|
 |
 |
रसिक.कॉम सुरू झाल्यापासून बरीच वर्षे इथे भेट देणारे रसिक वाचक त्यांना आवडलेल्या पुस्तकाची नोंद आम्हाला करून देत आहेत. चुकीच्या नावाची किंवा परभाषी निर्देशित पुस्तकांची मते आम्ही बाद करत असतो. काही वाचकांनी ह्या सुविधेचा उपयोग त्यांना आवडलेल्या पण आमच्या पुस्तकालयात समावेशित नसलेल्या पुस्तकांचं निर्देशन करण्यासाठी केला. अशी मते पण आम्ही आमच्या यादीत समाविष्ट केली आहेत. आतापावेतो हजारो वाचकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे आणि २-३ हजार आवडत्या पुस्तकांचा निर्देश केला गेला आहे. वाचकांच्या अशा आवडत्या पुस्तकांच्या यादीतल्या सर्वोच्च १०० पुस्तकांची नावे इथे आम्ही देत आहोत. जसजशी अधिक मते मिळत जातील तसतशी या यादीतल्या पुस्तकांचा क्रम खाली-वरती होत जातो तो आम्ही प्रत्येक काही महिन्यांनंतर दाखवत जाऊ.
Last Updated on December 18, 2015
|
|
|