे. बहुसंख्य प्रश्न ज्ञानाच्या आणि प्रतिभेच्या बलाने सुटत नसून बाहुबलानेच सुटू शकतात हेही कटू सत्य आहे आणि हे एवढे करूनही जो जिंकतो त्याचीच बाजू सत्याची होती असेही काही केल्या निश्चयाने म्हणता येत नाही, कारण आजवरच्या सर्वच जेत्यांची बाजू सत्याची होती असे काही म्हणता येत नाही आणि जे हरले ते पातकी होते असेही विधान करता येत नाही. हे परमात्म्या, तू स्वत:ही जरा संधाकरवी सव्वीस वेळा पराजित झाला असला तरीही तुला कोणी असत्य म्हटल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

"त्यामुळे कोणाचा विजय व्हावा असे तू जे मला विचारलेस हा खरेच अवघड प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर शास्त्रार्थाने देणेही अशक्य आहे हे उघडच आहे. मग येथे आता उरते "द्रोण' नामक व्यक्ती आणि तिच्या भावना. या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन आणि परिस्थितीने निर्माण केलेल्या वंचना.

"शास्त्र कितीही ज्ञात असले तरी व्यती नेहमीच आपल्या अनुभवांनी आलेल्या समजुतींनुसार वर्तन करते आणि त्याचे शास्त्रार्थाने त्याचे समर्थन करीत असते.

"तेव्हा सत्य काय आहे, यापेक्षा मला काय वाटते तेवढेच खरे तरमहत्त्वाचे आहे. माझ्यावर माझ्या परिस्थितीची काय बंधने आहेत, तीही महत्त्वाची आहेत.

"मी उभय पक्षांचा गुरू आहे ही आता माझ्या दृष्टीने दुय्यम गोष्ट आहे. पांडवांनी माझा दृढ शत्रू जो द्रुपद, त्याच्या कन्येशी विवाह केला आणि माझ्या शत्रूशी सख्य केले याचे मला नेहमीच वाईट वाटत आले आहे. द्रुपदाने माझ्या नाशासाठी घोर यज्ञ केला आणि त्यातूनच धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला हे घोर सत्य ज्ञात असूनही त्यांनी द्रौपदीशी जाणीवपूर्वक विवाह केला आणि धृष्टद्युम्नास आपल्या पक्षाकडे ओढून घेतले हेही सत्य आहे. धृष्टद्युम्न माझा शिष्य. मी, तो माझ्या वधाकपरता जन्मास आला आहे हे ज्ञात असतानाही, त्याला मी सर्व ज्ञान देऊन पुत्रसमान केले, तोही शिष्य आज पांडवांच्या बाजूने आहे, हे सुद्धा सत्य. ज्या पक्षाला माझ्या वधासाठी आतुर व्यती आहेत, त्यांच्या पक्षास काही झाले तरी माझ्यासारखा कठोर निश्चयी मनुष्य जाणार नाही हे अटळ सत्य आहे.

"कारण मानवी विकारांनी भरलेल्या मानवी जगतात सत्य काय आहे, यापेक्षा काय सत्य वाटते हे महत्त्वाचे असते हे खरोखर दुर्दैव होय.

" आणि मी आधी बराह्मण असल्याने स्वत: युद्ध न कपरता द्रुपदाची खोडी शिष्यांकरवी मोडली होती. आता मी मात्र स्वत:च क्षात्रधर्माचा अंगीकार करून द्रुपदाची आणि धृष्टद्युम्नाची खोडी जरिवायचे ठरविले आहे."

एवढे प्रदीर्घ भाषण करून श्रांत झालेल्या द्रोणाचार्यांनी भूमीवर बसकण मारली आणि ते नेत्र मिटून आत्मचिंतनात मग्न होऊन गेले.

श्रीकृष्णानेही द्रोणाचार्यांच्या बाजूस बसून त्यांचे प्रदीर्घ अवलोकन केले आणि म्हणाला,

"हे ज्ञानश्रेष्ठा, हे महागुरू, तुमच्या भावना मला समजल्या."

यावर द्रोणाचार्यांनी नेत्र उघडून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि म्लान हास्य करण्याचा यत्न केला.

