|  |
 |
Rasik.com सुरू झाल्यापासून इथे भेट देणारे रसिक वाचक त्यांना
आवडलेल्या पुस्तकांची नोंद आम्हाला बरीच वर्षे करून देत आहेत.
आतापावेतो सुमारे २०००+ वाचकांनी आपापल्या ७००-८०० आवडत्या
पुस्तकांचा निर्देश केलेला आहे. वाचकांच्या अशा आवडत्या
पुस्तकांच्या यादीतल्या सर्वोच्च्म ५० पुस्तकांची नावे आम्ही या
विभागात देत आहोत. जसजश्या नव्या नोंदी आम्हाला मिळतात, तसतश्या या
यादीतल्या पुस्तकांचा क्रम खाली-वरती होत जातो तो आम्ही प्रत्येक
काही महिन्यांनंतर दाखवत जाऊ.
याबरोबरच, इतर काही सर्वोत्कॄष्ट पुस्तकांच्या याद्या पण या
विभागात आहेत.
साहित्य अकादमी, १९५४ मध्ये स्थापन झाल्यापासून ते आजपावेतो दरवर्षी,
मराठीत प्रसिद्ध झालेल्या त्या-त्या वर्षांच्या पुस्तकांपैकी एका
सर्वोत्कॄष्ट पुस्तकाला पारितोषक देत आहे .... त्याची यादी.
मराठीतील वीस श्रेष्ठ पुस्तकांची (All Time Best) यादी करण्याचा
उपक्रम 'अंतर्नाद' मासिकाने २००५ आणि २००६ मध्ये केला. निवड एकूण
तीन टप्प्यांत केली गेली व सर्वात शेवटच्या टप्प्यात सर्वश्रेष्ठ
२० पुस्तकांची यादी २००६ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'आकाशवाणी'च्या
मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षांतल्या 'सर्वोत्कॄष्ट
१०' पुस्तके निवडण्याचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवर
सातत्याने निवेदन देऊन, तसेच नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून,
वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या ... त्या दहा पुस्तकांची यादी.
'महाराष्ट्र टाइम्स'ने आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक
मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कॄष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध
केली. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाइम्स'ने स्वतःच केली होती.
|
|