|
 |
 |
रसिकहो!
दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाची खूण! पहिला दिवाळी अंक नक्की कधी प्रकाशित झाला?
'लोकप्रभा'च्या ऑगस्ट २७, २००४ अंकानुसार दिवाळी अंकांचा इतिहास विलक्षण वाचनीय व गुंतागुंतीचा असण्याची शक्यता आहे. दिवाळी अंकांच्या आजवरच्या वाटचालीचा आणि आजच्या स्थितीगतीचा वेध महाराष्ट्र टाइम्सने इथे आणि इथे घेतला आहे.
फराळ आणि फटाक्यांबरोबरच वार्षिक दिवाळी अंकांची फर्माईश ही मराठी माणसाची एक खासियत! कुणी गोड, तर कुणी तिखट चवीचे. कुणाला ऍटमबॉंबचा धडाका पसंत, तर कुणाला फुलबाजीच्या नाजुक ठिणग्यांचे आकर्षण. दिवाळी अंकांचे तेच. कुणासाठी भारदस्त साहित्य, तर कुणासाठी विनोदी खुसखुशीत लेख! आपणा सर्वांची आवड पुरवण्यासाठी मराठीतले बहुतेक सर्व दिवाळी अंक उपलब्ध करून देत आहोत दर वर्षीप्रमाणे.
सर्व दिवाळी अंक एकाच वेळेला प्रकाशित होत नसल्यामुळे तुम्ही मागवलेले सर्व अंक बाजारात आल्यानंतरच तुम्हाला ताबडतोब पुण्याहून 'एअर मेल'नी रवाना करण्यात येतील. तुमची संपूर्ण ऑर्डर तुम्हाला २ किंवा अधिक "packages "मध्ये मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे अंक "Express Shipment"ने मागविले असल्यास, तुम्हाला त्यासाठी दाखवलेली "shipping"ची किंमत सर्व अंक एका "package" मधून पाठवण्यासाठीची आहे. अर्थातच, तुमच्या ऑर्डर मधले सर्व अंक उपलब्ध झाल्यावरच "express package" रवाना करण्यात येईल.
खालच्या यादीतल्या तुमच्या आवडीच्या अंकांवर खुण करा (किंमतीसाठी नावावर आणि विकत घेण्यासाठी निवडायला ⌷ वर क्लिक करा) आणि मग सर्वात खालच्या "add to shipping cart" वर क्लिक करा. Please note that prices displayed on our website "include" all taxes as well as shipping and handling to addresses all over the world.
दर वर्षी खपणारे लोकप्रिय दिवाळी अंक (तुम्हाला पाहिजे असणारा अंक खालील यादीत नसला तर मोठ्या यादीसाठी इथे click करा) ...
|
|
|