"हे ज्ञानवंता, तुमच्या प्रश्नांचे बरचसे उत्तर तुम्हीच दिले आहे. हे खरे आहे की धर्म सूक्ष्म आहे, असे सारेच म्हणतात. परंतु अधिक सूक्ष्मात गेलो आपण, तर धर्म नावाची कोणतीच गोष्ट या मानवी जगतात अस्तित्वात नाही हे तुमच्या लक्षात येईल. अंधार आणि प्रकाश यात आपण सा भेदि करतो तसा भेद अधर्म आणि धर्मात करता येत नाही आणि तीच मानवाची मोठी शोकांतिका आहे.

"सनातन सत्य आणि धर्म अविचल आहे, परंतु मानवाचा धर्म मात्र परिवर्तनीय आहे. श्वेतकेतूच्या पूर्वी पुरुष आपल्या कन्यांशीही संबंध ठेवीत असत असे इतिहास सांगतो आणि त्याकाळी अशा संबंधास कोणी अधर्म मानीत नव्हते. फार काय, यमाच्या कालापूर्वी भगिनीगमन कोणी अधर्म मानीत नव्हते. परंतु भगिनीगमन यमाने निषिद्ध ठरविले. तेव्हा मानवी धर्म परिवर्तनीय आहे, हे निश्चितपणे दिसून येते.

" आणि जेही काही परिवर्तनीय आहे ते नित्य असू शकत नाही. आणि जे काही अनित्य आहे त्याला धर्म म्हणता येणार नाही.

"म्हणजेच मनुष्याच्या जगतात ज्याला शाश्वत अर्थाने धर्म म्हणतात, तसा धर्म नसतोच. खरे तर मनुष्यास धर्म जेव्हा क बोलतो तेव्हा तो संघर्ष करू शकणार नाही. कारण ज्यावर आपली सत्ता असूच शकत नाही, त्यावर सत्ता मिळवण्याचा यत्न करणे किंवा सत्ता आहे असे समजणे हे मूर्खपणाचे लक्षण नाही काय?

"तेव्हा हे ब्रह्मर्षी, हे युद्ध हे सत्यार्थ नाही. युद्ध हे विकारार्थ आहे आणि मानवी विकारांना अंत नाही. मानवी आकाक्षांना अंत नाही. कितीही प्राप्ती झाली तरी अधिकाची प्राप्ती करण्यासाठी सारेच मानव आपले यत्न करीत असतात.

"केवळ मी आजवर पांडवांची बाजू घेतली की नाही याला काही महत्त्व नाही कारण खरे तर मी बाजू घेतली म्हणून पांडवांची बाजू सत्याची ठरत नाही, तसेच मी आज कौरवांची बाजू घेतली आहे, म्हणून त्यांचीही बाजू सत्याची ठरत नाही.

"खरे तर कोणाचीच बाजू सत्याची नाही आणि कोणाचीच बाजू असत्याची नाही. आणि असे असूनही तुम्ही आणि मी मानव असल्याने, मानवी विकारांचे सारेच बळी पडत आहोत हेही तेवढेच सत्य! परंतु माझ्या मनात मात्र कोणाचेही काहीही सत्य नाही. कारण हे सारे मानवी जीवन एक मोठा व्यामिश्र खेळ आहे, हे मला पटलेले आहे. पांडवांनी अधर्म वर्तन करूनही स्वत:ला धर्मज्ञ म्हणावे, त्यातील विरोधाभास अनुभवण्यासाठी मी त्यांच्याबरोबर होतोच. त्याचप्रमाणे दुर्योधन अधर्मी आहे असे सारे जग म्हणते तेव्हा त्याचे अधर्मत्व आहे तरी काय हे कळावे यासाठी मी त्याच्याबरोबर आहे.

"कारण धर्म म्हणजे नेमके काय यासंबंधी माझ्याच मनात आता संभरम निर्माण झाला आहे.

"कारण हे ब्रह्मर्षी, धर्म मी निर्माण केला, असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा धर्म म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत होते हे मी सांगणे करमप्राप्त आहे.

"धर्म खरे तर खूप साधा आणि सरळ आहे. त्याची तत्त्वेही तेवढीच साधी आणि सोपी आहेत. सत्याने वागा असे मी सांगितले, पण मानवी सत्य हे मानवी विकारांनी व्यापलेले सत्य असते. त्यामुळे साधे-सरळ सत्य दूर राहते. आणि मानवी सत्य हे केवढे विरोधाभासाने भरलेले आहे, हे तुम्हीच मला आताच स्पष्ट केलेत. तेव्हा धर्माची अन्य तत्त्वे स्पष्ट करण्यात तरी काय अर्थ आहे?

"तेव्हा मला अभिप्रेत असलेला धर्म आणि आचरणात असलेला धर्म यात जर महदंतर असेल तर ज्या यच्चयावत सृष्टीसाठी मी धर्म निर्माण केला त्या धर्मात काहीष तर नाही ना असे कोणासही वाटणे स्वाभाविक आहे.

"पण हे ब्रह्मर्षी, यच्चयावत विश्व मी निर्माण केलेल्या धर्माने चालते, दृश्य आणि अदृश्य अशी सृष्टीही माझ्या तत्त्वांनी चालते. प्रकाश आणि अंधार हे स्पष्ट वास्तव सारीच सृष्टी रोजच अनुभवते. कारण ते सत्य आहे. जन्म आणि मृत्यू हे वास्तव यच्चयावत सृष्टी रोजच अनुभवते. कारण दोन्हीही सत्य आहेत. "आहे आणि नाही' यातील फरकही सारीच सृष्टी नित्य अनुभव करते, कारण तेही शाश्वत सत्य आहे, आणि जे आहे ते "आहे' असे मानून चालणारी सृष्टी जे नाही ते "नाही' हेही गृहीत धरते.

"पण मनुष्याची गोष्टच वेगळी. तो जे आहे ते "आहे' हे मान्य करूनही जे "नाही' ते "आहे' कसे बनवायचे यासाठी जीवापाड कर्म करीत असतो आणि नाही ते "आहे' बनवण्यासाठी अनंत यातना सहन करीत असतो. त्यासाठी शत्रू बनवीत असतो. त्यासाठी मित्र बनवीत असतो.

"धर्म फार साधा आणि सरळ आहे; पण त्यासाठी तेवढेच सरळ मन हवे आणि मन ही केवढी व्यामिश्र गोष्ट बनली आहे. मनुष्यास, अन्य प्राण्यांस अप्राप्य जे मन, ते आहे आणि मनाने मनुष्य आकाशात भरार्‍या घेत असतो. प्राप्त स्थितीत असंतुष्ट राहणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच त्याचा शाश्वत अधर्म आहे.

"कारण जेव्हा आकाशातील तारका प्रकाशतात तेव्हा कोणास सुख मिळते आणि कोणास यातना होतात याचा विचार तारका कधी करत नाहीत. मनुष्य मात्र प्रत्येक कर्म करीत असता स्वत:स सुख होते की इतरांस याचा विचार करीत असतो. ही धपरत्री जेव्हा अन्न प्रसवते तेव्हा ते अन्य सृष्ट भक्षण करणार आहे की दृष्ट याचा विचार करीत नाही. कारण तो सृष्टीचा शाश्वत धर्म आहे; पण मनुष्य मात्र आपल्या कर्माचे फल कोणास मिळणार आहे, याचा विचार करत असतो आणि केवळ विचारांनीही तो सुखी किंवा दु:खी होत असतो.

"खरे तर मी निर्माण केलेला धर्म या मानवी परिप्रेक्ष्यात कसा लागू पडतो हे अनुभवण्यासाठी मी हा खेळ रचला आहे.

"हे ब्रह्मर्षी, तू महाज्ञानी आहेस, परंतु मानवाचे ज्ञान हे शून्य कसे ठरते हे तुम्हीच मला दाखविले आहे आणि हा मलाच एक धडा आहे.

"या होणार्‍या युद्धात कोण जिंकणार हा खरा प्रश्न नाहीच. खरा प्रश्न आहे, शाश्वत धर्म अस्तित्वात आहे की नाही, एवढाच!

"त्यासाठी मी निरामय मनाने सर्वांशीलतो आहे.

"श्रवतो आहे.

"बस! हे ब्रह्मर्षी... अधिक काय सांगू?"
 

मागे

पुढे

 
Home Help Desk FAQ Your Comments
 

1998 - Rasik Enterprises.